जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह 2022 | International Week of the Deaf (IWD)

सप्टेंबर महिना हा कर्णबधिर व्यक्तींच्या जागरूकतेचा महिना म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. सप्टेंबर महिन्यामध्ये कर्णबधिर व्यक्तींसाठी जागतिक कर्णबधिर दिन, जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह, जागतिक सांकेतिक भाषा दिन साजरे करण्यात येते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले जाते.

कर्णबधिरांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह हा सप्टेंबर महिन्यामध्ये जागतिक कर्णबधिर  जागरूकता सप्ताह International Week of the Deaf (IWD) म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 हा जागतिक कर्णबधिर सप्ताह म्हणून साजरा केला जात असून, 23 सप्टेंबर हा दिवस जागतिक सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक कर्णबधिर सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

जागतिक कर्णबधिर दिन हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यात येतो. यावर्षी २५ सप्टेंबर रोजी कर्णबधीर दिन साजरा केला जाईल.

जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह हा यंदा 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

'सांकेतिक भाषा' ही कर्णबदरांची प्रथम भाषा म्हणून ओळखली जाते कर्णबधिर व्यक्तींना ऐकायला न येणे किंवा बोलता न येणे यामुळे या व्यक्तींचे संभाषण हे सांकेतिक भाषेद्वारे होते. 

सांकेतिक भाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सांकेतिक भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

जागतिक सांकेतिक भाषा दिवस हा 23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.


जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह 2022 | International Week of the Deaf (IWD)


सांकेतिक भाषा दिन सप्ताह


संयुक्त राष्ट्र संघटनेने २३ सप्टेंबर हा दिवस "जागतिक सांकेतिक भाषा दिन" म्हणून घोषित केला आहे. तसेच सांकेतिक भाषेच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण होण्याच्या दृष्टीने "वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफ"  World Federation of the Deaf (WFD) यांनी या वर्षासाठीच्या जागतिक सांकेतिक भाषा दिनासाठी  “Sign Language unite us.” असे बोधवाक्य सुचवले आहे. 

“Sign Language unite us.”

"सांकेतिक भाषा हमें एकजुट करती है।"

"सांकेतिक भाषा आम्हाला एकत्र करते."

अशा पद्धतीने कर्णबधिर व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी, समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कर्णबधिर व्यक्तींचे कार्य सर्वांसमोर यावे त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे या उद्देशाने सप्टेंबर महिन्यामध्ये विविध दिन, सप्ताहाच्या निमित्ताने कार्यक्रम साजरे करण्यात येते.

जागतिक कर्णबधिर दिन, सप्ताह जागरूकता कार्यक्रम

जागतिक कर्णबधिर दिन , सप्ताहाचे औचित्य साधून कर्णबधिर व्यक्तींच्या बाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करता येतील.

 • कर्णबधिर लोकांच्या समस्यांविषयी सामान्य लोकांना माहिती करून देणे.
 • उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला - कर्णबधिर मुलांची/व्यक्तीची तपासणी करून घेणे.
 • कर्णबधिर लोकांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक संसाधने उपलब्ध करुन देणे. आवश्यक साहित्य/साधने उपलब्ध करून देण्यास मदत करणे. 
 • कॉकलीयर इम्प्लांट या शस्रक्रिया विषयी माहिती द्यावी त्यापासून होणारा लाभ समजावून सांगावा.
 • श्रवणयंत्र/स्पीच थेरेपी/श्रवण प्रशिक्षण याचे कर्णबधिरअसलेल्या व्यक्तीमध्ये महत्व पटवून द्यावे.
 • कर्णबधिरलोकांना आवश्यक म्हणून सांकेतिक भाषा शिकण्यास प्रोत्साहन देणे.
 • जन्मानंतर येणाऱ्या कर्णबधिरत्व समस्यांवर लोकांचे प्रबोधन करावे. 
 • 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे वयस्कर किंवा मोठ्या आवाजाच्या गोंगाटाच्या ठिकाणी काम करणारे अश्या लोकांना कानाच्या  समस्या होण्याचा धोका जास्त असतो. जनजागृती करणे.
 • कर्णबधीर विद्यार्थी/व्यक्तींचा सन्मान करणे.
 • बहिरेपणाचे लवकर निदान होण्यासाठी आवश्यक सेवा आरोग्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करुन देण्यात याव्या.
 • कर्णबधिर व्यक्ती /  सामाजिक कार्यकर्ते / स्पेशल एज्युकेटर / पालक / डॉक्टर / दिव्यांग क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती यांना आमंत्रित करणे.
 • याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी Common Sign Videos, ISL (Indian Sign Language) Dictionary, NCERT textbooks in ISL चे सार्वजनिक ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात यावे. 
 • लिंक - 
 • सांकेतिक भाषा दिनासंदर्भात कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसमवेत चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा अशाप्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.
 • सांकेतिक भाषेबाबत जागरुकता निर्माण करणारे साहित्य / पुस्तिका वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याचे वितरण करण्यासाठी मुद्रित करावे.
 • सांकेतिक भाषा दिनाबाबत जागरुकता करण्यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म, मोठ्या प्रमाणावर एस.एम.एस., व्हॉट्स अॅप यांचा व्यापक वापर करावा.
 • सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यासाठी कॅम्पस परिसरात सहजपणे नजरेस पडतील अशा ठिकाणी स्टँडीज तसेच फलक प्रदर्शित करावेत.
 • सांकेतिक भाषा दिनी सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत प्रदर्शित करावे. 
 • सांकेतिक भाषा दिनाच्या सादरीकरणाचे निवडक छायाचित्रे / मेडिया क्लिप्स केंद्र शासनास ईमेलद्वारे mediadepwd@gmail.com येथे पाठविण्यात यावीत. तसेच त्या विभागांच्या संकेतस्थळावरसुद्धा प्रदर्शित करण्यात यावे.


कर्णबधिर जागरूकता सप्ताह साजरा करण्यासाठी लागणारे आवश्यक ई-साहित्य | International Week of the Deaf (IWD)

1. सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत Video | National Anthem ISL NCERT.mp4 Video 

सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत Video - Download | National Anthem ISL NCERT.mp4 Video येथे डाउनलोड करा.

2. सांकेतिक भाषेतील अंक Numbers-1 mp4 Video 

सांकेतिक भाषेतील अंक Numbers-1 mp4 Video येथे डाउनलोड करा.

3. सांकेतिक भाषा Write up 

सांकेतिक भाषा Write up about Sign Language Day 08.09.2022.pdf DownloadWrit e up about Sign Language Day 08.09.2022.pdf

4. सांकेतिक भाषेतील शैक्षणिक व्हिडिओ  | DIKSHA App (ISL E-CONTENT)

सांकेतिक भाषेतील शैक्षणिक व्हिडिओ  | DIKSHA App  Access ISL Videos on DIKSHA pdf Download

ISL E-CONTENT OF NCERT TEXTBOOKS

(developed jointly by -ISLRTC & NCERT)

5. सांकेतिक भाषा इतर साहित्य | international day of sign languages Awareness Material

सांकेतिक भाषा इतर साहित्य | international day of sign languages Awareness Material DownloadW

6. सांकेतिक भाषा बोधवाक्य व्हिडिओ 

 सांकेतिक भाषा बोधवाक्य व्हिडिओ  डाउनलोड करा.

7. सांकेतिक भाषेतील Alphabet 

सांकेतिक भाषेतील Alphabet व्हिडिओ डाउनलोड करा.


जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह वारंवार विचारले जाणारे प्रश्न | World Deaf Awareness Day Questions

प्रश्न - कर्णबधिरांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह काय आहे? | What is the International week of deaf people?

उत्तर - कर्णबधिरांच्या दैनंदिन जीवनात कर्णबधिर लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कर्णबधिर ऐक्याची आणि एकत्रित जागतिक चळवळ म्हणून कर्णबधिर जागरूकता सप्ताह साजरा केला जातो.

प्रश्न - जागतिक कर्णबधिर सप्ताह सर्वप्रथम केव्हापासून साजरा करण्यात येतो?

उत्तर - जागतिक कर्णबधिर सप्ताह 1958 पासून साजरा करण्यात येतो. 

प्रश्न - जागतिक कर्णबधिर सप्ताह 2022 मध्ये कधी साजरा करण्यात येईल?

उत्तर - जागतिक कर्णबधिर सप्ताह 2022 मध्ये दिनांक 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत 'जागतिक कर्णबधिर सप्ताह' साजरा करण्यात येत आहे.

>> जागतिक कर्णबधीर सांकेतिक भाषा दिवस 2022 | international day of sign languages 2022 

>>  जागतिक कर्णबधिर महासंघ | यांच्या कार्याविषयी सविस्तर वाचा

हे सुद्धा वाचा

>> कर्णबधीर व्यक्तीचे प्रमाणपत्र कसे काढावे? | UDID Card Hearing Impairment

>> समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांचे शिक्षण 

>> दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार कर्णबधीर व्यक्तीची व्याख्या (दिव्यांग २१ प्रकार)

>> अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

>> स्वावलंबन कार्डचे (UDID) फायदे 

>> २१ प्रकारातील दिव्यांग (अपंगा) विषयी वाचा सविस्तर


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post