करिअर कसे निवडायचे ? | स्व ची ओळख Self Awarness | How to choose a career ?

नमस्कार मित्रांनो , करिअर हे प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण विषय आहे. प्रत्येक जण मग तो कोणत्याही वयोगटातील असो , एका विशिष्ट क्षेत्रात करिअर करण्यासाठी विचार करत असतो. त्यातील काही थोडकेच लोकं योग्य करिअर निवडून कामाला लागतात. विशेषतः इयत्ता १० वी व १२ वी नंतर करिअर निवडण्याचे योग्य वेळ असते. 

परंतु ज्यांचे शिक्षण पूर्ण होऊन देखील आज बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला प्राथमिक गरज म्हणून रोजगार मिळवण्यासाठी योग्य करिअर किंवा व्यवसाय कोणता करावा? कोणत्या क्षेत्रात काम करावं? मुलांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावं? याचा आपण शोध घेत असतो. जीवनामध्ये यशस्वी व्हावं. माझ्यामध्ये मध्ये काहीतरी आहे? मला जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे. असं मी काय केलं पाहिजे ? प्रत्येक जन हा शोध सतत घेत असतो. म्हणजेच काय? तर माझ्यात असे कोणत्या क्षमता आहेत?  या मी चा शोध म्हणजेच स्व ची ओळख होण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. तर आज आपण स्व ची ओळख Self Awarness , करिअर निवडताना ते कसे निवडायचे ? (How to choose a career ?)  स्वतः च्या आत मधील Hidden Potential कसे शोधायचे? शोधण्यासाठी या ब्लॉग मध्ये माहिती घेणार आहोत. 


{tocify} $title={अनुक्रमणिका}


Self Awarness

स्व ची जाणीव Self Awarness करिअर कसे निवडायचे ? How to choose a career ?

भाग-१

पुढे जाण्याआधी आपण MERAKI आणि MISOGI या दोन संकल्पना समजून घेवूया.

१. MERAKI संकल्पना 

जगातील कोणताही व्यक्ती , कोणत्याही वयोगटातील असो प्रत्येकाच्या आत मध्ये असं काहीतरी असतं? जे करताना तहान ,भूक सगळं विसरून जातो. आणि ती गोष्ट? करायला आवडते. म्हणजेच काय तर तन , मन , धनाने ती गोष्ट ती व्यक्ती करत असते. आणि हे प्रत्येकाच्या मध्ये दडलेलं असतं. हृदयापासून ती गोष्ट करत असतो. असं या MERAKI संकल्पनेत सांगितले आहे. त्यामध्ये आपण सुद्धा आहोत. मग हे स्वीट स्पॉट कोणते? आहे त्याचा आपण आज शोध घेणार आहोत. प्रत्येकामध्ये वेगवेगळे असतील मात्र प्रत्येकामध्ये असते. हे लक्षात घ्याव.

२. MISOGI संकल्पना

प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की , आयुष्यात नविन  काहीतरी करायचंय ? अशी ईच्छा असते. परंतु या MISOGI संकल्पनेत असं सांगितलंय की , प्रत्येक व्यक्तीला हटके , नवीन काही करण्यासाठी त्याच्या आतमध्ये अशी एक गोष्ट असते. की ती त्याला बाधा आणते. ती त्याला करू देत नाही. उदा. न्यूनगंड , बाधा आणणारी जी गोष्ट असते. ती या MISOGI संकल्पनेत सांगितले आहे.

मी नविन काही करायचं , तर आपल्या मनात सर्वात मोठी भीती म्हणजे लोक काय म्हणतील? या भीतीनेच आपण नविन एखादी गोष्ट करत नाही. सबसे बडा रोग , क्या कहेंगे लोक. 

आपल्याला जेव्हा स्वतः मधील  MERAKI म्हणजे  आणि MISOGI समजतील तेव्हा आपल्याला जे नविन करायचं आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. ते आपल्याला करता येईल. 

१. करिअर

👉 करिअर = आवड + क्षमता + संधी

प्रत्येक टप्प्यावर आपल्या समोर उभा असणारा प्रश्न म्हणजे करिअर आपण बऱ्याचदा आवड , क्षमता आणि संधी हे शब्द ऐकत असतो. मला हे आवडतं? माझ्यात हि क्षमता आहे? वैगेरे म्हणून मी हे करिअर निवडलं परंतु जेव्हा आपल्याला स्व ची ओळख होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने योग्य करिअर निवडलं असे म्हणू शकतो. 

करिअर करण्यासाठी आवड , क्षमता आणि संधी या तिन्ही गोष्टी जुळवून येत असेल तेव्हा त्या क्षेत्रात करिअर होते. 

👉 करिअर आणि आयुष्याचा संबंध

एक उदाहरण - आपल्या आवडीचे एक क्षेत्र घ्या.

उदा. क्रिकेट 

क्रिकेट मध्ये TOP चा खेळाडू ? सचिन तेंडूलकर 

सचिन ला क्रिकेट आवडायचं ? हो लहानपणापासून त्याला क्रिकेट आवडत होते.  सचिन मध्ये क्रिकेट करण्याची क्षमता होती? हो खूप मेहनत घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. 12, 12 तास तो सराव करायचा. उन्हा तान्हात उभं राहून क्रिकेट खेळण्याची त्यात क्षमता होती . क्रिकेट मध्ये करिअर करण्याची संधी होती? हो त्यानं त्यावेळी ठरवलं होतं की मला क्रिकेट मध्ये आवड आहे. माझ्यात ती क्षमता आहे. आणि मला संधी पण आहे. म्हणून आज क्रिकेट चा उच्च खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. 

👉 स्वतः चे परीक्षण

याच बाबतीत आता आपण स्वतः चे परीक्षण करूया. मला क्रिकेट आवडतं का? हो मला क्रिकेट पाहायला खूप आवडतं. माझ्यामध्ये क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे का ? नाही. जास्त वेळ 12 , 12 तास उन्हा तान्हात मी  मैदानात क्रिकेट खेळू शकत नाही. मला जाणवतंय क्रिकेट मध्ये  मला काहीच संधी नाही. म्हणजे मला क्रिकेट आवडते. पण क्षमता नाही. आणि क्षमता नाही म्हणजे मग त्याच्यासाठी तेवढी संधी व नाही. असे आपणास स्वतः चे परीक्षण स्वतः करता येईल.

हे फक्त हा विषय समजण्यासाठी उदा. घेतोय प्रत्येकाचं याबाबत वेगवेगळे आवड, निवड क्षमता असू शकते.

कोणत्याही क्षेत्रात  करिअर करण्यासाठी  आवड + क्षमता + संधी या तिन्ही गोष्टी एकत्रित येणं आवश्यक आहे.

२. स्वप्न

  • आवड + संधी + (क्षमता) = स्वप्न

ज्याप्रमाणे करिअर निवडण्यासाठी वरील तीनही गोष्टी आवश्यक असतात. मात्र जेव्हा, आवड आहे मात्र क्षमता नाही. आणि संधी आहे. त्यावेळी ते  फक्त बनून राहते  स्वप्न , (आवडतं आणि संधी आहे म्हणून जर आपण शोध घेत असू तर ते फक्त स्वप्न आहे.)

जेव्हा एक पालक म्हणून आपण मुलांना आपल्या मनाप्रमाणे करिअर करण्यासाठी 

मार्गदर्शन करत असतो. तेव्हा ते आपलं स्वप्न बनून राहतं. मुलांच्या मध्ये काय आहे? त्यांच्यातील असलेलं स्व ओळख , क्षमता आणि Hidden Potential पाहत नाही. त्यामुळे मुलांना पुढे त्याच्या अडचणी येतात. आपण फक्त संधी आहे म्हणून त्याकडे बघत असतो. मात्र यासाठी आवड + क्षमता + संधी या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे जुळवून जर योग्य क्षेत्र निवडले तर मुलांना एक चांगले समजाउपयोगी क्षेत्र निवडता येईल. 

३. छंद

  • आवड + क्षमता + (संधी) =  छंद

आवड आहे क्षमता आहे परंतु संधी नाही. बरेचजण एखाद्या क्षेत्रात आवड आहे. तशी क्षमता देखील आहे मात्र संधी नाही. म्हणजे मग ते बनून राहते फक्त छंद

४. नोकरी

  • क्षमता + संधी + (आवड) = नोकरी

क्षमता आणि संधी आहे. मात्र आवड नाही. सर्वांच्या बाबतीत नाही परंतु बहुतांश जणांच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे. त्यांना नोकरी करण्यात आवड नाही. मात्र त्यांच्यात क्षमता आहे. आणि संधी मिळाली म्हणून ते नोकरी करत आहे. परंतु ते वरील सूत्रानुसार करिअर साठी आवड , क्षमता व संधी जुळवून येणे आवश्यक आहे.

  • आवड + क्षमता + संधी = करिअर
  • आवड + संधी + (क्षमता) = स्वप्न
  • आवड + क्षमता + (संधी) =  छंद
  • क्षमता + संधी + (आवड) = नोकरी

आपण करिअर ,स्वप्न , छंद आणि नोकरी याविषयी आवड ,क्षमता व संधी समजून घेतले. आता आपण विचार करूया की, सध्या यापैकी आपण काय करत आहे.? मी या क्षणाला  लेखन करत आहे. म्हणजे मी छंद जोपासत आहे. ब्लॉग लिहणे हा माझा छंद आहे. तुम्ही काय करत आहात? वाचन म्हणजे तुमचा छंद आहे म्हणून वाचन की , यशस्वी होण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी माहिती शोधत आहात?  इतर वेळी मी नोकरी करतोय . आपण इतर वेळी काय करत आहात? याप्रमाणे आपण स्वतः आपला शोध घ्यावा.

स्व ची जाणीव Self Awarness 

स्व ची ओळख करून घेतल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे? तर करिअर निवडण्यासाठी , नोकरी , व्यवसाय , छंद , आवड  या गोष्टी जाणून घेतल्यास स्वतः मध्ये कोणते Hidden Potential आहे. याचा शोध घेतल्यावर आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यास मदत मिळणार आहे. 

यासाठी आपण स्वतः आणि आपली मुले प्रत्येकाचे Hidden Potential स्व ओळख , क्षमता कोणत्या आहेत त्या तपासून पहाव्यात. यासाठी आपल्याला एका शांत ठिकाणी एक वही व पेन घेवून बसायचे आहे. आणि खाली दिलेल्या कृती नुसार आपण स्वतः आदर्श उत्तर न देता , जास्त विचार न करता , जे तुमचे खरे उत्तर असेल तेच तुम्हाला लिहून काढायचे आहे.

१. मला काय काय आवडतं?

मला काय काय आवडतं? हा प्रश्न स्वतः ला विचारा आणि वहीमध्ये यादी करायला सुरुवात करा. आपल्याला जे जे काही आवडते. ज्या क्षेत्र , विषय सर्वकाही तुम्हाला जे आवडतं. ते सर्व लिहून काढा.  तुमची यादी कितीही मोठी होऊ शकते. उदा. १०० विषयांची आवड यामध्ये  क्रिकेट , प्राध्यापक ,फिल्म , शिक्षण , मनोरंजन , लेखन , वाचन वैगरे विषय येतील .ज्या ज्या गोष्टी आवडतात त्याचा  जास्त विचार न करता जेवढं सगळं आवडतं ते लिहून यादी तयार करणे.  

स्वतः मधील आवड ओळखण्यासाठी एक छोटीशी टिप्स जी गोष्ट केल्याने आपल्याला कंटाळा येत नाही. वेळात वेळ काढून आपण ती गोष्ट करण्यास उत्सुक असतो. त्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्यातील आवड..

२. यादी मधील मला काय जमतं?

आता तुम्ही स्वतः ला आवडणाऱ्या गोष्टींची यादी केली. जे काही आवडतं ते आपण आपल्या वहीत लिहून काढलंय , आता स्वतःला या यादीतील मला काय आवडतं? हा प्रश्न विचारायचा आहे. 

तुमची जर आवड मध्ये 100 ची यादी झाली असेल तर आता या 100 च्या यादीतील मला कोणत्या गोष्टी करायला जमतात. या वेगळ्या काढायच्या आहेत. किंवा त्यावर टिक करायची आहे.

उदा. 1. मला गाणी गायला खूप आवडते. पण जमत नाही. 2. क्रिकेट पहायला आवडतं, पण खेळायला जमत नाही.

याप्रमाणे यादीतील काय करायला जमतं? ते बाजूला काढायचं आहे. म्हणजे 100 च्या यादीतील आता 50 गोष्टी बाजूला निघाल्यात. म्हणजे 100 गोष्टी आवडतात मात्र त्यातील 50 गोष्टी च करायला जमतात. 

३. काय समाजाच्या उपयोगाचं आहे?

उत्तरे काढताना फार जास्त विचार करायचा नाही. आता आपण काय आवडतं ते शोधलं. आवडत्या गोष्टींच्या यादीतून काय जमतं? हे बाजूला केलं. आता आपल्याला काय जमतं ? या यादीतून समाजाच्या उपयोगाचं काय आहे? हा प्रश्न स्वतः ला विचारायचा आहे? आणि या क्षणाला कसलाही विचार न करता. फक्त लक्ष यादीतील समाजाच्या उपयोगाचं काय आहे? तेच फक्त बाजूला काढायचं आहे. यामधून समाजाची गरज भागणार आहे का? या गोष्टी चा विचार करून समाजाच्या गरजेच्या गोष्टी बाजूला काढायच्या.

म्हणजे आता 50 च्या यादीतून कदाचित 10 ते 12 च गोष्टी राहतील. आणि हे सर्व एका शांत ठिकाणी बसून स्वतः वहीत लिहून काढायचे आहे.

४. मला आणि समाजाला यातून काय मिळणार आहे?

आता आपण स्व च्या क्षमता आणि स्व ओळख च्या अगदी जवळ आहोत. आता आपल्याला समाजाच्या गरजेच्या गोष्टीतून कोणत्या गोष्टीत मला म्हणजे स्वतः ला आणि समाजाला काय मिळणार आहे? हे शोधणे. स्वतः ला पैसे मिळणार हा विचार सध्या इथे करू नका. याठिकाणी फक्त समाजाला आणि मला काय मिळणार ? याचा शोध घ्या.

शेवटी जे राहील तेच माझ्यातलं Hidden Potential आहे. माझ्यातला क्षमता आणि माझी स्व ची ओळख आपल्याला होईल.

आता आपण स्वतः मधील क्षमता आणि स्व ची ओळख करून घेतली. हे Hidden Potential कधी बाहेर येतं.? हे कधी आपल्याला समजते किंवा ओळखायचं कसं? हे ओळखण्यासाठी 4 self आपण पाहूया.

१. Open Self

आपल्या विषयी प्रत्येक गोष्टीची माहिती स्वतः ला व इतरांनाही माहिती असणे. म्हणजे ओपन सेल्फ , जेवढं आपण मोकळं लोकांसोबत मिक्सप होऊन राहतो. तेव्हा दुसऱ्यांना आपल्या विषयी संपूर्ण माहिती राहते. आपण ओपन सेल्फ राहून ही जर स्वीट स्पॉट बाहेर येत नसतील तर ते असतं...

२.Hidden self

स्वतः माहिती असते. मात्र दुसऱ्याला माहिती नसणे. आपल्या स्वतः ला स्वतः मध्ये असणाऱ्या क्षमता माहीत असतात. मात्र आपल्या संपर्कातील लोकांना माहिती नसते. आपण काय करतो. की, आपल्यातल्या काही गोष्टी स्वतः पुरत्याच मर्यादित ठेवतो. आपल्याला वाटत असतं की, मी जर गोष्ट सांगितले तर लोकं त्याचा उपयोग करून घेतील. कधी कधी मोकळ्या मनाने जे आहे ते बाहेर काढायचं म्हणजे स्वतः मधलं बाहेर काढल्यावर त्यात स्वतःचाच फायदा जास्त असतो. 

हा Hideen self कधी निघेल? जस जसं आपण काम करत राहू , आपल्याला अनुभव येईल. Self विषयी आपण स्वतः काम करत राहू तेव्हा हा Hideen self बाहेर निघेल.

३. Blind self

स्वतःला माहिती नसणे. मात्र दुसऱ्याला माहीत असते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याचे शिक्षक त्याला मार्गदर्शन करत असतात. तुझ्यामध्ये हे गुण आहेत तू या क्षेत्रात करिअर करू शकतोस. किंवा आपल्या बाबतीत आपला जवळचा मित्र किंवा सहकारी आपल्याला सांगतात. की तू यात करिअर , व्यवसाय  , काम कर तुला ही गोष्ट छान जमते. हे स्वतः मध्ये असणारे Blind self विषयी आपल्याला आपल्या संपर्कातील सहकाऱ्यांनकडून माहीत करून घेणे. किंवा आपले नर निरीक्षण चांगले असेल म्हणजे आपण लोकांसोबत  वावरताना आपल्याविषयी लोकं काय ,केंव्हा ,कधी ,कसे? बोलतात. यावर जर आपण लक्ष ठेवलं तर आपल्याला स्वतः मधील असणारे क्षमता माहिती होतील. Blind self ला बाहेर काढण्यासाठी जेवढं आपण लोकांसोबत मिक्स होऊ ,काम करू , बोलू तेव्हा हा Blind self बाहेर येण्यास मदत होईल आणि आपल्याला स्वतः विषयी माहिती होण्यास मदत होईल.

४.Unknown self

स्वतःला आणि इतरांना ही आपल्या विषयी काहीच माहिती नसणे.  आपलं वय वाढत जातं, आपण शिक्षण घेत असतो. परंतु आपल्याला स्वतः मधल्या क्षमता लक्षात येत नाही. मात्र एक दिवस असा येतो की अचानक चमत्कार झाल्यासारखे वाटतं, की ही व्यक्ती अमुक अमुक क्षेत्रात काम करत होती. मग अचानक एवढ्या उच्च स्तरावर पोहचली कशी? एखादी घटना अशी घडते. की एकदम वरच्या स्तरावर झेप घेतली जाते. हे स्वतःला आणि इतरांना ही माहिती नसते. परंतु हा 6 सेन्स कधी बाहेर येईल हे आपण सांगू शकत नाही. आपण फक्त आपलं काम प्रामाणिक पणे नियमितपणे फोकस ठेवून करत राहायचं. 

Self Awareness 

मग आपल्याला स्वतः विषयीची जाणीव निर्माण होते. स्वतः बद्दलची नेमकी माहिती , स्वतःची बलस्थाने , उणिवा यांची जाणीव व्हायला लागते. आणि मग आयुष्यात निर्णय क्षमता , ध्येय निश्चित आणि ध्येय साध्या करण्याकडे या सर्व गोष्टी वर आपल्याला काम करता येतं. यासाठी सर्व प्रथम आपल्याला Self Awareness वर काम करायचं.  स्वतःच्या मर्यादा , आवडीनिवडी त्याचबरोबर स्वतः मधील विकनेस कोणते? आहे हे सर्व लिहून काढणे. 

ज्या व्यक्तीला स्वतःची जाणीव आहे. Self awareness आहे. ती व्यक्ती निरोगी समजावं. उदा. Self awareness उदाहरण म्हणजे  युवराज सिंग (कॅन्सर) असून देखील आजारावर मात करत क्रिकेट खेळणं. हे कशामुळे शक्य झालं. स्वतः मध्ये असणारा self awareness आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी self awareness खूप महत्त्वाचा आहे.

Life Mission Statement 

प्रत्येक यशस्वी नावाजलेल्या कंपन्यांचं एक Mission Statement  असते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने एक मिशन स्टेटमेंट निश्चित करायला हवे.

उदा. Facebook चे Mission Statement आहे. Facebook helps you connect and share with the people in your life.  असे प्रत्येकाचा एक मोटो मिशन स्टेटमेंट असावे.  

आनंदी, समाधानी निरोगी व सक्रिय दीर्घायुष्य सेवाभावासह जगणे. हे एक Life Mission Statement होऊ शकत. 

सारांश

आजच्या ब्लॉग मध्ये आपण करिअर कसे निवडावे? स्व ची जाणीव , क्षमता आणि  Hidden Potential कसं बाहेर काढायचं , त्याचा शोध कसा घ्यायचा ४ सेल्फ आपण समजून घेतले. नक्कीच आपणाला Self awareness साठी याची मदत होईल आणि एक चांगल्या क्षेत्रात आपण योगदान द्याल. 

धन्यवाद!


Previous Post Next Post