चष्मा लागण्याची लक्षणे नेत्रदोष पूर्वतपासणी

Symptoms of glasses Eye defects pre-examination : पंचज्ञानेद्रीये (कान,नाक,डोळे,जीभ,त्वचा) याद्वारे आपण सर्वजण ज्ञान अवगत करत असतो. पंचज्ञानेद्रीये हेच आपल्या शिकण्याचे माध्यम आहे. यामध्ये डोळे हे ज्ञानेद्रीय महत्वाचे असून एका संशोधनानुसार डोळ्याद्वारे ७५% , कानाद्वारे १३% आणि जीभ,नाक ,त्वचा याद्वारे १२% ज्ञान आपल्याला मिळते. यामध्ये देखील जर एखाद्या व्यक्तीचे एखादे ज्ञानेद्रीय निकामी असेल तेव्हा इतर उर्वरित ज्ञानेद्रीये द्वारे तो व्यक्ती शिकत असतो. आणि ही प्रक्रिया जन्मापासून ते संपूर्ण आयुष्यभर सुरु असते. 

डोळा हा एक नाजूक अवयव असून वर सांगितल्याप्रमाणे आपण जवळपास ७५% ज्ञान हे डोळ्याने ग्रहण करत असतो. मग आपण प्रत्येकाने डोळ्याची काळजी घेणे आणि योग्य वेळी उद्भवणाऱ्या समस्याचे निरासरण करून घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. आज आपण या लेखामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंतच्या डोळ्यासंबंधित दिसणारे शारीरिक लक्षणे कोणती आहेत?  चष्मा लागण्याची लक्षणे आणि नेत्रदोष पूर्वतपासणी कशी करावी? यासंबधीची माहिती पाहणार आहोत. त्याचा उपयोग आपणास डोळ्याचे निदान करण्यास होणार आहे. तेव्हा अवश्य काळजीपूर्वक हा लेख वाचावा.

$ads={1}

chashma lagnyache lkshane

चष्मा लागण्याची लक्षणे नेत्रदोष पूर्वतपासणी 

कोरोनाच्या दरम्यान दोन वर्षापासून शाळा,कॉलेज बंद होते. मुलांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी शिक्षण व्यवस्थे मध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये मुलांचा डिजीटल साधनाशी संपर्क आला त्यामध्ये टी.व्ही. मोबाईल, टॅबलेट, संगणक, स्क्रीन संबंधित इतर डिव्हाइसेस यांच्याशी मुलांचा मोठ्या प्रमाणात संपर्क आल्याने काही दिवसातच मुलांच्या डोळ्याचे आरोग्य संबंधी , डोळे दुखणे , डोळे जड पडणे , डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे अशा तक्रारी येऊ लागल्या. 

त्यामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत या काळात स्क्रीन समोर आपली कामे करू लागले. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना उदयास आली. हे सर्व सुरु असताना मात्र एकीकडे डोळ्यासंबंधी तक्रारी वाढू लागल्या. आजही मोठ्या प्रमाणात डोळ्याचे आजार उद्भवू लागले आहेत.

विदयार्थ्यांचे डोळे तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासले जावेत व शिक्षकांनीही विदयार्थ्यांच्या शिक्षणाविषयी कोणेतेही निर्णय घेताना डॉक्टरशी संपर्क साधून विचारविनिमय करणे आवश्यक झाले आहे.

आपल्या वर्गात दृष्टिदोष असणारे असेही विदयार्थी असू शकतील की ज्यांना दृष्टिदोष असणारे बालक म्हणून ओळखले गेलेले नाही. खालीलपैकी काही दर्शक आपल्याला वर्गातील दृष्टिदोष असणारे बालक ओळखण्यास मदत करतील व या बालकांना गरज असल्यास आवश्यक त्या सेवा मिळवून देण्यात मदत करता येईल.

 चष्मा लागण्याची नेत्रदोष (दृष्टीदोष) असण्याची शारीरिक लक्षणे  

डोळ्यासंबंधी काही समस्या असेल तर आपण डोळ्याची तपासणी करून जर आपली दृष्टी कमी झाली असेल त्यानुसार आपल्याला चष्मा देऊन त्यावर मात करता येते. चष्मा लागण्याची लक्षणे (नेत्रदोष पूर्वतपासणी) खालील लक्षणावरून आपण प्राथमिक तपासणी करू शकतो. त्यानंतर योग्य नेत्रचीकीत्सक डॉक्टरांना आपण वेळीच दाखवून घ्यायला हवे.

  • काही दिवसांपेक्षा अधिक काळ डोळ्यांच्या कडा लाल असणे, कठीण कवचासारखे वा सुजलेले डोळे.
  • डोळे जळजळ करणे.
  • सतत डोळ्यातून पाणी येणे.
  • पुन्हा पुन्हा येणारी रांजणवाडी.
  • डोळे (बुबुळे) सरळ एका रेषेत नसणे (तिरके दिसणे, दोन्ही डोळे एकाच ठिकाणी केंद्रित न होणे.)
  • डोळ्यातील तिरळेपणा
  • बुबुळात पांढरा अथवा करडा रंग असणे.
  • खाली ओघळणारी / पडणारी पापणी.
  • प्रकाशास नेहमीच संवेदनशील असणारे डोळे
  • तिरळेपणा, डोळे चोळणे, एक डोळा बंद करणे.
  • एक किंवा दोन्ही डोळे आत किंवा बाहेर वळलेले असणे. 
  • डोळे सामान्यपणे जसे दिसतात, तसे न दिसणे.
  • नेहमी डोळे दुखणे, डोळ्यांना खाज येणे.
  • वाचन करताना पुस्तक डोळ्याजवळ घेऊन वाचन करणे.
  • अस्पष्टता दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न करणे.
  • सतत वरचेवर डोळे चोळणे.
  • दृक् कार्य करताना एक डोळा बंद करणे अथवा झाकून घेणे.
  • काहीतरी पाहताना मस्तक तिरके झुकवणे वा वळवणे.
  • नीट दिसण्यासाठी पुढे झुकणे.
  • डोळ्यांची अती जास्त उघडझाप करणे.
  • प्रकाशाप्रती अनावश्यक संवेदनशीलता.
  • अधिक काळ दृष्टीच्या जवळ धरून करावयाच्या कामांमुळे येणारा चिडचिडेपणा. वस्तूंवर आदळणे वा अडखळणे.
  • कुठेही सहजगत्या न जाता येणे.
  • फलकावरील अक्षरे वाचण्यात अडथळा येणे.
  • वाचताना ओळीचा निदर्शक म्हणून ओळीखाली बोट ठेवणे.
  • सततची डोकेदुखी
  • दोन भुवया जवळ स्ट्रेस निर्माण होणे.
  • डोळ्यामध्ये मांस येणे.
  • लिहिताना वाचताना किंवा मोबाईलवर संगणकावर काम करताना डोळे दुखणे.

अशा प्रकारची काही लक्षणे जर आढळून आल्यास आपण नेत्रचिकित्सक (ophthalmologist) डॉक्टरांकडे जाऊन आपल्या डोळ्यांची तपासणी करायला हवी जेणेकरून लवकरात लवकर आपल्या डोळ्याची निदान होऊ शकेल आणि आपण डोळ्याची निगा राखू शकतो. आजच्या या आर्टिकल मध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या डोळ्यासंबंधित तक्रारी  असतात, त्याची काही चष्मा लागण्याची लक्षणे आढळून येतात या संबंधीची माहिती घेतली आहे. ही प्राथमिक लक्षणे असून जर वारंवार आपण या लक्षणांपासून त्रस्त असाल तर, लवकरात लवकर निदान करणे हे आवश्यक आहे. आशा करतो आपल्याला हे आर्टिकल आवडले असेल तर जास्तीत जास्त जणांनाही आर्टिकल शेअर करा आणि इतरांना मदत करा.

दिव्यांग प्रकार , अंध- अंशतः अंध , नेत्रदोष व्याख्या येथे वाचा


शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post