कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' तारखेपासून मानधन वाढ मिळणार, शासन आदेश जारी

Contract Employee Salary : राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या (Contract Employee) मानधन वाढीचा प्रलंबित निर्णय राज्य शासनाने घेतला असून, तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय घोषित झाल्यानंतर ही वाढ कधीपासून मिळणार? याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती, मात्र शासन आदेशानुसार आता मानधन वाढ कधीपासून मिळणार याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे, सविस्तर वाचा.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' तारखेपासून मानधन वाढ मिळणार, शासन आदेश जारी

Contract Employee Salary

समग्र शिक्षा अंतर्गत राज्य स्तरावरील कार्यालयात ६४ व जिल्हा स्तरावरील कार्यालयात ६१८७ असे एकूण ६२५१ कर्मचारी कार्यरत आहेत. 

या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने मंजूरी दिलेली नाही, यास्तव, सदर खर्च राज्य शासनाला करावा लागणार आहे. 

सबब, समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याबाबतचा निर्णय नुकताच शासनाने घेतला होता, याबाबतचा सविस्तर शासन आदेश १८ सप्टेंबर २०२३ रोजी काढण्यात आले आहेत.

त्यानुसार आता समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या सद्याच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

सदर मानधन वाढ या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहणार आहे. सदरचा शासन निर्णय १८ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. 

सदरचा शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे.

Previous Post Next Post