CIDCO Recruitment 2023: 'सिडको' महामंडळामध्ये लेखा लिपिक पदासाठी भरती सुरु

CIDCO Recruitment 2023 :  नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी, सिडकोतर्फ लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दि. 9 डिसेंबर 2023 ते दि. 8 जानेवारी 2024 पर्यंत आहे. या पदाचा सविस्तर तपशील पाहूया..

$ads={1}

'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी

CIDCO Recruitment 2023

लेखा लिपिक (Accounts Clerk) या संवर्गातील 23 रिक्त पदे पदासाठी जाहिरात निघाली असून यामध्ये सर्वसाधारण, महिला 30%, खेळाडू -5%, माजी सैनिक-15% , प्रकल्पग्रस्त-5%, अंशकालीन-10%, अनाथ-1%, दिव्यांग 4% याप्रमाणे आरक्षण असणार आहे. (जाहिरात PDF लिंक खाली दिलेली आहे)

वेतनश्रेणी

 • एस-8, (रु. 25,500-81,100/-) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

आवश्यक वयोमर्यादा

 • खुला प्रवर्ग - 40 वर्ष
 • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणा-या उमेदवारांसाठी - 45 वर्ष
 • दिव्यांग - 47 वर्ष
 • खेळाडू - 45 वर्ष
 • माजी सैनिक - 40वर्ष सैनिकी सेवेचा कालावधी 3 वर्ष
 • दिव्यांग माजी सैनिक - 47 वर्ष
 • अनाथ - 45 वर्ष
 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - 45 वर्ष

लेखा लिपिक या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता

 • B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/Auditing

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना

 1. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लेखा लिपिक या रिक्त पदाच्या सरळसेवा भरतीसाठी https://ibpsonline ibps.in/cidcoacjun23/ या संकेतस्थळावर दि. 09.12.2023 पासून दि.08.01.2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.
 2. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दर्शविण्यात येणार आहे.
 3. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी आल्यास https://curs.ibps.in/ या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा दूरध्वनी क्रमांक 1800222 366/1800 103 4566 वर संपर्क साधावा.
 4. परीक्षेचे प्रवेश पत्र (admit card) वरील संकेतस्थळावरून स्वतः डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल, प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही. 
 5. पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.
 6. भरती प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत लॉग इन आयडी नंबर तसेच पासवर्ड जतन करुन ठेवावा तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व ई-मेल कायम ठेवावा.
$ads={2}

मूळ जाहिरात येथे पहा

इतर महत्वाच्या नोकरीच्या संधी येथे पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post