लॉकडाऊन काळातील शिक्षण Learning From Home

learning from home activies

लॉकडाऊन काळातील शिक्षण "घरी राहून शिक्षण" Learning From Home

  कोव्हीड १९ कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु आहे. आणि अशातच सर्व शाळा बंद आहे. मात्र या कालावधीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. यासाठी घरी राहून शिक्षण 'learning from home'  या संकल्पनेनुसार शासनच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. 

त्यासाठी पालकांना नियमितपणे मुलांच्या अभ्यास घेण्याच्या दृष्टीने दैनदिन अभ्यासमाला whatsapp द्वारे लिंक पुरवल्या जातात. तसेच दिक्षा app चा वापर करून बरेच पालक घरी मुलांचा अभ्यास करून घेत आहे. अशातच शहरी व ग्रामीण भागातील online शिक्षण पद्धतीचे आव्हाने वेगवेगळी आहेत. 

 ग्रामीण भागात मुख्य समस्या म्हणजे बऱ्याच पालकांकडे android फोन नाहीत. तसेच काही ठिकाणी नेटवर्क सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत देखील दूरचित्रवाणी च्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम , शैक्षणिक अभ्यासक्रम वाहिनी सुरु करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरु आहेत. 

        online पद्धतीने शिक्षण हे पूरक जरी नसेल परंतु सध्याच्या परीस्थीतीत पर्याय म्हणून आपण याकडे जर पहिले तर नक्कीच या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यास मदत होऊ  शकेल यासाठी आपण मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. बालवयात रममाण होऊन मुलांना घडवण्याची संधी

चला तर जाणून घेऊया या लॉकडाऊन च्या काळात मुलांचे "घरी राहून शिक्षण" (Learning From Home) करून घेण्यासाठी मोफत उपलब्ध संसाधने कोणती?

कोरोना संकट मराठी निबंध

घरी राहून शिकण्याचे विविध स्रोत Learning From Home Sorces 


१. youtube



तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये आपल्याला सर्वाना माहितच आहे. की youtube हे आपल्यासाठी किती गरजेचे बनले आहे. आज असंख्य विषयावर youtube वर व्हिडीओ उपलब्ध आहे. आणि मुलं सहजपणे youtube हाताळत आहे. याच youtube वर मराठी,हिंदी, इंग्रजी, उर्दू सर्व भाषांमध्ये शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध आहेत. 

आपण मुलांना त्यांच्या इयत्तेप्रमाणे एखादी संकल्पना शिकण्यासाठी  समजावून सांगण्यासाठी youtube व्हिडिओ सर्च केले तर आपल्याला खूप सारे व्हिडिओ मुलांना दाखवता येऊ शकतात. स्पोकन इंग्लिश बाबत मुलांना youtube च्या माध्यमातून इंग्रजी विषयाचे अध्ययन करता येऊ शकेल.

 यासाठी आपण पालक म्हणून मुलांना पूर्ण वेळ मोबाईल ची सवय न लावता ठराविक वेळेत मुलांना शैक्षणिक व्हिडिओ पाहण्याची संधी उपलब्ध करून देता येऊ शकेल. त्यासोबत एक वही सोबत ठेवून त्यामध्ये नोट्स काढण्याची पद्धत किंवा टिपा लिहून ठेवणे. असा उपयोग आपण youtube च्या माध्यमातून करता येऊ शकेल. उदा. बालभारती youtube channel

२. Google Search इंजिन 


मुलांना गुगल सर्च इंजिन च्या माध्यमातून शैक्षणिक माहिती शोधण्यासाठी मदत घेता येऊ शकेल यासाठी खूप शैक्षणिक वेबसाईट उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करून माहिती संकलन करता येऊ शकेल. मुलांच्या आवडीनुसार त्यांचे छंद, कलेनुसार माहिती उपलब्ध करून देता येऊ शकेल.

३. DIKSHA दिक्षा ई-लर्निंग वेबपोर्टल


इयत्ता १ ली ते १2 वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेतील ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे. प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी यांना मोफत आणि मुबलक प्रमाणात इ-लर्निंग साहित्य मिळावे म्हणून केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने DIKSHA ई-लर्निंग Platform सुरु केला आहे. 

विद्यार्थी घरबसल्या आपले अध्ययन सुरु ठेवू शकतात आणि पालक याचा वापर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेऊ शकतात. DIKSHA वेब पोर्टल वर ई-साहित्य उपलब्ध आहे..
लिंक-https://diksha.gov.in/explore

१.DIKSHAमोबाईल app

इयत्ता १ ली ते १2 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित DIKSHA app देखील उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपण इ.१ ली ते १2 वी पर्यतचे ई साहित्य मोफत पाहू शकतात. व घरबसल्या सहजपणे मुले आपले अध्ययन सुरु ठेवू शकतात. DIKSHA APP डाऊनलोड करण्यासाठी play store वर जाऊन सदर app डाउनलोड करून घेता येईल.


digital education




४. ऑनलाईन पाठ्यपुस्तके ई-बालभारती



इ. १ ली ते १२ वी साठीची सर्व पुस्तके आपल्याला PDF स्वरुपात ई-बालभारती या संकेतस्थळावर मोफत डाउनलोड करता येतात.
लिंक- ई-बालभारती https://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

१. ई-बालभारती लर्निंग साहित्य - 

इ ८ वी ते १० वी  साठी Talking Books Audio स्वरुपात उपलब्ध असल्याने दृष्टीबाधित दिव्यांग अंध मुलांना याची जास्तीत जास्त मदत मिळू शकेल.

यासाठी आपल्याला  या पुढे दिलेल्या   वेब पेज वर जा वेब पेज वर जाऊन रजिस्टर करावे लागेल. नंतर आपण ही बोलकी पुस्तके डाऊनलोड करू शकतो. व अंध दिव्यांग मुलांना याची मदत करून देवू शकू जेणेकरून मुले स्वयंअध्ययन करतील. बोलकी पुस्तके https://learn.ebalbharati.in/

२. बालभारती youtube वाहिनी  


५. स्वयंम प्रभा  SWAYAM PRABHA 

यामध्ये शैक्षणिक सामग्री प्रसारित करणारे ३२ डिटीएच टीव्ही channel आहेत. या channel मध्ये शालेय शिक्षण इ. ९ वी , १२ वी आणि उच्च शिक्षण आणि उच्च शिक्षण पदवीधर आणि पदव्यूत्तर कार्यक्रम या दोन्ही गोष्टीचा समावेश आहे.
स्वयंम प्रभा  SWAYAM PRABHA   https://www.swayamprabha.gov.in/


       असे विविध पर्याय वापरून आपण या लॉकडाऊन च्या काळात मुलांना online शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवू शकू online शिक्षण हा पूरक जरी नसला . यासाठी नेटवर्क सुविधा , मोबाईल, कॉम्पुटर सुविधा असे अनेक आव्हाने आहेत. मात्र या काळात आपण online शिक्षणाकडे  पर्याय म्हणून पाहिले तर नक्कीच याचा लाभ मुलांना होईल.

याव्यतिरिक्त आपण घरातील इतर दैनदिन कार्य मुलांकडून करून घेऊ शकतो यासाठी बालवयात रममाण होऊन मुलांना घडवण्याची संधी हे आर्टिकल जरूर वाचावे.
धन्यवाद !

Previous Post Next Post