कोव्हीड 19 या साथीच्या संसर्गजन्य कोरोना बाबत दिव्यांग बालकांची व व्यक्तींनी काळजी कशी घ्यावी.

covid19

कोव्हीड 19 या साथीच्या संसर्गजन्य कोरोना बाबत दिव्यांग बालकांची व व्यक्तींनी काळजी कशी घ्यावी.


  सध्या कोरोनाच्या उद्रेकाने लॉक डाऊन बंद सुरू आहे. यादरम्यान आपण सर्वजण काळजी घेत आहोत. शासनाच्या सूचनांचे पालन आपण सर्व नागरिक करीत आहोत. घरी रहा , सुरक्षित रहा याप्रमाणे सर्वजण घरात राहून कोरोनाशी लढा देत आहोत. नक्कीच यावर संपूर्ण नियंत्रण मिळेल.

  या लढाईत समाजातील एक घटक म्हणजे दिव्यांग व्यक्ती , दिव्यांग हे नाव जरी ऐकले तर आपल्या मनामध्ये त्यांच्याप्रती भीती निर्माण होते. असुरक्षित भावना आपल्या मनामध्ये येते की अंध, कर्णबधिर, बहुविकलांग ,बौद्धिक अक्षमता असणारे बालक/व्यक्ती कोरोना पासून स्वतः ची काळजी कशी घेईल? अंध व्यक्तीला तर स्पर्शाचा आधार घ्यावा लागतो. कर्णबधिर व्यक्तीला तर ऐकायला येत नाही. बहुविकलांग ,बौद्धिक अक्षमता असणाऱ्या बालकांना/ व्यक्तींना तर काही समजत नाही. मग अशा वेळी यांनी काळजी कशी घ्यावी? असे नानाविविध प्रश्न आपल्या मनामध्ये घोळवणे स्वाभाविक आहे.


        आज आपण याविषयी दिव्यांग व्यक्तीला समजून घेऊया आणि संधी मिळेल तिथे त्यांना मदत/सपोर्ट करूया. 21 प्रकारातील  घटकात दिव्यांग व्यक्तीचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. कारण प्रत्येकाची गरज वेगळी आहे. आणि प्रत्येकजण वेगळा आहे. अगदी सामान्य माणूस देखील, प्रत्येकाची गरज, क्षमता , आवड वेगवेगळी असते. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना योग्य त्याच्या गरजेनुसार लाभ मिळावा यासाठी 21 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे जेणेकरून दिव्यांग व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी लाभदायक होईल. 

तर या 21 प्रकारातील विशेषतः अंध , कर्णबधिर , बहुविकलांग , बौद्धिक अक्षमता(मतिमंद), सेरेब्रल पालसी या प्रकारातील बालकांना/व्यक्तींना विशेष सपोर्ट ची आवश्यकता भासते. अशातच सध्याच्या कोव्हीड19 च्या रोगापासून बचाव करण्यासाठी सर्वजण घरातच आहे. तरीदेखील यादरम्यान पालकांनी मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये आपण प्रकार निहाय थोडंस समजून घेऊया.

अंध 
     अंध मुलांना दिसत नसल्याने आणि त्यांना स्पर्शाचा सतत आधार लागत असल्या कारणाने पालकांनी अशा मुलांकडे विशेष लक्ष देऊन घरात ज्या ठिकाणी मुलांचा स्पर्श होतो अशा ठिकाणची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यासोबतच सॅनिटायझर चा वापर करणे , साबणाने हात स्वच्छ धुणे ,कपडे, रुमाल नियमितपणे स्वच्छ धुणे , शक्यतो या दरम्यान च्या काळात घराबाहेर या अंध बालकांना घराबाहेर पडू देऊ नका. त्याला समजावून सांगा. टेलिव्हिजन द्वारे , मोबाईल ऑडीओ,व्हिडिओ द्वारे शासनाच्या प्रतिबंधात्मक काळजी बाबतच्या सूचना ऐकवा. 

आपल्या परिसरात जर कोणी असा बालक/व्यक्ती असेल तर त्यांना त्यांच्या पालकांना याबाबत विशेष काळजी घेण्याबाबत सहाय्य करा. जेणेकरून त्यांचे प्रोत्साहन वाढेल व घरात राहून सुरक्षित राहतील.

कर्णबधिर
         कर्णबधिर बालकांना दिसत असते मात्र ऐकायला येत नाही. अशा वेळी कर्णबधिर  बालकांना प्रत्यक्ष स्वच्छता बाबत कृती करून दाखवा. हात साबणाने स्वच्छ धुणे , हाताला सॅनिटाइझर लावणे , खुणा द्वारे छोट्या सूचना सांगणे. उदा. वारंवार हात चेहऱ्याला लावू नये, बाहेर जाऊ नये , घरात स्वच्छता राखणे.

       या बालकांना डोळ्याने सर्व दिसते. व ते व्हिडिओ च्या माध्यमातून हाव भावावरून समजण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते. अशा वेळी त्याला पालकांनी समजावून सांगावे. घराबाहेर पडू देऊ नका. घरी रहा, सुरक्षित रहा.

बहुविकलांग व बौद्धिक अक्षमता(मतिमंद)

      या प्रकारातील काही मुलांना सांगितलेल्या सूचना समजतात परंतु लगेच विसर पडतो. तर काहींना काहीच समजत नाही. त्यामुळे या मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे आव्हान पालकांना आहे. पालकांनी मुलांची रूम, खेळणी, अभ्यास साहित्य नियमितपणे स्वच्छ ठेवावे. त्यासोबत स्वतः मुलांचे हात साबणाने स्वच्छ धुवावे. स्वतः मुलांना सॅनिटाइझर लावून द्यावे. यादरम्यान अशा छोट्या कृती मुलांना शिकवाव्यात . 

यादरम्यान मुलांना अजिबातच घराबाहेर जाऊ देऊ नका , सायंकाळच्या वेळी घराच्या समोर देखील ही मुले बाहेर पडली तर त्यांच्या सोबत मोठ्या भावंडांना किंवा स्वतः पालकांनी सोबत राहून काळजी घ्यावी.
      दिव्यांग व्यक्तींनी देखील स्वतः ची विशेष काळजी घ्यावी. दरम्यान कुटुंबातील सदस्यांचा आधार घ्यावा. व वेळोवेळी स्वच्छता ठेवावी आणि शक्यतो घराबाहेर पडूच नये, अत्यावश्यक सेवेसाठी कुटुंबातील इतर व्यक्तींना जाण्यास सांगावे जेणेकरून आपण कोरोनाच्या लढाईत सहजपणे मात करून आपले आरोग्य सदृढ ठेवूया.

दिव्यांग जरी असले तरी ते मानव आहे आणि सर्वांसारखेच आहे. त्यामुळे पालकांनी व इतर सर्वसामान्य व्यक्तींनी दिव्यांगा प्रति असणारी असुरक्षित भावना मनातून काढून टाकावी. त्यांना गरज असते सपोर्ट ची तशी मदत आपल्याला करता आली तर नक्की आपण त्यांच्या पालकांना , मुलांना करून सहाय्य करावे.

घरी रहा, सुरक्षित रहा.
आरोग्यधनसंपदा
Previous Post Next Post