बालवयात रममाण होऊन मुलांना घडवण्याची संधी

             बालवयात रममाण होऊन मुलांना घडवण्याची संधी

"मुले ही देवघरची फुले"

              सध्या कोविड19 या साथीच्या रोगाने लॉक डाउन सुरू आहे. आणि अशातच आपण सर्वजण घरातच राहून आपण आपली काळजी घेत आहोतच, परंतु बऱ्याचदा असे होते की एकाच ठिकाणी कंटाळा येतो आणि त्यात मुलांकडून दररोज अभ्यास करवून घेणे आपल्यासाठी खूप आव्हानांत्मक ठरत आहे. लॉक डाऊन बंद मुळे आपल्या सर्वांची दिनचर्या च बदलून गेली आहे. अशा वेळी आपण या मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल , या दिवसांमध्ये आपण काही वेगळं करू शकतो का? मुलांना काही वेगळे शिकवू शकतो का? खरं तर हाच तो काळ आहे. आपल्या मुलांसाठी वेळ देण्याचा , त्यांच्या सोबत लहानपणामध्ये रममाण होण्याचा , आपल्या आठवणी उजळून काढण्याचा त्यासोबत आपल्या मुलांना चांगले संस्कार , चांगल्या सवयी लावण्याची संधी आहे. त्यासोबतच आपले छंद जोपासण्याचा हा काळ निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. आपण किती पेशन ठेवून या संधी चा उपयोग करून घेतो , ते येणाऱ्या काळात आपल्या स्वतः ला समजेलच, चला तर आपण बालपणात जाऊया आणि आपल्या मुलांना घडवूया , या लॉक डाऊन बंद च्या काळात मीच माझ्या मुलांचा शिक्षक ,मीच माझ्या मुलांचा सवंगडी अशा वेगवेगळ्या भूमिकेत जाऊन आपण मुलांसोबत वेळ घालवूया आणि मुलांना अभ्यासाची गोडी लावूया, 
    "मुले ही देवघरची फुले"  या फुलपाखरांना घरात बसून बसून कंटाळा येणं स्वाभाविक आहे. आपणही कंटाळलेच आहोत. मात्र हा कंटाळा दूर करण्यासाठी आपण जर चांगल्या सवयी लावून या काळात वेळ घालवला तर हे ही दिवस अगदी सहजपणे कसे निघून जातील आपल्याला कळणार सुद्धा नाही. यासाठी आपल्या स्वतः पासून सुरुवात करून मुलांना अभ्यासाची गोडी लावूया यासाठी दिनचर्या ठरवूया ,  दिनचर्येतील काही गोष्टी आपण समाविष्ट केल्या नसतील तर करून घेऊया आपल्या परिस्थितीनुरूप आपण त्यात हवा तो बदल करूया.
 • योगा , प्राणायाम , सूर्यनमस्कार
  पौष्टिक नास्टा (किंवा सकाळची न्याहारी)
  सकाळ/संध्याकाळ एक दोन तास अभ्यास / पालकांनी मुलांना अभ्यासाला बसवून स्वतः मुलांसोबत वाचन (वृत्तपत्र, पुस्तक,कांदबरी) करावे. जेणेकरून मुलांना सुद्धा कंटाळा येणार नाही. आणि आपण जवळ असल्याने मुलांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सांगतील आणि आपण मुलांना जेव्हाच तेव्हा सपोर्ट करू शकू. दुपारचे सर्व कुटुंबाचे एकत्रित जेवण,  मुलांना थोडा वेळ मोबाईल देण्यास हरकत नाही.(कारण हल्ली मुलांना मोबाईल मध्ये गेम, व्हिडिओ बघायची एक सवयच बनून गेली आहे. अशा वेळी ठराविक वेळेसाठी मुलांना मोबाईल जरूर द्यावा. शक्य होईल तेवढे शैक्षणिक , सकारात्मक ऊर्जा देणारे व्हिडिओ , बुद्धीला चालना देणारे गेम खेळू द्यावे.
  ज्याप्रमाणे आपल्याला मुलांनी जास्त मोबाईल हाताळू नये असे वाटते. अगदी तसे होण्यासाठी आपल्याही हातात मुलांच्या समोर मोबाईल घेऊ नये अन्यथा मुले मोबाईल मागतात. यासाठी आपणही मोबाईल पासून दूर राहावे. तरच मुलांची मोबाईल ची सवय कमी होऊ शकेल.
 • थोडा वेळ टेलिव्हिजन/TV मुलांसाठी मनोरंजक सकारात्मक ऊर्जा देणारे कार्यक्रम 
 • दुपारच्या वेळेला घरातील बैठे खेळ / छंद  उदा. कॅरम , सापसीडी , डान्स , गायन ,वादन वगैरे यादरम्यान आपणही मुलांसोबत खेळात सहभागी होऊन बालवयात रममाण व्हावे.
 • शक्यतो दुपारची झोप टाळावी , शक्य नसल्यास वामकुक्षी करावी.  प्रत्येक वेळी मुलांना प्रत्येक गोष्टीचे महत्व माहिती त्यांच्या बालवयाच्या बोलण्याच्या शैलीत द्यावी, लहान मुलांना गोष्टी सांगाव्यात यासाठी आपणाला गोष्टी माहिती नसेल तर गोष्टीचे पुस्तके वाचून मुलांना सांगावी.
 • अधूनमधून रिकाम्या वेळेनुसार आपले फोटो चे जुने अलबम , व्हिडिओ कॅसेट मुलांना दाखवावी. नातेवाईकांची माहिती सांगावी. 
 • घरातील साफसफाई , जेवणातील पदार्थ बनवणे , आईला घर कामात मदत करणे  असे कामे मुलांना सांगावी व त्यांच्या सोबत आपणही सहभागी व्हावे तरच मुले करतील.
अशा प्रकारे आपण मुलांमध्ये , मुलांना सोबत घेऊन घरात मुलांचा सर्वांगाने विचार करून चांगल्या सवयी मुलांना लावू शकतो. सोबतच मुलांचा अभ्यास देखील होईल. मुलांना आणि आपल्यालाही कंटाळा येणार नाही. एका संशोधकांनी सांगितले आहे. की कोणतीही सवय लागण्यासाठी 21 दिवस लागतात. आणि कोणतीही सवय सुटण्यासाठी देखील 21 दिवस लागतात. त्यासाठी जी सवय लावायची आणि जी सवय मोडायची आहे. त्याचे नियमितपणे दररोज 21 दिवस पालन केले तर नक्कीच ती सवय लागते व सुटते पण , अशा प्रकारे आपण या 21 दिवसात मुलांमध्ये चांगल्या सवयी लावू शकतो व वाईट सवयी मोडू शकतो. 

आपण आपल्या परिस्थिती नुरूप आपल्या दिनचर्येत बदल करून सकारात्मक ऍक्टिव्हिटी ऍड करून मुलांचा कंटाळा दूर करून मुलांमध्ये चांगल्या सवयी लावू शकू.
        आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 8 तास पुरेशी झोप , संतुलित आहार , व्यायाम, सकारात्मक मानसिकता ठेवणे, ताण तणावापासून दूर राहणे या गोष्टी आपण प्रथम प्राधान्याने स्वतः ची काळजी घेऊया Stay Home , Stay Safe!
आरोग्यमधनसंपदा
सर्वांना शुभेच्छा
Previous Post Next Post