आता मिळवा कोरोना व्हायरस आणि लसीकरण विषयी व्हॉट्स ॲपवर अधिकृत संपूर्ण माहिती MyGov Corona Helpdesk On Whatsapp

कोव्हीड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत कोरोना आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सध्या राज्यात कोरोनाची साखळी (Break the Chain) तोडण्यासाठी कडक निर्बंध (लॉकडाऊन) सुरू आहे. 

कोरोनाच्या काळात सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमाद्वारे कोरोना विषयी समज-गैरसमज अफवा पसरावल्या जात आहे. यासंदर्भात शासन वेळोवेळी कोरोना बद्दलची माहिती तसेच लसीकरण संदर्भातील अपडेट आपल्या अधिकृत संकेतस्थळ , पत्रकार परिषद घेऊन माहिती देत आहेत.
MyGo Corona Helpdesk on whatsapp


माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन उपलब्ध आहे. आणि स्मार्टफोन मध्ये whatsapp देखील आहे. लॉकडाऊन काळात शाळा बंद मात्र शिक्षण सुरू राहण्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. त्यातीलच एक SCERT स्वाध्याय मार्फत whatsapp वरती मुलांनी स्वाध्याय पूर्ण केले. Whats app वर स्वयंचलित चॅट या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्य झाले. अगदी याचप्रमाणे आता व्हाट्स ॲप वर कोरोना व्हायरस आणि लसीकरण विषयी परिपूर्ण योग्य माहिती केंद्र शासनाने विकसित केलेले MyGov Corona Helpdesk सुविधा आता Whatsapp वर आपणास अधिकृत माहिती मिळणार आहे. याविषयी आपणास हिंदी व इंग्रजी भाषेत माहिती उपलब्ध असून , व्हिडीओ ,PDF, टेक्स्ट स्वरूपात माहिती उपलब्ध आहे.

MyGov Corona Helpdesk On Whatsapp


1.कोव्हीड लसीकरण केंद्र COVID Vaccination - Centres and Authentic Information
2. कोरोना व्हायरस विषयी नविन अपडेट  Latest Update and Alerts on Coronavirus
3. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तज्ञांचा सल्ला Professional advice and ways to improve immunity
4. यशोगाथा Together We Can - Success Stories
5. सकारात्मक सुसंवाद Positive harmonies
6. सत्यता पडताळणी Facts Checker - authenticate news
7. कोरोना व्हायरस आणि लक्षणे What is Coronavirus and what are its symptoms
8.कोरोना व्हायरस चा धोका कमी कसा करावा? How to reduce the risk of Coronavirus? 
9.मदत कोठे मिळवायची? Where to get help - National & State Level

Whatsapp मध्ये MyGov Corona Helpdesk कसे सुरू करावे?


कोरोना व्हायरस विषयी समज-गैरसमज आपल्या मनातील शंका नक्कीच या माध्यमातून दूर होतील. यासाठी आपणास ही सुविधा Whatsapp वर सुरू करण्यासाठी खालील स्टेप पूर्ण करा.

> MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे की यासाठी वापरकर्त्यांना 9013151515 वर नमस्ते पाठवावे लागतील.
> 9013151515 हा नंबर मोबाईल मध्ये MyGovIndia या नावाने सेव्ह करा.
> त्यांनतर आपल्या Whatsapp ओपन करून कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा. 
> आपण सेव्ह केलेला MyGovIndia नंबर वर नमस्ते असे किंवा Namste असे type करून मेसेज पाठवा.
> आता आपणास एक मेसेज येईल हे स्वयंचलित (auto chat) पद्धतीने काम करेल.
> आपल्याला भाषा निवडण्यासाठी हिंदी असे निवडा.
> आता आपल्याला जी माहिती हवी आहे. त्याच्या कोड म्हणजे लिहलेला प्रश्न किंवा सूचना क्रमांक type करून पाठवा.
याप्रमाणे MyGov Corona Helpdesk स्वयंचलित पध्दतीने काम करेल. या माहितीचा आपण अवश्य लाभ घ्या. आणि सोशल मीडिया वरील अफवांवर विश्वास न ठेवता, शासनाच्या अधिकृत माहिती व सूचनेनुसार आपण पालन करूया आणि कोरोनाला हरवूया. 
ही माहिती आपल्यापुरती मर्यादित न ठेवता इतरांना सुद्धा अवश्य पाठवा.
घरी रहा , सुरक्षित रहा.
Previous Post Next Post