इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा Questionbank प्रश्नपेढी Maharashtra SSC , HSC Board Question Papers pdf 2021

इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा Questionbank प्रश्नपेढी Maharashtra SSC , HSC Board Question Papers pdf 2021

SSC Board Question Papers pdf 2021 Marathi Medium

इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा SSC HSC Board Exam 2021 एप्रिल-मे मध्ये होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सन 2020-21 मध्ये शाळा काही दिवस बंद होत्या.त्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकले. नाही. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सरकारने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 25 ℅ अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता या चालू शैक्षणिक वर्षात 75% अभ्यासक्रमावरच परीक्षा होणार आहे. या आधीच्या ब्लॉग मध्ये आपण इयत्ता दहावी व बारावी चा 75% अभ्यासक्रम कसा डाऊनलोड करायचा? याबद्दलची माहिती घेतलेली आहे.

आजच्या ब्लॉगमध्ये आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य , पुणे  SCERT Pune मार्फत विद्यार्थ्यांचा सराव व्हावा यासाठी प्रश्नपेढी विकसित करण्यात आलेले आहेत या प्रश्नपेढी माध्यम व  विषय निहाय उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

१. इयत्ता 10 वी  सराव प्रश्नपत्रिका

इयत्ता दहावी व बारावीच्या प्रश्नपेढी  questionbank विकसित करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत SCERT Pune या संकेतस्थळा वर इयत्ता 10 वी माध्यम मराठी चे विषय सराव प्रश्नपत्रिका

1.     गणित : भाग - १

2. गणित : भाग - 2

3. इतिहास आणि राज्यशास्त्र

4. भूगोल  10th Geography Marathi pdf 2021

5. कुमारभारती 10th kumarbharti marathi pdf

6. English (17) Third Language 

7. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - 1

8. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - 2

प्रश्नपेढी डाउनलोड करण्यासाठी वरील विषयांच्या नावावर क्लिक करुन आपण प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकता. या प्रश्न पिढीचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करून या संधीचा लाभ घ्यावा.

याच पद्धतीने इयत्ता दहावीच्या इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या देखील प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करावा. SCERT Pune  येथे क्लिक करा. 

२. इयत्ता 1२ वी  सराव प्रश्नपत्रिका

इयत्ता बारावीच्या 25 टक्के अभ्यासक्रम कमी केलेल्या नुसार 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपेढी questionbank विकसित करण्यात आलेली आहे. यामध्ये इंग्रजी मराठी उर्दू माध्यमाच्या प्रश्नपेढी उपलब्ध झालेल्या आहेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपण इयत्ता बारावीच्या प्रश्नपेढी डाऊनलोड करून अधिकाधिक सराव करून घ्यावा. इंग्रजी माध्यमाच्या सराव प्रश्नपत्रिका 

1. Arts and Science Mathematics and statistics

2. Science Physics

3. Science Chemistry

4. Science Biology

5. Arts, Commerce, Science and MCVC English

6. Commerce Mathematics and Statistics

7. Arts, Commerce and Science History

8. Gography

9. Computer Science I

10. Computer Science II (D9)

11. German

12. Russian

13. Chinese Language

इयत्ता १२ वी  विषयांच्या प्रश्नपेढी Download करण्यासाठी येथे क्लिक करा. 

याच पद्धतीने मराठी व उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आहेत. आणि अजून राहिलेल्या विषयांच्या प्रश्नपेढी विकसित करण्याचे काम सुरू आहे. या प्रश्न पिढ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन आणि सराव करण्यासाठी मदत होणार आहे. या प्रश्नपेढी मध्ये घटक निहाय प्रश्नप्रकार निहाय विविध प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे.

याच्या साहाय्याने विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील आशय आणि प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याचा अभ्यास विद्यार्थी करू शकतात. या प्रश्न पिढ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव होईल आणि त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि विद्यार्थी हे चांगल्या सकारात्मक दृष्टीने बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जातील आणि घवघवीत यश मिळवतील. यासाठी पालक व शिक्षकांची मदत आवश्यक तिथे विद्यार्थ्यांनी घ्यावी आणि जास्तीत जास्त सराव करून घ्यावा. विशेष म्हणजे लेखनाचा अधिक सराव करावा. कारण कोरोणाच्या या कालावधीमध्ये लेखन सराव कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी जास्तीचा वेळ लागू शकतो. यासाठी यापूर्वीच शासनामार्फत परीक्षा पेपर साठी अधिक वेळ  वाढवून देण्यात आलेली आहे. तरीदेखील लेखनाचा अधिक सराव करून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा.

इयत्ता १० वी व १२ वी २५% कमी केलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post