पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम २०२१ इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) Syllabus 2021

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम २०२१  इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) Syllabus 2021

pss scholarship exam syllabus 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , (mscepuppss) पुणे आयोजित  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) एप्रिल - २०२१ / April - 2021 यासंदर्भात फॉर्म भरण्याची तारीख १० एप्रिल २०२१ पर्यंत वाढवण्यात आली असून या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. सुधारित वेळापत्रक 

नमस्कार विद्यार्थी , गुरुजन मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) संदर्भात माहिती घेणार आहोत. आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहे. किंवा ज्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. अशा सर्व मुलांसाठी आजच्या ब्लॉग मध्ये परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची माहिती मिळणार आहे. नविन सूचनेनुसार शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची मुदत १० एप्रिल २०२१ पर्यंत वाढवली असून या संधीचा विद्यार्थ्यांनी जरूर लाभ घ्यावा. २३ मे २०२१ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आतापासून अधिक सराव करणे आवश्यक आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांला वाटत असते. आपण परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास व्हावं. गुणवत्ता यादीत आपले नाव यावे. टॉप 5 मध्ये झळकावं यासाठी विद्यार्थी प्रयत्न देखील करतात.  आणि यशस्वी होतात. चालू वर्षातील इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या अभ्यासाची रणनीती आखावी लागेल. म्हणजे अभ्यासक्रम समजून घेऊन त्यानुसार अभ्यास केल्यास निश्चितच आपण यशाच्या शिखरावर पोहचायला वेळ लागणार नाही. आपण शिक्षक , पालक असाल तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम समजून देण्यासाठी आपण मुलांना सहकार्य करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमितपणे सराव देखील करून घेण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम परीक्षेचे स्वरूप , अभ्यासक्रम समजून घेवूया.

अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे आहे?

इयत्ता 8 वी

1) एकूण चार विषयाचे दोन पेपर असणार आहे.

पेपर -1 

विषय- मराठी 25 प्रश्न 50 गुण

गणित - 50 प्रश्न 100 गुण 

एकूण 75 प्रश्न 150 गुण 

वेळ- 1 तास , 30 मिनिटे

पेपर-2 

विषय- इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण

बुद्धिमत्ता 50 प्रश्न 100 गुण

एकूण- 75 प्रश्न 150 गुण 

वेळ - 1 तास , 30 मिनिटे

प्रश्नांची काठिण्य पातळी 

▶️ सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30%

▶️ मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40%

▶️ कठीण स्वरूपाचे प्रश्न 30%

महत्त्वाचे- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी साठीच्या प्रत्येक पेपर मध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.


शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जात असताना परीक्षेचे स्वरूप समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. इयत्ता 8 वी साठी एकूण 2 पेपर असतात. एकाच दिवशी दोन्ही पेपर द्यावे लागतात. दोन्ही पेपरच्या मध्ये 1 तासाचा ब्रेक असतो.

प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे पेपर एकमध्ये एकूण 75 प्रश्न 150 गुण आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 75 प्रश्न , 150 गुण यासाठी वेळ एका पेपर साठी 1 तास 30 मिनिटे असते.

दीड तासाच्या वेळेत सर्व प्रश्न सोडवण्याचा सराव असणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादीत येण्यासाठी सर्व प्रश्न सोडविणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी कमी  वेळेत उत्तरे काढण्यासाठी च्या ट्रिक्स चा सराव असणे आवश्यक आहे. 

इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी विषयाचे आकलन आणि सराव , शॉर्ट ट्रिक्स माहिती असणे आवश्यक आहे. तशी तयारी आपण करून घेऊया. यासाठी आपले शिक्षक , Youtube चॅनेल वरील व्हिडीओ यांचा आपल्याला आधार घेता येईल. मला आठवतं शिष्यवृत्ती परीक्षा म्हंटलं की मला mpsc परीक्षेची आठवण होते. त्या लेव्हल चे बेसिक प्रश्न म्हणजे शिष्यवृत्ती परिक्षा  , कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळेचे , अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन केले तर निश्चित यश मिळते.

इयत्ता ८ वी PSS Scholarship Exam Syllabus 2021

Std 8th (PSS) Syllabus 2021 डाऊनलोड करण्यासाठी  अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 

या संकेतस्थळावर इयत्ता ५ वी PUP Scholarship व इयत्ता ८ वी PSS Scholarship Exam syllabus 2021 सर्व माध्यम व विषय  निहाय उपलब्ध आहेत.  आजच्या ब्लॉग मध्ये आपण Std 8th (PSS) Syllabus 2021 समजून घेणार आहोत.

पेपर 1  विषय- मराठी

मराठी विषयाला एकूण 25 प्रश्नांसाठी 50 गुण मिळवण्यासाठी खालील घटकांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. यामध्ये

1. आकलन या घटकामध्ये एकूण 6 प्रश्न , 12 गुण

2. शब्दसंपत्ती या घटकामध्ये 6 प्रश्न , 12 गुण

3. कार्यात्मक व्याकरण या घटकामध्ये 11 प्रश्न असून यासाठी 22 गुण आहेत.

4. इयत्ता 1 ली ते 8 वी सामान्य ज्ञान साहित्य लेखन या घटकावर 2 प्रश्नासाठी 4 गुण 

असे एकूण 25 प्रश्नासाठी 50 गुण पेपर एक मधील 8th std pss exam marathi syllabus 2021 मराठी या विषयासाठी असते. उपरोक्त मराठी विषयाचे उपघटक कोणते? पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

पेपर 1 मधील महत्वाचा विषय म्हणजे गणित या विषयात एकूण 50 प्रश्नांसाठी 100 गुण असतात. यामध्ये खालील प्रकरणांचा समावेश होतो.

1. संख्याज्ञान - 3 प्रश्न 6 गुण

2. भूमिती - 10 प्रश्न 20 गुण

3. सांख्यिकी - 3 प्रश्न 6 गुण

4. महत्व मापन - 10 प्रश्न 20 गुण

5. बीजगणित - 9 प्रश्न 18 गुण

6. संख्यावरील क्रिया - 7 प्रश्न 14 गुण 

7. व्यावहारिक गणित - 8 प्रश्न 16 गुण

याप्रमाणे गणित विषयाचे एकूण 50 प्रश्नासाठी 100 गुण  गणित विषयाचे उपघटक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पेपर २ विषय - इंग्रजी

इंग्रजी विषयाचे २५ प्रश्न व ५० गुणांसाठी खालील प्रकरणांचा समावेश असतो. 

 • Vocabulary ४ प्रश्न , ८ गुण
 • Word puzzles २ प्रश्न , ४ गुण 
 • Language study  ६ प्रश्न , १२ गुण 
 • Grammar (Transformation of sentences)  ४ प्रश्न , ८ गुण 
 • Creative writing  ४ प्रश्न , ८ गुण 
 • Reading skills  ४ प्रश्न , ८ गुण 
 • Miscellaneous १ प्रश्न , २ गुण
बुद्धिमत्ता
 • आकलन ५ प्रश्न , १० गुण
 • वर्गीकरण ५ प्रश्न , १० गुण 
 • समसंबंध ५ प्रश्न , १० गुण 
 • क्रम ६ प्रश्न , १२ गुण 
 • सांकेतिक भाषा ३ प्रश्न ६ गुण 
 • लयबद्ध मांडणी ३ प्रश्न ६ गुण 
 • मनोरे ३ प्रश्न , ६ गुण 
 • प्रतिबिंब/ प्रतिमा ३ प्रश्न , ६ गुण 
 • तर्क व अनुमान ६ प्रश्न , १२ गुण 
 • कुटप्रश्न ६ प्रश्न १२ गुण 
 • आकृतीचे पृथकरण ५ प्रश्न , १० गुण 
सारांश 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम २०२१  इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) Syllabus 2021 अभ्यासक्रमाचे स्वरूप व मुख्य प्रकरणावर किती प्रश्न ? किती गुणांसाठी ? येणार याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली. त्याप्रमाणे आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी अभ्यासाचे नियोजन करून अधिक सराव करून परीक्षेत घवघवीत यश आपणास मिळेल . पुढील ब्लॉग मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास कसा करावा? याविषयी माहिती घेवूया . तेव्हा नवीन अपडेट साठी समावेशित शिक्षण Whats App ग्रुप ला जॉईन व्हावे.

Previous Post Next Post