Career : दहावी, बारावी नंतर करिअर 'कसे निवडावे' नव्हेतर 'कसे घडवावे' यासाठी पहा 5 महत्त्वाच्या टिप्स

How To Choose Right Career : दहावी, बारावी नंतर करिअर कसे निवडावे? कोणत्या क्षेत्रात करियर करावे? (How To Choose Career) हा सर्वसामान्य प्रश्न सर्वच विद्यार्थी आणि पालकांना पडलेला असतो, आजच्या लेखामध्ये तुम्हाला करिअर म्हणजे काय? आणि तुमचे असे कोणते क्षेत्र आहे? ज्यात तुम्ही Career करायला हवे, (How To Choose Your Career) याची माहिती मिळणार आहे.  तेव्हा हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचावा. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी हा लेख खूप महत्वपूर्ण आहे.

दहावी, बारावी नंतर योग्य करिअर 'कसे निवडावे' नव्हेतर 'कसे घडवावे' | How To Choose Right Career

How To Choose Right Career
How To Choose Right Career

प्रत्येकाच्या आयुष्यात एका टप्यावर आपल्याला योग्य करियर चे क्षेत्र निवडावे लागते. त्यामध्ये तर बहुतेक जण पारंपारिक घराणेशाही मध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले व्यवसाय निवडतात. डॉक्टर च्या मुलांनी डॉक्टर व्हावे, घरामध्ये आई वडिलांना सरकारी नोकरी असेल तर मग माझा पण मुलगा सरकारी नोकरीला लागावा, घरांमध्ये चालत आलेला पारंपारिक व्यवसाय असेल तर मुलांनी तो व्यवसाय पुढे चालू ठेवावा. अशी एक प्रकारची मानसिकता झालेली आहे. 

खूप कमी पालक आपल्या मुलांच्या कलेनुसार आवडीच्या क्षेत्रात करियर  करण्यास सांगतात. पण आता पहिल्या सारखे राहिलेले नाही. कौशल्य आधारित शिक्षण आणि नोकरी व्यवसाय हा मुलांच्या मध्ये असलेले स्कील , क्षमता त्यानुसार भविष्यात यशस्वी होता येईल. 

आयुष्याच्या एका वळणावर आपण जर योग्य करियर  क्षेत्रात प्रवेश केला तर भविष्यात त्यामध्ये निच्छित यश मिळते. आज आपण दहावी, बारावी नंतर करियर कसे निवडावे? (How to choose career after 10th & 12th)  याविषयीची माहिती पाहणार आहोत. 

दहावी, बारावी नंतर करियर कसे निवडावे? | How to choose a career after 10th & 12th?

स्वतःमधील कौशल्य, क्षमता ओळखणे आवश्यक

दहावी, बारावी नंतर करियर कसे निवडावे? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना आधी हे समजून घेणे योग्य राहील. की,  21 व्या शतकामध्ये शिक्षण घेत असताना, अर्थातच सध्या कौशल्य आधारित शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर भर दिसून येत आहे. दहावी, बारावी नंतर करियर निवड करण्यासाठी भविष्यातील संधी लक्षात घेऊन स्वतःमधील कौशल्य, क्षमता ओळखणे आवश्यक आहे. ज्यामुळे या स्पर्धेच्या युगात आपण यशस्वी होण्यास नक्कीच याची मदत होईल. 

आपण कोणत्याही टप्प्यावर असा 10 वी , 12 वी किंवा अगदी शालेय वयात आणि याहूनही पूढे आपले शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र आपण जॉब च्या शोधत आहात, काहीतरी करण्याच्या विचारात आहात. अशा वेळी आपल्यामध्ये कोणती क्षमता, कौशल्य आहेत. हे शोधावे लागेल जेणेकरून आपल्या कलेनुसार/ आवडीनुसार आपल्याला योग्य काम मिळेल. म्हणजेच योग्य क्षेत्रात करियर करता येईल.

स्वतःसाठी करियरचे योग्य क्षेत्र निवडण्यासाठी  आपल्याला मी चा म्हणजेच स्व चा शोध घ्यावा लागेल. याबाबत यापूर्वीच एक आर्टिकल लिहले आहे. त्याची आपणास स्व ची ओळख करून घेण्यास मदत होईल. त्यामध्ये स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमता कोणत्या आहेत? आपल्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे? याची चाचपणी स्वतः करता येईल तेव्हा स्व: ची ओळख हे आर्टिकल अवश्य वाचा. लिंक शेवटी दिलेली आहे.

करिअर चा सर्वसामान्य अर्थ

करियर का निवडायचे आहे? असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो. तेव्हा साहजिकच भविष्यात कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी चांगल्या क्षेत्रात पैसे कमावण्याचे मार्ग उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरून कुटुंबाचे पालनपोषण चांगल्या प्रकारे करता येईल, दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यास मदत होईल आणि समाजाचा एक नागरिक म्हणून संबंधित क्षेत्रात सेवा देण्याचे चांगले कार्य आपल्या हातून घडेल अशी प्रत्येकाची भावना असते.

करिअर निवडण्यापूर्वी या संकल्पना समजून घ्या

आपण इतरांना विचारतो की, आपण करियर कसे निवडले तेव्हा आपल्याला ऐकायला मिळते. माझे स्वप्न होते. मला या क्षेत्रात आवड आहे. तो माझा छंद देखील आहे. म्हणून हे क्षेत्र निवडले. या क्षेत्रामध्ये नोकरी लवकर मिळते. असे विविध कारणे आपण देत असतो. करियर निवडण्यासाठी आपल्याला स्वप्न,छंद,नोकरी आणि करियर या संकल्पना सविस्तर पणे समजून घ्याव्या लागतील. 

  1. आवड + क्षमता + संधी = करिअर
  2. आवड + संधी + (क्षमता) = स्वप्न
  3. आवड + क्षमता + (संधी) =  छंद
  4. क्षमता + संधी + (आवड) = नोकरी

१. स्वप्न = आवड + संधी + (क्षमता) 

ज्यावेळी आपण फक्त मला अमुक अमुक विषयात किंवा क्षेत्रात आवड आहे म्हणून करियर निवडतो मात्र त्या क्षेत्रात काम करण्याची मुळात आपली क्षमता नसेल  तर मग अशावेळी ते बनून राहत फक्त स्वप्न, प्रत्यक्षात स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी वरील तिन्ही गोष्टी एकत्रित जुळवून आल्यास आपले स्वप्न साकार होईल.

२. छंद = आवड + क्षमता + (भविष्यातील संधी) 

आवड आहे आणि माझी क्षमता देखील आहे. मात्र भविष्यात त्या क्षेत्रात संधी नाही अशावेळी तो बनून राहतो फक्त छंद

३. नोकरी = क्षमता + संधी + (आवड) 

आपण निवडलेल्या क्षेत्रात आपल्याला नोकरी तर लागते मात्र त्यामध्ये आपल्याला आवड नसते. आपल्या आवडीचे क्षेत्र वेगळेच असते. त्यामुळे योग्य करियर कसे निवडायचे? हे समजून घेण्यासाठी खालील सूत्र समजून घ्या.

४. करिअर = आवड + क्षमता + भविष्यातील संधी 

करियर म्हणजे काय? आणि करियर कसे निवडायचे? याचे उत्तर जवळपास आपल्याला मिळाले असावे. म्हणजेच
करियर निवडण्यासाठी आपल्याला असलेली आवड+ क्षमता+भविष्यातील संधी या गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करून स्वत:मधील क्षमतांचा शोध घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपण योग्य करियर निवडले असे म्हणता येईल.

आता आपल्याला करियर म्हणजे काय? आणि करियर निवडण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? याचे उत्तर मिळाले असेल आता आपण पाहूया दहावी, बारावी नंतर करियर निवडण्यासाठी महत्वपूर्ण ५ टिप्स

दहावी, बारावी नंतर करियर निवडण्यासाठी महत्वपूर्ण ५ टिप्स

》आपली आवड आणि क्षमता कोणत्या क्षेत्रात आहे त्याचा शोध घ्या. (एक यादी तयार करा)
》 भविष्यातील संधी कोणत्या क्षेत्रात आहेत? त्यांची माहिती मिळवा. (त्या क्षेत्रांची यादी तयार करा) यासाठी महाकरिअर पोर्टल ची मदत घ्या, ते सर्वांसाठी मोफत आहे. त्याची लिंक पुढे दिली आहे
》 अनुभवी/ यशस्वी लोकांशी चर्चा करा. (महत्वाचे मुद्दे लिहून ठेवा)
》आपण निश्चित केलेल्या करियर क्षेत्राचा मागील 5 वर्षातील आलेख कसा राहिला आणि भविष्यातील संधी याचा शोध घ्या.
》करियर निवडण्यासाठी महा करियर पोर्टल ची मदत घ्या. त्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाचे महाकरियर पोर्टल विद्यार्थ्यांसाठी ठरत आहे वरदान

सारांश

करियर कसे निवडावे? (How to choose career) मग ते १० वी नंतर असो किंवा १२ वी आयुष्याच्या एका मुख्य टप्यावर करियरचा निर्णय घेत असताना करियर कसे निवडावे? याविषयाची माहिती आज आपण घेतली. जेणेकरून भविष्यातील संधी ओळखून आपल्या आवडीनुसार आणि क्षमता नुसार करियर निवडण्यास मदत होईल. हे अजून विस्ताराने समजून घेण्यासाठी मी चा म्हणजेच स्व चा शोध घेण्यासाठी खालील आर्टिकल अवश्य वाचावे.

संबंधित 
अपडेट साठी  Whatsapp Group जॉईन करा.

                                                           

Previous Post Next Post