Maharashtra Divyang News : जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात! दिव्यांग मंत्रालय दिव्यांग बांधवांसाठी आधार केंद्र ठरणार!

Maharashtra Divyang News : दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून त्‍यांचे काम प्रशंसनीय आहे. दिव्यांगाच्या अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठीच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली असून, या मंत्रालयाच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येक दिव्यांगाना जगण्याचा आधार व बळ मिळेल असा विश्वास मंत्री दर्जा वि.स.स. अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला. नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी नाशिक‍ जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.

$ads={1}

Maharashtra Divyang News

यावेळी नॅब स्कूलला दिलेल्या भेटीत दिव्यांग बालकांची सर्व शिकण्याची आवड, निस्वार्थ मन व त्यांचा आत्मविश्वास पाहून भावनावश झाले. या मुलांची शिकण्याची उमेद प्रशंसनीय आहे. आज येथे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने व ताकदीने उपस्थित झाले आहेत. दिव्यांगाच्या हितासाठी निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे जगातील व देशांतील पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात राज्य शासनाने स्थापन केले आहे. 

दिव्यांग मंत्रालय दिव्यांग बांधवांसाठी आधार केंद्र ठरले पाहिजे तसेच दिव्यांगाच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल, त्यांना हव्या असलेल्या सर्व सेवा-सुविधा त्यांना प्राप्त होण्यासाठी तसेच दिव्यांगांना काय हवे काय नको ते जाणून घेण्यासाठी सर्व राज्यभरात या  कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 

दिव्यांग बांधव एक नवीन विश्वास मनात घेवून सर्व क्षेत्रात अग्रेसर राहीला हिच दिव्यांग मंत्रालयाची संकल्पना असून ती प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने सदैव प्रशासनाच्यावतीने प्रयत्नशील राहणार असल्याचे मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्ह्यात जाऊन दिव्यांगांच्या व्यथा जाणून घेत आहेत. प्रशसानातील अधिकारी यांनी आठवड्यातील एक दिवस दिव्यांगांसाठी दिला तर निश्चितच दिव्यांगांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनांची जनजागृती होईल. अंत्योदय योजनेतून निश्चित केलेल्या लक्षांका व्यतिरिक्त उर्वरित 5 टक्के धान्यसाठा दिव्यांगांना प्राप्त होण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेवून हा लाभ दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिव्यांग मंत्रालयासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही  मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.

$ads={2}

दिव्यांग वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार चर्म उद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, यांच्याबरोबरच बार्टी, महाज्योती, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व तसेच विविध सेवाभावी संस्था यांचा प्रामुख्याने या अभियानात सहभाग घेऊन व्यापक प्रमाणात योजनांची माहिती या निमित्ताने दिव्यांगांना आज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post Next Post