समावेशीत शिक्षण सातारा अभ्यास दौरा Inclusive Education study tour satara


inclusive education tour satara


समावेशीत शिक्षण सातारा अभ्यास दौरा Inclusive Education study tour satara


📆 दिवस पहिला


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत 100% मूल प्रगत करण्यासाठी विविध उपक्रम अभ्यास दौरा आयोजित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणजे अभ्यासदौरा खूप दिवसापासून मनात एक इच्छा होती. ज्याबद्दल सोशल मीडियाद्वारे, शिक्षक बांधवांकडून कुमठे बीट बद्दल  ऐकले होते. 

ज्ञानरचनावाद म्हणजे नक्की काय?   तिथे मुलांना कसे शिकवले जाते?  मुले कशी शिकतात?  मुलांचे मूल्यमापन कसे होत असेल ? तेथील शिक्षक गाव स्तरावरील छोट्या-मोठ्या आव्हानांना कसे सामोरे जात असतील ? इतर सहशालेय उपक्रम कोणते राबवितात ? विविध अध्ययन शैली च्या मुलांचा सहभाग कसा करून घेतात? असे असंख्य नाना विविध प्रकारचे प्रश्न कुमठे बिटातील ज्ञानरचनावादी वर्गाबाबत होते. आणि हे सर्व प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा देखील होती. आणि ही इच्छा DIECPD मार्फत पूर्ण झाली. विशेषतः समावेशीत शिक्षण अंतर्गत अभ्यासदौरा आयोजित केला. हे प्रथमच घडले. याबद्दल सर्वप्रथम DIECPD परिवाराचे खूप खूप आभार आणि धन्यवाद

नियोजनाप्रमाणे 22 मार्च व 23 मार्च 2019  असा दोन दिवसीय सातारा जिल्ह्यातील समावेशीत शिक्षण (ज्ञानरचनावादी शिक्षण) समजून घेण्यासाठी महाबळेश्वर व सातारा हे दोन तालुके निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये एकंदरीत सर्वसमावेशक शाळा भेट अभ्यासदौरा होता. 

अखेर सातारा जाण्याचा तो 🌤दिवस उजाडला  महाबळेश्वर ला जाण्याची ही चौथी वेळ परंतु यावेळेस जातानाचा अनुभव काही औरच खरं तर तीन वेळा महाबळेश्वरला जाऊन आलो. मात्र असं कधी वाटलं नव्हतं, की महाबळेश्वरच्या शाळेला भेट देता येईल , परंतु अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने महाबळेश्वरच्या शाळा भेट देण्याची ही सुवर्णसंधीच मिळाली होती.


मुंबई-गोवा हायवे रायगड जिल्ह्यातील  दक्षिण रायगड मधील शेवटचा तालुका पोलादपुर  पासून गाडीने लेफ्टन घेऊन गाडी महाबळेश्वर च्या दिशेने निघाली. वाटेत  प्रतापगड किल्ला बसमधूनच किल्ल्याचे दर्शन घेतले. 

महाबळेश्वर कडे जाणारा रस्ता म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये असलेला आंबेनळी घाट, नागमोडी वळणे, खोल दऱ्या, हिरवेगार डोंगर आंबेनळी घाट चढतांना आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहून मन हरवून गेले. पुस्तकात वाचलेला सह्याद्री पर्वत आंबेनळी घाट वळणावळणाची नागमोडी रस्ते, आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. जस जसे महाबळेश्वर जवळ येऊ लागले, तसतसे दृश्य  दाट झाडांनी  हिरवीगार जशी शालू पांघरली हवेचा गारवा हे खूपच मनमोहक दृश्य होते.

जेवणाची वेळ झाल्याने महाबळेश्वर च्या मागे काही अंतरावर सह्याद्री च्या कुशेत असलेले सह्याद्री हॉटेल मध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. हा क्षण खूपच स्मरणीय राहिला. ऐकेवेळी पुस्तकात वाचलेला सह्याद्री पर्वत, आंबेनळी घाट आज त्याच ठिकाणी भोजनाचा आनंद हा अनुभव खूप छान होता.
या दरम्यान  सातारा जिल्हा समनव्ययक समावेशीत शिक्षण व त्यांची टीम जॉईन झाली. व त्यांनी इथून पुढील सर्व भेट दर्शन घडवून आणली. त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार🙏🏻

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

जेवणानंतर पुन्हा महाबळेश्वर कडे प्रवास सुरु झाला. निसर्गाचे मनमोहक दृश्य न्याहळत, 
पश्चिम घाटामध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 1372 मी. उंचीवर असलेले महाबळेश्वर शहरात प्रवेश केला. सर्वत्र पसरलेले सह्याद्रीचे डोंगर, खोल दऱ्या आणि सर्वत्र पसरलेला निसर्ग सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले हे महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वपरिचित आहे. समस्त पर्यटकांचे लाडके हिलस्टेशन म्हणून जगप्रसिद्ध आहे.  महाराष्ट्राचे नंदनवन महाराष्ट्रातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध ठिकाण म्हणजे महाबळेश्वर येथे आम्ही पोहोचलो,  दुपारची तीन-साडेतीन ची वेळ शाळा पाच वाजता सुटणार म्हणून प्रथम शाळा भेट देण्याच्या नियोजनाप्रमाणे आमचे दोन ग्रुप तयार करण्यात आले. माझ्या ग्रुप मध्ये आम्ही तेरा जण होतो.

पहिला ग्रुप महाबळेश्वर चे देऊळ लगत असलेली जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यासाठी गेले व आमचा ग्रुप नगरपालिका शाळा क्र 5 भेट देण्यासाठी ठरले.
👇🏻

महाबळेश्वर नगरपालिका शाळा क्रमांक पाच मध्ये भेट देण्यासाठी आम्ही निघालो. रस्त्याने चालत असताना  घनदाट झाडी असलेले रस्ते स्वच्छ होते. आकर्षक घराची रचना  हे सर्व बघत असताना मध्येच जाणवलेला थंड गारवा खूपच छान होता. शाळेच्या परिसरात जाऊन पोहोचलो. नेमकीच शाळा सुटली होती. शाळेतील मुले रस्त्याने अगदी शिस्तप्रिय मौजमजा करत जात होती. शाळेचा गणवेश हा खूपच आकर्षक आणि सुंदर होता. समावेशित शिक्षणांतर्गत अभ्यास दौरा असल्याने त्यादृष्टीने निरीक्षण सुरू होते. विविध अध्ययन शैलीचे विद्यार्थी कोणते आहेत हे शोधत असताना  त्याच दरम्यान  श्राव्य अध्ययन शैली व बहुअध्ययन शैलीचे (LV, MR) काही विद्यार्थी मित्रांसमवेत घरी जात असताना दिसून आली. हसत खेळत मुले रस्त्याने जात होती. शाळेच्या गेट मध्ये प्रवेश करताच शाळेचे बाहेरूनच सुंदर शाळा असेल असा अंदाज आला. कारण  शाळेच्या भिंती हा बोलक्या होत्या ,त्यामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती फोटोग्राफ, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ,शालेय पोषण आहार, ज्ञानरचनावादी वर्ग फोटोग्राफ, शाळा व्यवस्थापन समिती कमिटी ,शालेय मंत्रीमंडळ अशी विविध शैक्षणिक महत्त्वपूर्ण माहिती शाळेच्या बाहेरील भिंतीवर दिसून आली.



महाबळेश्वर नगरपालिका शाळा क्र. 5

शालेय परिसर , वर्गभेट निरीक्षण व मुख्याध्यापक यांचे अनुभव कथन ठळक उल्लेखनीय बाबी*
👇🏻
➡ इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतची शाळा
➡ एकूण शाळेचा पट-189
➡ शाळेचा मूळ स्टाफ 2 इतर 4 एकूण- 6
मुख्याध्यापक , वर्गशिक्षक
शाळा व्यवस्थापन समिती मार्फत नियुक्त 4 त्यामध्ये 3 वर्गशिक्षक व 1 संगणक शिक्षिका
➡ महाबळेश्वर आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील 10 km आसपास च्या गावातील एकूण 189 मुले शाळेत आनंददायी पध्दतीने शिक्षण घेत आहेत.
➡ 2010 साली शाळेची पटसंख्या 36 होती. ती आज म्हणजे 2019 मध्ये 189 आहे.
➡ इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारे *60 विद्यार्थी मराठी माध्यमाच्या न.पा. क्र.5 महाबळेश्वर शाळेत दाखल झाले.
➡ शाळा व्यवस्थापन समिती SMC मार्फत अत्यावश्यक सेवा सुविधा
🔸4 शिक्षकांचे मानधन
🔸शाळेतील सर्व मुलांसाठी आकर्षक सुंदर गणवेश
🔸लॅपटॉप , संगणक
🔸 ट्रॅक सूट
🔸 गृहपाठासाठी वह्या उपलब्ध करून दिल्या.

➡ रोटरी क्लब फाउंडेशन मार्फत शाळेला 40 टॅब
➡ टॅब मार्फत आधुनिक पद्धतीने शिक्षण
➡ पालकांसाठी टॅब द्वारे प्रौढ साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. मुलांनी पालकांना टॅब द्वारे साक्षरतेचे धडे दिले.

➡ संगणक शिक्षिका मार्फ़त योगशिक्षण दिले जाते.
➡ आठवडी बाजार हा उपक्रम नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने राबविला मुलांच्या पालकांनी शेतात पिकवलेल्या भाजीपाला, धान्य प्रत्यक्ष गावात बाजार भरवुन मुलांना आठवडी बाजाराचे व्यावहारिक शिक्षण दिले , यातून मिळालेल्‍या नफ्यातून शाळेसाठी पालकांनी सहाय्य केले.
➡ प्रत्येक मुलाचा शाळेत वाढदिवस  साजरा केला जातो. त्यामध्ये भेट म्हणून पुस्तक  दिले जाते.
➡ वर्षभरातील जयंती-पुण्यतिथी इतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील मूलेच करतात.
➡ सौरभ करंडक स्पर्धेत दरवर्षी शाळेतील विद्यार्थी 60 ते 70% बक्षिसे मिळवतात.
➡ शाळेला ग्राउंड नाही. मात्र गावातील मैदानावर जाऊन मुलांची तयारी करून घेतली जाते.
➡ उल्लेखनीय कामाची पुणे आकाशवाणी ने शाळेची मुलाखत घेतली.
➡ शालेय सहल ही पालकासमवेत विद्यार्थी , शिक्षक अशी नाविन्यपूर्ण एकत्रित असते.
शालेय सहलीमध्ये सातारा जिल्हा संपूर्ण ओळख , मुंबई, कोकण , औरंगाबाद पर्यंत मुलांना क्षेत्रभेट निहाय मुलांना सहलीचा अनुभव दिला.
➡ कुटुंब सर्वेक्षण शाळेतील मुले करतात याचा मुख्य हेतू म्हणजे मुलांच्या व्यवहार ज्ञानामध्ये भर पडावी. त्यांना देखील कुटुंब सर्वेक्षण माहिती व्हावे
➡ छात्र सेवा उपक्रम यामध्ये 15 एप्रिल ते 1 मे पर्यंत शाळेतील सर्व कामे मुले करतात.
➡ शाळेतील उपस्थिती वार्षिक प्रमाण 95% आहे.
➡ ज्ञानरचनावादी वर्ग विषयनिहाय व घटक निहाय उपक्रम आहेत. 
➡ वर्गातील बोलक्या भिंती
➡ संगणक रूम
➡ग्रंथालय 

समावेशीत शिक्षणाबाबत चर्चा

➡ शाळेत अध्ययन शैली (cwsn) विद्यार्थी एकूण 15 आहेत.
➡ 15 पैकी शैक्षणिक आव्हाने 3 मुलांना जास्त आहेत. ते बहुअध्ययन शैलीचे विद्यार्थी आहेत.(MR, MD)
➡ बहुअध्ययन शैलीच्या विद्यार्थ्यांना परिपाठच्या वेळी पालक स्वतः घेऊन उपस्थित राहतात.
➡ पालकांशी सवांद साधला असता पालकांनी मुलाच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. 
➡ शैक्षणिक साहित्य (खेळणी) च्या माध्यमातून गरज व क्षमतेनिहाय अध्ययन अनुभव दिला जातो.त्यामध्ये पझल्स गेम, अक्षर जोडणे, आकार जोडणे असे अवधान केंद्रीत करण्यात येते. कविता गायनामध्ये सहभागी करून घेतले जाते.
➡ मुलाच्या प्रगतीबाबतच्या CCE नोंदी ठेवल्या जाते.
➡ क्षेत्रभेट हा उपक्रम घेण्यात आला. व मुलांना अनुभव देण्यात आला.


➡ शाळा माझी आहे. व शाळेत शिकणारे प्रत्येक मूल हे माझे आहे. हा विश्वास पालक व smc कमिटी मध्ये रुजवला.
➡ शाळेतील स्टाफ सुद्धा याच भावनेतून काम करत आहे. म्हणून च असे आनंदी दायी शिक्षण पद्धती आहे.

असे एकंदरीत शाळेचा परिसर वर्गखोली येथील स्टाफ पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे वाटले की जर नगरपालिका शाळेत एवढे सारे उपक्रम शिक्षक पालकांच्या मदतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राबवू शकतात. पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल कमी होऊन मराठी माध्यमाकडे वाढतो व शाळेतील मुलांच्या प्रगती बाबतचे समाधान व्यक्त केले जाते. त्यातही 189 मुलासाठी स्टाफ कमीच आहे. अशाही परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य महाबळेश्वर नगरपालिका शाळा क्रमांक  2 मध्ये सुरू आहे. याचे सर्व श्रेय मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शाळेतील सर्व स्टाफ यांना दिला. खरंच या नगर पालिका शाळा क्रमांक दोन मधील सर्व स्टाफ च्या कार्याला सलाम

 महाबळेश्वराच्या पंचगंगा मंदिराचे दर्शन घेतले कृष्णा, वेण्णा ,कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम स्थान याच ठिकाणी आहे. तेथील पंचगंगेचे देवळात जाऊन प्रत्यक्ष पंचगंगेचा उगमस्थान जवळून अनुभवले, सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे. तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. असे पंचगंगेचे उगमस्थान असलेले हे स्थान जवळून अनुभवास आले व अतिशय सुंदर या ठिकाणचे वातावरण होते.  पंचगंगा मंदिराच्या अगदी काही पावलावर शिवमंदिर आहे रुद्राक्ष आकाराचे स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे. या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.

 महाबळेश्वराच्या बाजारपेठेतील आकर्षक नक्षीकाम केलेल्या पांढरीच्या काठ्या, उत्तम नक्षी असलेल्या टोप्या, पर्स, स्ट्रॉबेरी चॉकलेट, जेली ,जॅम आकर्षक दुकानावर सजावट दिसून आली ती खूपच आकर्षक होती.

संध्याकाळची 7 ची वेळ सातारा येथे निवास व्यवस्था होती. त्यामुळे प्रवास साताऱ्याच्या दिशेने सुरू झाला. वाटेत मॅप्रो गार्डन बघण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा साताऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. बसमध्ये शाळा भेटी बाबत चे शेअरिंग सुरू झाले. व आपल्या कार्यक्षेत्रात असे आनंद दायी शिक्षण पद्धती सुरू करण्याविषयी विशेषतः समावेशीत शिक्षण अध्ययन शैली मुलांच्या समावेशनाबाबत ग्रुप मध्ये चर्चा करत करत कधी सातारा आले, कळलेच नाही. सातारा येथे भोजन करून यशोदा कॅम्पस सातारा येथे निवाससाठी थांबलो.
अशा पध्दतीने हसत खेळत अभ्यासदौऱ्याचा पहिला दिवस संपला.





दिवस-दुसरा



inclusive education study tour satara



डे केयर सेंटर सातारा Day Care Center Satara


समावेशीत शिक्षणातंर्गत डे केयर सेंटर भेट 

➡ डे केयर सेंटर मध्ये मुलांच्या गरजेनुसार बैठक व्यवस्था  केलेली होती. सिपी चेयर,मॉडीफाय चेयर, कॉर्नर सिटिंग चेयर 

➡ वर्गामध्ये शैक्षणिक साहित्य , बोलक्या भिंती , थेरेपी साहित्य उपलब्ध होते.

➡ पालक मुलांसोबत बसून थेरेपी व्यायाम देत होते.

➡ काही विद्यार्थी चित्र-शब्द कार्ड , मोबाईल द्वारे अध्ययन अनुभव घेत होते.

➡ रिसोर्स टीचर द्वारे मुलांना शैक्षणिक सपोर्ट व पालकांचे समुपदेशन केले जात होते.

➡ व्यावसायिक पूर्व कौशल्य डे केयर सेंटर मध्ये विकसित केले जातात. एका मुलीचे व्यावसायिक पुनर्वसन झाले आहे.

➡ रिसोर्स टीचर यांनी मुलांकडून आकर्षक ग्रीटिंग कार्ड, कापडी पिशव्या, वस्तू तयार केलेल्या आहे. ज्यातून मुले स्थिर होण्यास आणि आनंद मिळवण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा विकास यातून होतो.

➡ विद्यार्थी दुपार पर्यंत डे केयर सेंटर मध्ये असतात व दुपार नंतर शाळेतील वर्गात सहभागी होतात.

➡ डे केयर सेंटर मध्ये रिसोर्स टीचर यांनी मुलांच्या प्रगती बाबतच्या नोंदी व कृती आराखडा तयार केलेला आहे. त्याप्रमाणे त्यांच्या ऍक्टिव्हिटी वर्गात घेतल्या जातात.

➡ इतर केंद्रातून दर बुधवारी मुले डे केयर सेंटर मध्ये येतात.

➡ डे केयर सेंटर लगतच थेरेपी सेंटर आहे. तिथे मुलांना नियमित फिजिओथेरपीष्ट मार्फत थेरेपी दिली जाते.

➡ पालकांशी मुलांच्या प्रगती बाबत संवाद साधला असता त्यांनी समाधान व्यक्त केले.

➡ HBE जे विद्यार्थी घरी झोपून होते. त्यांना डे केयर सेंटर च्या माध्यमातून शाळेच्या प्रवाहात आणण्यात यश आले. 

➡ पालक , वर्गशिक्षक , सवंगडी , समाज यांच्या मध्ये असणारी असुरक्षित भावना या मुळे कमी होण्यास नक्कीच मदत होत आहे.

डे केयर सेंटरचे उत्तम उदाहरण म्हणजे डे केयर सेंटर सातारा 
डे केयर सेंटर मध्ये महत्वाची भूमिका बजावणारे रिसोर्स टीचर व त्यांच्या टीमच्या कार्याला सलाम

दिवस दुसरा समावेशीत शिक्षण सातारा अभ्यासदौरा Inclusive Education study tour satara
Previous Post Next Post