RCI E Online Registration | आर सी आय ई ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

RCI E Online Registration


{tocify} $title={Table of Contents}


RCI E Online Registration | आरसीआय ई ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

प्रस्तावना

भारतामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार दिव्यांग व्यक्तींची लोकसंख्या ही 2.68 कोटी इतकी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात दिव्यांग व्यक्तीची लोकसंख्या ही 2.21% आहे. यामध्ये अंध, कर्णबधिर, दृष्टीदोष, अस्थिव्यंग, मतिमंद आदी दिव्यांग/अपंग व्यक्तींचा समावेश आहे.

REHABILITATION COUNCIL OF INDIA (A Statutory Body of Ministry of Social Justice and Empowerment) Department of Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan) Government of India सामाजिक न्‍याय एवं अधिकारिता मंत्रालय का दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग मार्फत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व पुनर्वसन करण्यासाठी वेगवेगळे  कार्यक्रम, धोरणे व कायदे शासन स्तरावरून राबवण्यात येते.

त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी असणारा समान संधी, हक्क संरक्षण व संपूर्ण सहभाग RPWD Act पूर्वीचा PWD Act 1995 आता नविन ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’  RPWD Act 2016 मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण व पुनर्वसनासाठी भारतीय पुनर्वसन परिषदेची (REHABILITATION COUNCIL OF INDIA) RCI ची स्थापना करण्यात आलेली आहे.

दिव्यांग/अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या शाळेत किंवा त्यांना शैक्षणिक सेवा प्रदान करण्यासाठी तसेच विशेष शिक्षणातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ यामध्ये सेवा देण्यासाठी (Special Education) Ded/Bed/Med , Diploma किंवा Degree कोर्स करणे आवश्यक असते. 

त्यामध्ये Hearing Impairment , visual impairment , mental retardation (intellectual disability) स्पेशल एज्युकेशन मधून  कोर्स करता येतो. हा कोर्स केल्यानंतर Rehabilitation Council of India (RCI) भारतीय पुनर्वसन परिषद १९९२ मार्फत नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. तेव्हा आपण कायदेशीररित्या दिव्यांग व्यक्तींसाठी सेवा देऊ शकतो. यासाठी Fresh Registration, Renewal of Registration, Addition of Qualification, Duplicate Certificate, Correction in Certificate (change of name, address, etc.), Good Standing Certificate, Visa Screening (including overseas postal charges) इत्यादी कारणांसाठी नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी यशस्वीपणे झाल्यानंतर RCI प्रमाणपत्रावर एक CRR नंबर असतो. तोच आपला RCI नोंदणी क्रमांक होय. CRR म्हणजे  Central Rehabilitation Register होय.

दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत भारतीय पुनर्वसन परिषद (RCI) ने नविन RCI E Registration Portal सुरु केले आहे. त्यांतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने डिजीटल स्वरुपात RCI E Certificate मिळते. तर आज आपण या नविन RCI E Registration Portal द्वारे आरसीआय ई ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कशी आहे. आणि आरसीआय  नोंदणी कशी करावी संदर्भात जाणून घेऊया.

Rehabilitation Council of India (RCI) | भारतीय पुनर्वसन परिषद १९९२


भारतीय पुनर्वसन परिषद (RCI) ही 'दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय' भारत सरकार अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे.

भारतीय पुनर्वसन परिषद (RCI) ची स्थापना 1986 मध्ये झाली. भारत सरकारने सप्टेंबर 1992 मध्ये RCI Act 1992 संसदेत मंजूर करून तो लागू केला. आणि 22 जून 1993 रोजी भारतीय पुनर्वसन परिषद (RCI)  ही  वैधानिक संस्था बनली. RCI Act संसदेने सन 2000 मध्ये या कायद्यात सुधारणा केली.

RCI चे मुख्य कार्य हे अपंग व्यक्तीला दिलेल्या सेवांचे नियमन आणि त्यावर देखरेख करणे, विशेष शिक्षण अभ्यासक्रम प्रमाणित करणे आणि दिव्यांग व्यक्तीचे पुनर्वसन आणि विशेष शिक्षण क्षेत्रात सर्व पात्र व्यावसायिकांचे आणि वैयक्तिक कामकाजाचे भारतीय पुनर्वसन नोंदणी करणे. अपंग व्यक्तींसाठी सेवा प्रदान करणाऱ्या अपात्र व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाईची तरतूद या कायद्यात आहे.

The Rehabilitation Council of India(RCI) was set up as a registered society in 1986.On September,1992 the RCI Act was enacted by Parliament and it became a Statutory Body on 22 June 1993.The Act was amended by Paliament in 2000 to make it more broadbased.The mandate given to RCI is to regulate and monitor services given to persons with disability,to standardise syllabi and to maintain a Central Rehabilitation Register of all qualified professionals and personnel working in the field of Rehabilitation and Special Education.The Act also prescribes punitive action against unqualified persons delivering services to persons with disability.

हे ही वाचा

RCI Registration Fees |आर सी आय नोंदणी शुल्क 

RCI नविन नोंदणी Fresh Registration , RCI नूतनीकरण RCI Renewal Of Registration, Addition कोर्स नोंदणी Addition Of Qualification, डुप्लिकेट प्रमाणपत्र Duplicate Certificate, प्रमाणपत्रातील नाव,पत्ता बदल Correction in Certificate (change of name, address, etc.) , चांगल्या प्रतीचे प्रमाणपत्र Good Standing Certificate आणि Visa Screening (including overseas postal charges) या कारणांसाठी आपण RCI नोंदणी करतो. यासाठी १ एप्रील २०१७ पासून सोबतच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे RCI Registration साठी शुक्ल  आकारण्यात येते. शुल्क भरण्याआधी आपण RCI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊनच शुल्क भरावे. वेळोवेळी बदल झालेला बदल अपडेट माहिती साठी  RCI Official Website ला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.

Fee structure regarding Registration

Sr.No.

Details of fee structure

Revised Fee (Rs.)

(w.e.f. 1st April 2017)

1.

Fresh Registration

1000

2.

Renewal of Registration

500

3.

Addition of Qualification

1000

4.

Duplicate Certificate

1000

5.

Correction in Certificate

(change of name, address, etc.)

500

6.

Good Standing Certificate

1500

7.

Visa Screening (including overseas postal charges)

3000



RCI Registration Instructions | आर सी आय नोंदणी मार्गदर्शक सूचना

नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे , फोटो, सही, पेमेंट, अकाउंट नंबर, पत्ता इतर आवश्यक सर्व महत्वाच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी येथे क्लीक करा.

RCI Registration Authentication Letter | आर सी आय नोंदणी प्रमाणीकरण पत्र

विशेष शिक्षणातून (special education) संबंधित कोर्स केल्यानंतर ज्यावेळी आपण RCI नोंदणी साठी अर्ज करतो. तेव्हा आपणास आपण ज्या अभ्यासकेंद्रामधून कोर्स पूर्ण केला आहे. त्या Study Center चे Authentication Letter द्यावे लागते तरच पुढील प्रक्रिया यशस्वी होते.


RCI E Online Registration Procces | आर सी आय ई ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत भारतीय पुनर्वसन परिषद (RCI) Rehabilitation Council of India द्वारा नविन RCI E Registration Portal सुरु केले आहे. सध्या सगळीकडे Digitailazation होत आहे. यामुळे कोणतेही काम अधिक जलद गतीने होत आहे. आर सी आय ई पोर्टल द्वारे आता आपल्याला RCI प्रमाणपत्र सहज मिळणार आहे. त्यासोबतच इतर सुविधा देखील या पोर्टल च्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. यासाठी RCI E Registration Portal वर आपली नोंदणी करून नविन खाते तयार करून एक RCI User Name आणि Password तयार केल्यानंतर RCI e- Registration Portal मध्ये आपण लॉगीन करून नविन नोंदणी किंवा RCI Renewal Of Registration इतर सेवेचा लाभ घेता येतो.

नविन नोंदणी करणाऱ्या Special Educator व्यावसायिकांना सर्वप्रथम RCI E Registration Portal वर खाते काढण्यासाठी खालील माहिती भरावी लागेल. 

>> RCI E Registration Portal वर जाण्यासाठी सर्वप्रथम RCI Official Website ला भेट         द्या. http://www.rehabcouncil.nic.in/

>> त्यानंतर डाव्या बाजूस  Online Registration In The CRR या फोटो ला क्लिक करा. किंवा

>> RCI E Registration Portal Click Here  http://rciregistration.nic.in/rehabcouncil/

>> नविन खाते तयार करण्यासाठी Login बटनावर क्लिक करा त्यानंतर खालच्या बाजूस Sign up वर क्लिक करा.

>> आता एक पॉपअप ओपन होईल, जर आपल्याकडे RCI Registration नोंदणी क्रमांक असेल तर YES किंवा NO वर क्लिक करून Submit करा.

>> आपल्याकडे RCI Registration नोंदणी क्रमांक असेल आणि YES वर क्लिक केले असल्यास आपला CRR नंबर आणि नाव दिसेल त्यानंतर सर्व माहिती भरून एक पासवर्ड तयार करा. आणि Submit करा.

  • First Name 
  • Middle Name 
  • Last Name 
  • Email 
  • Mobile No 
  • Aadhaar No 
  • Your password 
  • Please confirm your password

>> आता आपल्याला मेल ID वर एक OTP आला असेल तो टाका आणि captcha code टाकून पुन्हा Submit करा. 

  • Enter OTP 
  • Enter the text form image. Letters are case sensitive

>> आता आपले RCI E Registration यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल.

>> आता पुन्हा RCI E Registration Portal वर जाऊन Login करा. त्याठिकाणी तुमचा Mail ID आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाकून लॉगीन करा. 

RCI E ONLINE Registration Portal Dashboard

>> Login केल्यानंतर अशा पद्धतीने Dashboard दिसेल यामध्ये आपले नाव , फोटो, CRR नंबर इतर माहिती दिसेल.

>>  Online Application, Applications Status, Download e-Certificate, Personal Information, Check CRE Points Status, Repayment इत्यादी सेवा आपल्याला मिळते.

>> RCI E ONLINE Registration Portal वर आपले खाते तयार झाल्यनंतर आपण Fresh Registration, Renewal of Registration, Addition of Qualification, Duplicate Certificate, Correction in Certificate (change of name, address, etc.), Good Standing Certificate, Visa Screening (including overseas postal charges) इत्यादी नोंदणी करू शकता.

>> त्याचबरोबर Online Applications Download, Authentication Certificate,  Applications Status Download e- Certificate,  Personal Information,  Check CRE Points Status हेही पाहता येते.

सारांश

RCI चे नवीन पोर्टल RCI E Online Registration Portal वरून आपली नोंदणी करून नविन नोंदणी Fresh Registration , RCI नूतनीकरण RCI Renewal Of Registration, Addition कोर्स नोंदणी Addition Of Qualification, डुप्लिकेट प्रमाणपत्र Duplicate Certificate, प्रमाणपत्रातील नाव,पत्ता बदल Correction in Certificate (change of name, address, etc.) , चांगल्या प्रतीचे प्रमाणपत्र Good Standing Certificate आणि Visa Screening साठी अर्ज करता येतो. तसेच Online Applications, Authentication Certificate, Applications Status, RCI e- Certificate Download, Personal Information, Check CRE Points Status पाहता येते.

Previous Post Next Post