अध्ययन शैली म्हणजे काय ? अध्ययन शैलीचे प्रकार

cwsn learning style

अध्ययन शैली म्हणजे काय ? अध्ययन शैलीचे प्रकार What is a learning style? Types of learning style


अध्ययन म्हणजे काय व्याख्या

'सराव आणि अनुभव यांच्या द्वारे वर्तनात घडून येणारे सापेक्षत: टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय.' 

'अध्ययन म्हणजे नवीन प्रतिक्रियेचे संपादन आणि जुन्या प्रतिक्रियेचे विस्तारित प्रवर्तन म्हणजे अध्ययन होय.'

अध्ययनाचे स्वरूप

  • अध्ययनामुळे सराव पूर्वानुभवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.
  • अध्ययनामुळे वर्तनात सुधारणात्मक बद्दल घडतात.
  • अध्ययनामुळे घडणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाची असतात. 
  • अध्ययनामुळे वर्तनात केवळ टिकाऊ स्वरूपाची नव्हे, तर सापेक्षत: टिकाऊ स्वरूपाचे असतात.


मुलांची शिकण्याची पद्धत..


 वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असतात. वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवून सुद्धा अपेक्षित बदल विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. विशेषतः दिव्यांग मुले त्यासाठी कामी येते ते म्हणजे अध्ययन शैली प्रत्येक मुल वेगळे आहे. 

प्रत्येक मुल शिकू शकते. यासाठी मुलांची अध्ययन शैली ओळखणे गरजेचे ठरते. अध्ययन शैलीचा त्यात महत्त्वाचा हातभार असतो. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की जर मुलांची अध्ययनशैली ओळखून त्यांना शिकवले तर त्यांची ६० टक्क्य़ांहून अधिक प्रगती होऊ शकते.

 महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक मुलाची आकलन करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे काही मुले एखादी संकल्पना वाचून पटकन लक्षात ठेवू शकतात. तर काहीना ती संकल्पना प्रत्यक्ष करून पहिल्याशिवाय कळतच नाही. काही मुलांच्या ऐकून चांगले लक्षात राहते. समजते. तर काहीना प्रत्यक्ष अनुभव घेऊन अथवा चित्रफित द्वारे चांगले समजते. आपल्याला जर आपल्या पाल्याची, विद्यार्थ्याची अध्ययनशैली माहीत असेल तर आपण त्याला माहिती, विविध संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकतो आणि त्याच्याही त्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहू शकतात.

प्रत्येक मूल हे वेगळे असते. प्रत्येक मुल शिकू शकते. प्रत्येकाची आकलन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अशा वेळी गरज आहे. ती आपल्या पाल्याची योग्य अध्ययन शैली ओळखण्याची. 

जर मूल तुम्ही शिकवलेल्या पद्धतीने शिकत नसेल तर तुम्ही मुलाची शिकण्याची शैली ओळखून त्या पद्धतीने शिकवा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

'जर काही मुले आपण ज्या पद्धतीने शिकवतो त्यातून शिकत नसतील तर ती ज्या पद्धतीने शिकू शकतात तसे आपण त्यांना शिकविले पाहिजे...'- Ignashio एस्ट्राडा{alertInfo}

अध्ययन शैली म्हणजे काय? what is the learning style?


     विद्यार्थी ज्या माध्यमाद्वारे (दृश्य,श्राव्य,स्पर्श,कृतीतून,बहुअध्ययनशैली) द्वारे ज्ञान ग्रहण करतो. माहिती मिळवतो. म्हणजेच शिकतो. त्या पद्धतीला अध्ययन शैली असे म्हटले जाते.


म्हणजेच काय तर काही मुलांना बघून चांगले समजते.तर काहीना ऐकून तर काहीना प्रत्यक्ष कृतीकरून , स्पर्शाची अनुभूती घेऊन चांगले समजते. तर काहीना या सर्व माध्यमाचा उपयोग करून चांगले समजते. 

पंचज्ञानेद्रीयांचा कमी अधिक वापर करणे, याच मार्गालाच अध्ययन शैली म्हटले जाते. यासाठी आवश्यकता असते. ते म्हणजे मुलांची अध्ययन शैली ओळखणे. त्याअगोदर आपण अध्ययन शैलीचे प्रकार कोणते आहेत. त्याची माहिती घेऊया.


अध्ययन शैलीचे प्रकार types of learning styles?१. दृक/दृश्य अध्ययन शैली  Visual learning style
२. श्राव्य अध्ययन शैली Auditory learning style
३. स्पर्श अध्ययन शैली Tactile learning style
४. क्रियात्मक अध्ययन शैली Kinesthetic learning style
५. बहुअध्ययन शैली Multy Sensory learning style


याव्यतिरिक्त Logical(mathematical), Social(interpersonal), Solitary (intrapersonal) हे  अध्ययन शैली चे प्रकार आहेत.


१.    दृक/दृश्य अध्ययन शैली  Visual learning style 


      दृश्य अध्ययन शैली मध्ये पंचज्ञानेद्रीयेतील डोळा या अवयवाचा जास्तीत जास्त वापर होतो. म्हणजेच विद्यार्थी बघून शिकण्यावर जास्त भर देतात. या मध्ये मुले पुस्तके वाचून , चित्र पाहून , देहबोली या सर्व गोष्टींचा वापर या अध्ययन शैली मध्ये होतो.


          विशेष गरजा असणारया विद्यार्थ्यामध्ये cwsn विद्यार्थ्यामध्ये कर्णबधीर विद्यार्थी यांना आता दृश्य अध्ययन शैलीचे विद्यार्थी संबोधले जाते. कारण त्यांचे एक पंचज्ञानेद्रीय म्हणजे कान कानात बिघाड असल्याने ऐकू शकत नाही. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त डोळ्याद्वारे ज्ञान दिले जाते. 
    
      ज्या विद्यार्थ्यांचा हेरिंग लॉस ऐकण्याची क्षमता १००db च्या वर आहे. त्या विद्यार्थ्यांना या शैलीचा जास्त वापर करता येईल. ज्यांना कानाचे मशीन देऊन थोड्याफार प्रमाणात ऐकायला येत असेल त्यांना देखील या अध्ययन शैलीचा जास्तीत जास्त वापर केला, तर मुलांना शिकण्यास योग्य सपोर्ट होईल.

      यासाठी दृश्य स्वरुपात दाखवत असताना स्पीच बलून, शब्द,वाक्य यांचा समावेश यामध्ये करावा लागतो. तसेच कर्णबधीर मुलांकडे बघून बोलणे. लीपरीडिंग द्वारे मुलांना समजण्यास सोपे जाते. खुणांचा वापर करणे. नाट्यीकरण करणे. असे काही गरजेनुरूप अनुकूलन करण्याची आवश्यकता आहे. दृश्य अध्ययन शैली मध्ये व्हिडीओ, चित्र, मॉडेल, प्रोजेक्टर, टीव्ही, tab, मोबाईल , आलेख नकाशे अशा सर्व दृश्य स्वरुपात उपलब्द असणारया संसाधनांचा समावेश यामध्ये होतो.


 २.    श्राव्य अध्ययन शैली Auditory learning style


               श्राव्य अध्ययन शैली मध्ये कान या पंचज्ञानेद्रियांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. या शैली तील विद्यार्थी ऐकून चांगले शिकतात. यामध्ये व्याख्यान, गोष्टी, संगीत, कविता गायन , ऑडीओ क्लीप याद्वारे मुलांना चांगले लक्षात राहते. अशा संसाधनांचा वापर श्राव्य अध्ययन शैलीतील मुलांसाठी करावा लागतो.


     विशेष गरजा असणारया विद्यार्थ्यामध्ये cwsn अंध विद्यार्थ्यांना या शैलीचा लाभ होतो. अंध विद्यार्थी हे ऐकून शिकतात. कारण त्यांचे एक पंचज्ञानेद्रीय डोळा , डोळ्याने दिसत नसल्यामुळे श्राव्य अध्ययन शैलीचा वापर करणे योग्य ठरते. 

अंध मुलांना श्राव्य अध्ययन शैलीचे विद्यार्थी म्हणून ओळखले जाते. त्यासोबतच स्पर्श अध्ययन शैलीचा सुद्धा वापर या मुलांसाठी करावा लागतो. यासाठी मुलांना शालेय परिसर ओळख करून द्यावी लागते. यासाठी mobalitiy  द्वारे मुलांना ओळख करून दिली जाते. 

जी मुलांना अडथळा विरहीत वातावरणात वावरताना मुक्त पणे वावरू शकतात. अध्ययन अध्यापन करताना ऑडीओ क्लीप, स्पर्शाने अनुभूती देता येतील असे शैक्षणिक साहित्य तयार करून मुलांना शिकवले जाते. परीक्षेसाठी लेखनिक च्या मदतीने पेपर सोडविणे शक्य होते.  

 ३.    स्पर्श अध्ययन शैली Tactile learning style


       स्पर्श या अध्ययन शैली मध्ये त्वचा या पंचज्ञानेद्रियांचा वापर शिकण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. या अध्ययन शैलीचा वापर वर्गातील सर्वच मुले कमी अधिक प्रमाणात आवश्यकतेनुसार करत असतात. उदा. थंड- गरम , मऊ, खडबडीत यासारख्या संकल्पना शिकण्यासाठी अनुभूती घेण्यासाठी स्पर्श अध्ययन शैलीचा वापर केला जातो. यामध्ये प्रत्यक्ष मुलांना स्पर्शाची अनुभूती दिली जाते.
    विशेष गरजा असणारया विद्यार्थ्यामध्ये cwsn DB डेफ BLIND म्हणजे पूर्णतः अंध आणि पूर्णतः कर्णबधीरत्व ज्या मुलांना ऐकायला येत नाही आणि दिसतही नाही अशा मुलांसाठी स्पर्श अध्ययन शैलीचा वापर संभाषण साधण्यासाठी तसेच शिकण्यासाठी केला जातो. तसेच अंध विद्यार्थ्यांना देखील स्पर्श अध्ययन शैलीचा वापर केला जातो.

 ४.    क्रियात्मक अध्ययन शैली Kinesthetic learning style


      क्रियात्मक अध्ययन शैली मध्ये शरीराच्या अवयवांचा वापर शिकण्यासाठी जास्तीत जास्त केला जातो. यामध्ये मुले कृती करत करत शिकतात. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीने मुले कृतियुक्त शिकत जातात. यामध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्याचा वापर मुले करतात. प्रयोग, प्रात्यक्षिक, कृती , उपक्रम यांचा समावेश या शैलीतील मुलांसाठी योग्य ठरतो.


      क्रियात्मक अध्ययन शैलीमध्ये वर्गातील सर्वच मुले कमी अधिक प्रमाणात मुलांच्या गरजेप्रमाणे सपोर्ट दिल्यास मुले शिकत जातात. यामध्ये मुलांना शक्यतो कंटाळा येत नाही. मुले हसत खेळत शिकतात. व त्यांच्या चांगले लक्षात राहते.


५. बहुअध्ययन शैली Multy Sensory learning style


    दृश्य,स्पर्श,श्राव्य व क्रियात्मक अध्ययन शैलीचा वापर शिकण्यासाठी करतात. यामध्ये जवळपास सर्व पंचज्ञानेद्रियांचा वापर  कमी अधिक प्रमाणात मुले करतात. 

सध्याच्या शालेय स्तरावर मुले शिकण्यासाठी या अध्ययन शैलीचा अप्रत्यक्षपणे वापर होताना दिसून येतो. मात्र यामध्ये विशेष मुलांना विशिष्ट अध्ययन शैलीनेच शिकवावे लागते. तेव्हाच त्यांना शिकण्यास मदत होते. हे होणे गरजेचे वाटते. 

यासाठी मुलांची अध्ययन शैली ओळखून मुलांना शिकण्यास वातावरण निर्मिती केल्यास १००% मुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण पूर्ण करतील.

    विशेष गरजा असणारया विद्यार्थ्यामध्ये CWSN कर्णबधीर , अंध, डेफ BLIND सोडून इतर सर्व मुले बहुअध्ययन शैलीने शिकतात. त्यासाठी मुलांच्या गरजेनुरूप शैक्षणिक संसाधने उपलब्द करून देणे आवश्यक आहे. जे मुलांच्या शिकण्यास मदत करतात.  

 अशा प्रकारे मुलांची अध्ययन शैली चे प्रकार (शिकण्याची पद्धत)  समजून घेतल्यास मुलांना अध्ययन शैली learning styles प्रमाणे सपोर्ट दिल्यास मुले आनंददायी पद्धतीने शिकतील. सर्वांत  महत्वाचे म्हणजे वर्गातील सर्व मुलांच्या  शिकण्यासाठी अध्ययन शैली learning styles ची मदत होईल आणि अपेक्षित तो बदल मुलांमध्ये दिसून येईल. 
Previous Post Next Post