Public Holiday List 2024 : महत्वाची अपडेट! या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी

Public Holiday List 2024 : तुम्ही जर या वर्षातील Holidays Plan करत असाल तर नक्कीच सार्वजनिक सुट्ट्या कधी? व किती? मिळणार आहे, यानुसार तुम्ही तुमच्या ट्रिपचे नियोजन करू शकता, इथे तुम्हाला राज्य शासनाने नुकतेच सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत, सन 2024 वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी सविस्तर पाहूया..

$ads={1}

महत्वाची अपडेट! या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी

Public Holiday List 2024

सन 2024 या वर्षात तब्बल 128 सुट्ट्या मिळणार आहे. बऱ्याचदा सण/उत्सव जवळ आले की, त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी आहे का? असा सर्वसामान्य प्रश्न आपल्याला पडतो, मात्र आता तुम्हाला संपूर्ण वर्षातील अधिकृत सुट्ट्यांची यादी मिळणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला बस, रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी किंवा इतर नियोजन करण्यासाठी नक्कीच कामी येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ या वर्षातील एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केलेल्या आहे. सन २०२४ या वर्षात एकूण ५२ रविवार आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्या अशा एकूण ७६ सुट्ट्या आहेत.

ज्या शासकीय कार्यालयांना पाच दिवसाचा आठवडा लागू आहे, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तब्बल १२८ सुट्ट्या मिळणार आहे. यामध्ये ५२ रविवार आणि ५२ शनिवार (दोन शनिवारच्या सुट्ट्या ह्या सार्वजनिक सुट्यात पकडलेले आहे.), २४ सार्वजनिक सुट्ट्या अशा एकूण १२८ सुट्ट्या मिळणार आहेत. याबाबतची अधिसूचना दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी काढण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2024 - Maharashtra State Government Declared Public Holidays 2024

सन २०२४ मधील सार्वजनिक सुट्यांची यादी खालीलप्रमाणे

महाराष्ट्र शासनाने दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

सण/उत्सव - दिनांक- वार

  1. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी (शुक्रवार)
  2. छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी (सोमवार)
  3. महाशिवरात्री ८ मार्च (शुक्रवार)
  4. होळी (दुसरा दिवस) २५ मार्च (सोमवार)
  5. गुड फ्रायडे २९ मार्च (शुक्रवार)
  6. गुढीपाडवा ९ एप्रिल (मंगळवार)
  7. रमझान ईद ११ एप्रिल (गुरुवार)
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (रविवार)
  9. रामनवमी १७ एप्रिल (बुधवार)
  10. महावीर जयंती २१ एप्रिल (रविवार)
  11. महाराष्ट्र दिन १ मे (बुधवार)
  12. बुद्ध पौर्णिमा 23 मे (गुरुवार)
  13. बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून (सोमवार)
  14. मोहरम १७ जुलै (बुधवार)
  15. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट (गुरुवार)
  16. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट (गुरुवार)
  17. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर (शनिवार)
  18. ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर (सोमवार)
  19. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर (बुधवार)
  20. दसरा १२ ऑक्टोबर (शनिवार)
  21. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर (शुक्रवार)
  22. दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर (शनिवार)
  23. गुरुनानक जयंती १५ नोव्हेंबर (शुक्रवार)
  24. ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार (बुधवार)

केवळ बँकासाठी

खालील सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.

बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल, २०२४, सोमवार रोजी सुट्टी असणार आहे.

$ads={2}

महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2024 - अधिसूचना PDF डाउनलोड करा

Maharashtra State Government Declared Public Holidays List 2024

  1. Republic Day - 26th January 2024
  2. Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti - 19th February 2024
  3. Mahashivratri - 8th March 2024
  4. Holi (Second Day) - 25th March 2024
  5. Good Friday - 29th March 2024
  6. Gudhi Padwa - 9th April 2024
  7. Ramzan-Id (Id-Ul-Fitr) (Shawal-1) - 11th April 2024
  8. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti - 14th April 2024
  9. Ram Navami - 17th April 2024
  10. Mahavir Janmakalyanak - 21st April 2024
  11. Maharashtra Din - 01st May 2024
  12. Buddha Pournima - 23rd May 2024
  13. Bakri ID (Id-Uz-Zuha) - 17th June 2024
  14. Moharum - 17th July 2024
  15. Independence Day - 15th August 2024
  16. Parsi New Year (Shahenshahi) - 15th August 2024
  17. Ganesh Chaturthi - 7th September 2024
  18. Id-E-Milad - 16th September 2024
  19. Mahatma Gandhi Jayanti - 2nd October 2024
  20. Dasara - 12th October 2024
  21. Diwali Amavasya (Laxmi Pujan) - 1st November 2024
  22. Diwali (Bali Pratipada) - 2nd November 2024
  23. Guru Nanak Jayanti - 15th November 2024
  24. Christmas - 25th December 2024

महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2024 - अधिसूचना PDF डाउनलोड करा

Previous Post Next Post