बौद्धिक अक्षमता (मतिमंद) प्रतिबंधात्मक उपाय Intellectual Disability Prevention

 बौद्धिक अक्षमता (मतिमंद) प्रतिबंधात्मक उपाय

Intellectual Disability Preventionprevention is always better than cure

प्रतिबंध म्हणजे दिव्यांगत्व बौद्धिक अक्षमता  येऊ नये यासाठी घेतलेली खबरदारी किंवा केलेली उपाय योजना होय. 

आलेल्या दोषावर इलाज करण्यापेक्षा दोष निर्माण होणार नाहीत 
याची काळजी घेणे अधिक चांगले असते. 
प्रतिबंध उपाययोजना आपण तीन स्तरामध्ये विभागणी करून काय उपाय करता येऊ शकेल ते पाहूया. 


 बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) म्हणजे काय?

 1. प्राथमिक स्तरावरील प्रतिबंधक उपाय योजना (primary level of prevention)
 2. द्वितीय स्तरावरील प्रतिबंधक उपाययोजना (secondary level of prevention)
 3. तृतीय स्तरावरील प्रतिबंधक उपाय योजना (tertiary level of prevention)


१. प्राथमिक स्तरावरील प्रतिबंधक उपाय योजना (primary level of prevention)

    बौद्धिक अक्षमता मतिमंदत्व येणारच नाही यासाठी या स्तरामध्ये  विशेष काळजी घ्यावी म्हणजे भविष्यातील धोके आव्हाने टाळता येतील. 

     १. गर्भधारणा होण्यापूर्वीची काळजी 

 •  जवळच्या नात्यात लग्न टाळावे. 
 • गर्भधारणा च्या वेळी स्त्रीचे वय 35 वर्षा  पुढे असेल किंवा 18 वर्षापेक्षा कमी असेल तर गर्भधारणा टाळावी. 
 • गर्भधारणेच्या वेळी पुरुषाचे  वय  55 वर्षाच्या पुढे नसावे. 
 • आई-वडिलांकडून मुलाला ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टीचा वारसा मिळतो त्याच प्रमाणे वाईट गोष्टीही मिळत घरातील इतिहासात यापूर्वी कोणी मतिमंदत्व असल्यास होते. त्यांनी जनुकीय तपासणी करून घ्यावी. 


      २. गर्भधारणे नंतर घ्यावयाची काळजी

 •  वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत. 
 • सकस व पूरक असा समतोल आहार घ्यावा कुपोषण टाळावे. 
 • गर्भपात होण्याची सवय असेल तर विशेष काळजी घ्यावी. 
 • ठराविक काळानंतर वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. 
 • धूम्रपान मद्यपान व अंमली पदार्थाचे सेवन टाळावे. 
 • जड वस्तू उचलणे निसरड्या रस्त्यावरून चालणे इ.  प्रकारचे धोके टाळावेत. 
 • शारीरिक व मानसिक ताण टाळावा. 
 • पहिल्या तीन महिन्यात क्ष-किरणांचा संपर्क टाळावा. 
 • लसीकरण करून घ्यावे. 
 • जो प्रसूती काळ असेल त्याच  काळामध्ये प्रसूती होऊ द्यावी त्या आधी किंवा नंतर प्रसूती टाळावी. 
     

      ३.प्रसूती काळात घ्यावयाची काळजी  • प्रसूती शक्यतो हॉस्पिटलमध्येच करावी. 
 • रक्तगट समस्या असेल तर प्रसूती हॉस्पिटलमध्येच करावी. 
 • बाळाचा जन्म झाल्याबरोबर ते रडले नाही तर मेंदूला प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठीची सुविधा सर्व सुविधांनी युक्त अशा ठिकाणी प्रसूती करणे आवश्यक आहे. 

      ४. प्रसूती नंतर बाळाची काळजी 

 • संसर्गजन्य रोगापासून मुलाचे मुलांची संरक्षण करावे. 
 • मुलांचा  अपघात होऊन डोक्याला मार बसणार नाही याची काळजी घ्यावी . 
 • बाळाला पोलिओ, गोवर, कांजण्या, क्षयरोग यांचे वेळोवेळी लसीकरण करावे. 
 • बाळाला खूप ताप असेल तर त्याला ताबडतोब औषध उपचार करावेत म्हणजे ताप डोक्यात जाणार नाही. 


२. द्वितीय स्तरावरील प्रतिबंधक उपाययोजना (secondary level of prevention)ज्या दोषामुळे किंवा बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व)  येण्याच्या कारणांमुळे  संबंधित समस्या निर्माण झाली आहे किंवा होण्याची शक्यता आहे

त्यावर उपाय योजना करून लवकरात लवकर प्रतिबंध करणे या स्तरामध्ये आवश्यक आहे.  • मुलाला फिट्स येत असतील तर त्यावर ताबडतोब औषधोपचार करावेत म्हणजे मेंदू व मेंदूवर होणारे आघात टळतील. 
 • चयापचय प्रक्रियेचे दीर्घ आजार असल्यास त्याची लवकरात लवकर निदान केल्यास होणारे परिणाम टाळता येऊ शकतात. 
 • बाळाच्या जन्मानंतर लगेचच त्याची तपासणी करून त्यात काही दोष आढळल्यास त्याला तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार चालू करावे. 

    ३. तृतीय स्तरावरील प्रतिबंधक उपाय योजना (tertiary level of prevention)

तृतीय स्तरामध्ये  म्हणजे आपण आपल्या परिस्थितीनुसार प्रयत्न करून देखील किंवा उपचार करून देखील आपल्याला अपेक्षित बदल दिसून आला नाही तर आपण खचून न जाता बौद्धिक अक्षमता असणाऱ्या मुलांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.  यासाठी शासना कडून मिळणाऱ्या सोयी सवलतीचा लाभ घेऊन मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे ठरते. 

बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व)  येण्याची कारणे 

शालेय शिक्षणापासून शाळेत , समाजात वेळोवेळी संधी देऊन मुलांचे योग्य प्रशिक्षण , मुलांमध्ये असणारे कलागुण शोधून त्यानुसार मुलांचे आवड व छंद जोपासावेत. विशेषतः जीवनावश्यक दैनंदिन कौशल्य विकसित करून स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केल्यास आनंदी जीवन जगू शकतील.    बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) म्हणजे काय?


Previous Post Next Post