सेरेब्रल पाल्सी विद्यार्थ्याच्या जिद्दीला सलाम

Summer vacation activities article

सेरेब्रल पाल्सी विद्यार्थ्याच्या जिद्दीला सलाम 

उन्हाळी सुट्टीतील उपक्रम / कृती/अभ्यास  Summer vacation activities article

उन्हाळी सुट्टी उपक्रम

 उन्हाळा सुरू झाला की वेध लागते ते उन्हाळी सुट्टीचे मुलांना उन्हाळी सुट्टी म्हटलं की खूप आनंद होतो. उन्हाळी सुट्टीत मी हे करणार ते करणार मामाकडे , आत्याकडे गावी जाणार असं म्हणणारी मुले सुट्टी सुरू झाली की काही दिवसातच कंटाळा करायला लागतात.

एवढ्या मोठ्या सुट्टीच करायचं तरी काय हा प्रश्न सहाजिकच मुलांना त्यांच्या पालकांना पडणं स्वाभाविक आहे. खरंतर उन्हाळी सुट्टी जवळपास महिना-दीड महिना सुट्टी म्हणजे या दरम्यान पालक आणि मुलं यांच्यात नव्यानं नातं निर्माण करण्याची एक संधी असते.

मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे मुलांच्या विकासाच आकार देण्याची ही संधी आहे. वर्षभर मुलं शाळेत घरी अभ्यास करून एक प्रकारे थकलेले असतात. हा काळ म्हणजे विश्रांतीचा खरंतर ही विश्रांती फक्त पाठ्यपुस्तकांपासून थोडे अलिप्त राहणं. परंतु या काळात पालकांनी मुलांना करता येईल, झेपेल अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना गुंतून ठेवायला हवे.

 यामध्ये विशेषता विशेष गरजा असणारी मुले दिव्यांग मुलांना पालकांनी विशेष अनुभव देण्याची ही वेळ आहे. इतर मुलांच्या तुलनेत विशेष गरजा असणाऱ्या मुलांना थोडा अधिक चा अनुभव किंवा अधिक चा सराव घेणे आवश्यक असते .

त्यामध्ये विद्यार्थिनीहाय गरज लक्षात घेऊन हे जसे काही विद्यार्थ्यांना नियमित फिजिओथेरपीची आवश्यकता असते. काही विद्यार्थ्यांना स्पीच थेरपी ची आवश्यकता असते. हे मुलांच्या गर्जेनुरूप बदलत असते. मुलांची अत्यावश्यक गरज ओळखून मुलांना उन्हाळी सुट्टीतील अभ्यास पालकांनी करून घ्यायला हवा. हा अभ्यास म्हणजे शाळेचा असा अर्थ न घेता इतर ऍक्टिव्हि टी त्याची माहिती पुढे दिलेली आहे. त्यामध्ये सहभागी करून अनुभव दिल्यास मुलांमध्ये चांगली प्रगती होताना नक्कीच दिसेल.

त्यासोबतच सर्व प्रकारच्या सर्व मुलांना उन्हाळी सुट्टीत ऍक्टिव्हिटी summer vacation activity मध्ये गुंतून ठेवल्यास मुलांचा योग्य दिशेने सर्वांगीण विकास होण्यास मदत होऊ शकेल, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांची आवड मुलांचा कल ओळखून मुलांना एक अनुभव देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत वर्षभर मुले शाळा आणि घरी हा जो प्रवास असतो यादरम्यान मुले त्याच त्याच गोष्टीला कंटाळलेले असतात. परंतु उन्हाळी सुट्टीचा हा दीड महिन्याचा कालावधी म्हणजे मुलांसाठी मनोरंजनाचा काळ असतो.

 यादरम्यान पालकांनी आपला काही वेळ मुलांसोबत घालवायला हवा मुलांचा कल आवड लक्षात घेऊन मुलांना स्विमिंग पोहण्याचा  अनुभव देता येऊ शकेल. सायकल चालवायला शिकवता येईल, संगणक कोर्स ,कला, नृत्य, संगीत या प्रकारचे क्लास लावून दिवसभरातील काही वेळ यासाठी देता येईल त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा तालुका परिसरातील एखादे पर्यटन स्थळ मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी घेऊन जायला हरकत नाही.

 बाजारात मार्केटमध्ये आपल्या मुलांना बरोबर घेऊन गेल्यावर भाजीपाला ,दुकानातील सामान यामधला फरक पैशाचे व्यवहार इत्यादी अनुभव मुलांना करून देता येतील ,यासाठी मुलांना दररोज पालकांनी बाजारात सोबत घेऊन जायला हवे घरी आल्यानंतर भाज्यांची ओळख कोणत्या भाज्या निवडायच्या कोणत्या भाज्या चिरायच्या कोणत्या भाज्या मोडायच्या असे छोटे छोटे अनुभव मुलांसोबत गप्पा मारत मारत मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. दुकानातील सामान सामानाची यादी तयार करणे सामान घरी आणल्यानंतर त्या सामानावर ची किंमत तपासणे त्यानंतर त्या सामाना वरचे नाव वाचणे त्याची लिस्ट बनवणे यासारख्या गोष्टी मुलांना जवळून अनुभव येतील असा अनुभव मुलांना देणे आवश्यक आहे.

 मुलांची उन्हाळी सुट्टीतील दिनचर्या ठरवायला हवी. यामुळे मुलांची शिस्त मोडणार नाही. दिनचर्या प्रमाणे खेळाची वेळ ,बाहेर फिरण्यासाठी वेळ, टीव्ही मोबाईल बघण्याची वेळ दुपारच्या या वेळी करावयाची कामे याप्रमाणे दिनचर्या ठरवून दिल्यास मुले आनंदाने योग्य दिशेने अनुभव घेतील.

आज तर प्रत्येक घरोघरी मुले अँड्रॉइड मोबाईल खेळत असतात. अशावेळी योग्य ॲप्स मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. योग्य युट्यूब व्हिडिओ मधून मुलांना अनुभव घ्यायला हवा जेणेकरून विद्यार्थी युट्युब चा मोबाईलचा चांगल्या रीतीने वापर होईल अँड्रॉइडचा अतिवापर होणार नाही यासाठी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुले मोबाईल मध्ये काय करतात यावर करडी नजर ठेवा शक्य असेल, तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. या याऐवजी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर मुलांना पेंटिंग, गेम्स ,कार्टून टायपिंग, ड्रॉइंग्स अशा विविध गोष्टी शिकवा जेणेकरून मुलांना संगणकाची ओळख होऊ शकेल .


 नातेवाईकांकडे आपल्या पाल्यांना अवश्य जरूर घेऊन जा. यातून एकमेकांच्या ओळखी तर होतीलच पण इतरांकडे गेल्यावर पाळायचे नियम नकळतपणे मुले आत्मसात करतील. याशिवाय सायंकाळी बॅडमिंटन , क्रिकेट यासारखी खेळ मुलांसोबत खेळा दुपारच्या वेळेला कॅरम सापसीडी यासारखे खेळ खेळत मुलांचे मन रमवा. त्यामुळे मुलांमध्ये तर्क विचार शक्तीचा विकास होईल जुने फोटोचे अल्बम मुलांना दाखवून अनुभव द्या.

  वरील सांगितलेल्या अगदी सहज करता येऊ शकणाऱ्या छोट्या-छोट्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्या मुलांना विशेषता विशेष गरजा असणाऱ्या मुलांना दिव्यांग मुलांना माझा मुलगा काहीच करू शकणार नाही. त्याला काय येतं किंवा त्याला काय समजणार अशी नकारात्मक भावना मनामध्ये न ठेवता एक सकारात्मक विचाराने त्या विद्यार्थ्यांना वरील ऍक्टिव्हिटी मध्ये रमवण्यासाठी पालकांनी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना सपोर्ट करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊ त्यानंतर दीड महिन्यानंतर आपल्याला खूप अशी प्रगती मुलांमध्ये झालेली आढळून येईल आणि नक्कीच याचा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग होईल.


 सेरेब्रल पालसी या प्रकारातील असणारा विद्यार्थी त्याच्या पालकांनी  सध्या उन्हाळी शिबिरामध्ये एक पोहोण्याचा क्लास लावलेला आहे. आणि तो विद्यार्थी सेरेबल पालसी या प्रकारातील असून तो नियमित रोज एक तास पोहोण्यासाठी पोहणे शिकण्यासाठी तो स्वीमींग करत असतो. त्याची आवड लक्षात घेऊन पालकांनी त्याला पोहण्याचा क्लास लावून दिला.  असे वेगवेगळे क्लास किंवा स्वतः मुलांना त्यांच्या आवडीनुसार आपण सपोर्ट द्यायला हवा. त्याचबरोबर थोडाथोडा नियमित आपण विद्यार्थ्यांची उजळणी करायला हवी. त्यामध्ये  इंग्रजी शब्द पाठांतर असेल किंवा गणितामध्ये पाढे पाठांतर असतील असे हसत-खेळत मनोरंजनात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना कंटाळा येणार नाही आणि सुट्टी मजेत जाईल अशा रीतीने आपण विद्यार्थ्यांना summer vacation activity  उन्हाळी सुट्टीत योग्य दिशेने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल.

Previous Post Next Post