राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, या योजनेत जवळपास 1356 आजारावर उपचार घेता येणार आहे, या योजनेची माहिती पाहूया, तसेच आजार व हॉस्पिटल यादी लिंक खाली दिलेली आहे.
मुख्य उद्देश
- महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे.
- सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अंगीकृत रुग्णालयांच्या माध्यमातून विविध उपचारांकरिता मोफत आरोग्य संरक्षण.
- कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभार्थी
- महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे असे कुटुंब.
लाभाचे स्वरूप
- वैद्यकीय उपचारांकरिता प्रति वर्ष / प्रति कुटुंब विमा संरक्षण.
- मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीच्या शस्त्रक्रियेचा समावेश.
- योजनेंतर्गत उपचारांसाठी सर्व लाभार्थी पात्र.
- शासकीय/खासगी अंगीकृत रुग्णालयात निःशुल्क लाभ घेण्याची सुविधा.
आवश्यक कागदपत्रे
- पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका.
- अर्जदाराचे आधार कार्ड/मतदान कार्ड/पॅन कार्ड इ.
जन आरोग्य योजनेअंतर्गत 1356 आजारांवर करता येणार उपचार
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या 1356 एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या एक हजार एवढी आहे. [राज्यातील हॉस्पिटल यादी येथे पहा]
माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्क
- योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त 'आरोग्य मित्र'
- हेल्पलाईन क्र.: 155388/18002332200