महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? How to Use Maha Career Portal ?


नमस्कार मित्रांनो , मागील ब्लॉग मध्ये स्व-ची जाणीव व करिअर कसे निवडावे? याविषयी माहिती घेतली. इयत्ता १० वी व १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडण्याचा हा महत्वपूर्ण टप्पा,  आजच्या ब्लॉग मध्ये आपण एका महत्वपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत. UNICEF  द्वारा स्थापित महाराष्ट्र शासनाने सुरु केलेले  Maha Career Portal महाकरिअर पोर्टल विषयी माहिती घेणार आहोत. या ब्लॉग मध्ये महाकरिअर पोर्टल काय आहे? महाकरिअर पोर्टल मध्ये कोर्सेस , परीक्षा , महाविद्यालये ,शिष्यवृत्ती यांची माहिती कशी शोधायची? महाकरिअर पोर्टल मध्ये लॉगीन कसे करायचे ? याबद्दलची संपूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये घेवूया. 

करियर कोणत्या क्षेत्रात निवडावे? येथे जाणून घ्या ५५० हून अधिक कोर्सेस माहिती - महा करियर पोर्टल २०२३

Table of content

{tocify} $title={Table of Contents}

maha career portal


करियर मार्गदर्शन व समुपदेशन Career guidance

प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य करिअर निवडणे आवश्यक असते. जर योग्य वेळी योग्य करिअर मार्गदर्शन उपलब्ध झाले नाही. तर मग जे पुढे दिसेल त्यानुसार आपण त्या क्षेत्रात करिअर करतो. कमी अधिक प्रमाणात त्यामध्ये आपल्याला यश अपयश येते. 

याउलट मुख्य म्हणजे इयत्ता 9 वी ते 12 वी या काळात जर योग्य करिअर विषयक मार्गदर्शन मिळाले. स्व ची जाणीव झाली. तर नक्कीच पुढील आयुष्यात विद्यार्थी आपल्या क्षमता ओळखून आवडीच्या क्षेत्रात करियर करू शकतील. मात्र यासाठी मुलांना योग्य वेळी शिक्षक , पालकांनी सपोर्ट करणे आवश्यक आहे. बोर्ड परीक्षा म्हणजे इयत्ता 10 वी व 12 वी नंतर विविध करियर च्या संधी कोणत्या आहेत? कोणते पर्याय उपलब्ध आहे? कोणत्या क्षेत्रात संधी आहेत? असे नाना विविध प्रश्न मुलांच्या सोबत पालकांच्या मनामध्ये येतात. बहुतेक वेळा पालक , शिक्षक सांगतील त्या क्षेत्रात करिअर करतात. 

अमुक अमुक क्षेत्रात चांगली संधी आहे. दोन वर्षांचा कोर्स केला की, लगेच नोकरी मिळते. मग हेच क्षेत्र निवड भविष्यात खूप संधी आहे. असे आपल्याला आपले सहकारी नातेवाईक , मित्र सांगतात. मग इथेच मोठी गडबड होते. खरं तर इथे ज्याला करियर करायचे आहे. त्याच्या आवडी ,क्षमता यांचा विचार होत नाही. याने सांगितले म्हणून मी हे क्षेत्र निवडले. आणि मग भविष्यात कधीतरी आपण बोलतो. 

अरे मला तर हे क्षेत्र निवडायचेच नव्हते. मला अमुक अमुक क्षेत्रात जायचे होते. पण त्यावेळी मला याबद्दल काहीच माहिती नव्हती. मग असा पश्चाताप होऊ नये, यासाठी आपण योग्य वेळी करिअर विषयक योग्य वेळी अधिक माहिती जर आपण घेतली. तर आपल्या आवडीनुसार आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यास आपल्याला मदत होईल. यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महा करियर पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. 

आज Google वरती भरपूर माहिती उपलब्ध आहे. परंतु ज्यावेळी आपण दहावी-बारावीनंतर करिअरच्या विविध संधी या बद्दलची माहिती घेतो. त्या वेळेस बरीच माहिती ही खात्रीशीर किंवा योग्य माहिती शोधण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. मग यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एक अधिकृत असे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. तेच महा करियर पोर्टल या पोर्टल च्या माध्यमातून आपण विविध कोर्सेस, शिष्यवृत्या, विविध परीक्षा , महाविद्याल याबद्दलची माहिती आपल्याला मिळणार आहे.

महा करियर पोर्टल हे युनिसेफ च्या सहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या उपस्थितीत 22 मे 2020 रोजी Maha Career Portal  महाकरियर पोर्टल सुरू करण्यात आले. 

महा करिअर पोर्टलवरून इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महा करियर पोर्टल मार्फत करियर संदर्भातील माहिती घेता येणार आहे. विशेषतः दहावी आणि बारावी नंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. याबाबत मार्गदर्शन या पोर्टलवरून करण्यात येणार आहे.

महाकरियर पोर्टल ची वैशिष्ट्ये 

 • करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, शिष्यवृत्या, महाविद्यालय ,प्रवेश परीक्षा याविषयी माहिती.
 • 16 देशांमधील 260000 हुन अधिक प्रोग्राम
 • 550 हुन अधिक करिअर
 • 21100 हुन अधिक कॉलेज , महाविद्यालय विषयी माहिती
 • 1150 हुन अधिक प्रवेश परीक्षा
 • 1120 हुन अधिक शिष्यवृत्ती संधी विषयी माहिती Maha Career Poratl मधून मिळते.
 • विविध क्षेत्रनिहाय Category wise आपणास कोर्सेस शोधता येतात. उदा. एज्युकेशन आणि टिचिंग मध्ये पुन्हा sub category आणि मग आपल्याला हवा तो पर्याय निवडून आपण त्याबद्दलची माहिती घेऊ शकतो. प्रत्यक्ष लॉगिन केल्यावर आपणास या सर्व गोष्टी लक्षात येतील.
 • सर्व माहिती मराठी मध्ये उपलब्ध आणि इतर कोणाला इतर भाषेत बघायची असेल तरी देखील आपण इतर भाषा सिलेक्ट करून पाहू शकता.
 • करिअर मध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळवू शकता, त्यासाठी शैक्षणिक पात्रता ,कॉलेज महाविद्यालयाची माहिती , शिष्यवृत्ती माहिती , भविष्यातील संधी , तुम्ही किती पैसे कमवू शकता. कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा विषयी , आवश्यक क्षमता , नोकरीच्या संधी अशा विविधांगी परिपूर्ण माहिती आपणास महाकरियर पोर्टल वर अगदी मोफत मिळेल.
 • विविध कोर्सेस दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे का? याबाबतची माहिती दिव्यांग प्रकार निहाय उपलब्ध आहे. जे की दिव्यांग विद्यार्थ्यांना कोर्सेस निवडण्यासाठी मदत होईल.
 • महा करिअर पोर्टल हे Android app मध्ये देखील Maharashtra Career app म्हणून उपलब्ध आहे. ते आपण डाउनलोड करू शकता.

Maha Career Portal Login कोण करू शकते?

 • इयत्ता 9 वी ते 12 वीत शिकणारे सर्व माध्यमाचे विद्यार्थी लॉगिन करून माहिती घेऊ शकतात.
 • इयत्ता 9 वी ते 12 वीला शिकवणारे वर्गशिक्षक आणि संबंधित शाळा , कॉलेज ,महाविद्यालय मुख्याध्यापक , प्राचार्य लॉगिन करून आपल्या शाळा , महाविद्यालयाचा रिपोर्ट पाहू शकतात.

Maha Career Portal Login करण्यासाठी काय आवश्यक आहे?   

 • विद्यार्थ्यांना - विद्यार्थ्यांचा सरल आयडी जो शाळेतून , कॉलेज मधून मिळेल. आणि सर्वांसाठी पासवर्ड 123456 हा आहे.
 • शाळा , कॉलेज , महाविद्यालय शिक्षकांसाठी 2 आयडी उपलब्ध आहेत. आणि मुख्याध्यापकांसाठी एक आयडी आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा आयडी हा शाळेचा UDISE Code आहे.

महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? How to Use Maha Career Portal ?

 • आपण विद्यार्थी असाल तर, आपल्या शाळा ,कॉलेज किंवा महाविद्यालयातुन आपला सरल आयडी घ्यावा. तो आपणास वर्गशिक्षक , मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्याकडून मिळेल.
 • आपण शिक्षक , मुख्याध्यापक ,प्राचार्य असाल तर आपल्याला दिलेला आयडी टाकून पुढील स्टेप follow करा. (HM , Principal आपला आयडी हा शाळेचा udise कोड असेल. आणि शिक्षकांसाठी Udise code आणि T1 ,T2 यापैकी एक असा आपला आयडी असेल.)
 • त्यानंतर आपण महा करिअर पोर्टल वेबसाईट Google Chrome ब्राउझर मध्ये ओपन करायची आहे. किंवा
 • आपण Maharashtra Career app मध्ये देखील लॉगिन करू शकता.
 • Apps मध्ये सध्या इंग्रजी भाषेत माहिती उपलब्ध आहे. (लवकरच मराठी भाषेत माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.)
 • मात्र Google Chome मधून पोर्टल मध्ये लॉगिन केल्यास आपणास मराठी भाषेत माहिती उपलब्ध आहे.
 • त्यानंतर https://mahacareerportal.com/ या वेबसाईटवर जाऊन लॉगिन आयडी मध्ये आपला आयडी प्रविष्ट करा. आणि 123456 हा पासवर्ड टाकून लॉगिन करा. Mahacareerportal official website 
 • आपल्या समोर करियर विषयी माहिती मिळवा , कॉलेज डिक्शनरी, परीक्षा डिक्शनरी, स्कॉलरशिप स्पर्धा आणि फेलोशिप डिक्शनरी असे वेगवेगळे पर्याय दिसतील हा होम डॅशबोर्ड अशा पध्दतीने आपणास दिसेल.
 • त्यामध्ये आता आपल्याला हवी ती माहिती शोधण्यासाठी आपण त्यावर क्लीक करावे.
 • उदा. करियर विषयी माहिती मिळवा यावर क्लीक केल्यास Professional Careers & Vocational Careers  पर्याय दिसेल त्याठिकाणी आपण प्रोफेशनल कोर्सेस आणि व्होकेशनल कोर्सेस मधील माहिती पाहू शकता.

maha career portal dashboard
 • प्रोफेशनल कोर्सेस मध्ये खालील पर्याय आपल्याला दिसेल.
 • आपल्या आवडीनुसार आपण एक पर्याय सिलेक्ट करावा. उदा. एज्युकेशन अँड टीचिंग हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला सब कॅटेगिरी दिसेल,
 •  त्यामधून आपण एक पर्याय निवडावा. उदा. याठिकाणी आपण प्रोफेसर अँड लेक्चरर हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आपणास याबाबतची संपूर्ण माहिती डॅश बोर्ड वर दिसेल.
 • त्यामध्ये करियर मध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळवू शकता? आवश्यक शैक्षणिक पात्रता? भविष्य मधील संधी? याद्वारे आपण किती पैसे कमवू शकता? याबाबतची शिष्यवृत्ती मधील संधी? आवश्यक क्षमता? नोकरीच्या संधी? अशा विविध प्रकारची माहिती आपण या मधून घेऊ शकता.त्यासोबतच कॉलेज आणि यूनिवर्सिटी, प्रवेश परीक्षा ही देखील माहिती आपण येथून घेऊ शकता. 

सारांश
एका महत्त्वाच्या टप्प्यावर आयुष्यामध्ये ध्येय निश्चित आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी च्या संधी कशा शोधायच्या? करियर कसे निवडायचे? याबाबत  Maha Career Portal  महाकरियर पोर्टल चा वापर करून करिअरचे पर्याय कोर्सेस, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, कॉलेजेस, महाविद्यालय यांची माहिती कशा पद्धतीने घ्यायची या विषयी ची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेतली आहे. याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन या उपलब्ध माहितीचा विद्यार्थ्यांनी करियर विषयक अधिक माहिती घ्यावी. जेणेकरून आपले स्वप्न साकार होतील. आणि आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करियर करून यशस्वी व्हाल. स्व-ची जाणीव व करिअर कसे निवडावे?  या संदर्भात देखील आपण यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये माहिती घेतली आहे. तो ब्लॉक आपण वाचला नसेल, तर खालील लिंक वर क्लिक करा आणि तो ब्लॉग देखील आपण अवश्य वाचा.

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 संपूर्ण माहिती  (RTE Admission Maharashtra) येथे वाचा

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24 (RTE Admission Documents List) येथे वाचा 

परीक्षेत पहिले येण्याचे तंत्र येथे वाचा

फ्लॅश नोटस् (Notes) कशा काढाव्यात येथे पहा  

हे सुद्धा वाचा

 
Previous Post Next Post