बेडरेस्ट MD विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यावी व सरल पोर्टलवर गुण कसे भरावे?

बेडरेस्ट MD विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यावी व सरल पोर्टलवर गुण कसे भरावे?
How to take Bedrest MD students exam and how to fill marks on saral
 portal?,हे मार्गदर्शन फक्त बेडरेस्ट बहुविकलांग विद्यार्थी यांच्या साठीच आहे.  
बेडरेस्ट असलेल्या  बहुविकलांग दिव्यांग विद्यार्थी यांची परीक्षा कशी घ्यावी ? 

👉🏻 सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया आणि समजावून देऊया कि बेडरेस्ट असलेल्या मुलांची  इतर मुलांच्या तुलनेत प्रगती ही लवकर होणार नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. शाळेत आणण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील.  आणि  विशेष म्हणजे त्यामुलांना बेड वरून शाळेच्या आवारात आणून जेव्हा आपण वर्गात दाखल करून घेऊ तेव्हाच शैक्षणिक प्रगतीला बळ येऊन सुरवात होईल.
नोंद- हे फक्त बेडरेस्ट 24×7 झोपून असतात. अशाच मुलांसाठी 

शैक्षणिक यंत्रणेतील घटक यांनी शिक्षण देण्याची इच्छा असून देखील या मुलांना आजतागायत अप्रत्यक्ष पणे दुर्लक्षित केले. कारण हे खूप मोठे challenges  आव्हाने  आहे. आणि यावर काम करताना आपल्याला काय अनुभव येतात हे सर्वांना ज्ञात आहे. यासाठी आपण नेहमी काहीतरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असतोच. यावर आपणच योग्य मार्ग काढणे गरजेचे आहे.
🔷 विद्यार्थी बेडरेस्ट जरी असला तरी अशा विद्यार्थ्यांना शाळेत, शाळेच्या आवारात, सहशालेय उपक्रमात, वर्गात त्या-त्या इयत्ता निहाय सहभागी करून घेणे आवश्यक आहे.
🔶 व्हीलचेअर, मॉडीफाय चेअर च्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष कडेवर घेऊन या मुलांना शाळेत वर्गात सहभागी करून घेणे.
🔷 विद्यार्थी शाळेच्या पूर्ण वेळेत जरी थांबू शकत नसेल, मात्र दररोज शाळेत एक ते दोन तास तरी थांबेल व शाळेच्या विविध उपक्रमात वर्गात सहभागी करून घेता येईल. (उदा. परिपाठ, खेेेळ, मध्ययान्ह  भोजन)
🔶 विद्यार्थी जरी आपल्याला शून्य वाटत असला परंतु आधी आपण हे समजून घेणे व देणे आवश्यक आहे की या पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव हा काही ना काहीतरी अनुभवातून निरीक्षणातून शिकतच असतो. याठिकाणी सर्वसामान्य मुलांच्या प्रगतीच्या तुलनेने त्याची तुलना करण्यात येऊ नये, मात्र तो त्याच्या गतीने शिकुन त्याची प्रगती होत असते. हे पालकांना व वर्गशिक्षकांना समजावून देणे खूपच मोठे आव्हान आहे. आणि हे जेव्हा होईल तेव्हाच या बेडरेस्ट मुलांचा स्वीकार हे खऱ्या अर्थाने सफल झाले असे म्हणता येईल.
🔶 बेडरेस्ट मुलांची जरी आपल्याला काहीच प्रतिक्रिया दिसत नसली तरीदेखील तो विद्यार्थी डोळ्याने पाहून , कानाने ऐकून काहीतरी शिकतच असतो.
मात्र खेदजनक बाब म्हणजे या मुलांची काहीच प्रगती होणार नाही या नकारात्मक दृष्टीने त्यांना एका खोलीत 24×7 कोंडून ठेवल्यासारखं च असतं. अशा मुलांच्या पालकांचे, वर्गशिक्षकांचे समुपदेशन करून त्या मुलांना खोलीच्या बाहेर काढणे खूप गरजेचे आहे.  यासाठी च हे मोठे आव्हान सध्या आपल्या समोर आहे. हळुहळु यामध्ये नक्कीच बदल होईल.

🔷 IEP वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करून अध्ययन अनुभव देणे. आता तुम्ही म्हणाल विद्यार्थी झोपूनच आहे. याचा काय IEP प्लान करणार?
विद्यार्थी ज्या स्थितीत आहे. त्याच्या पुढच्या स्थितीत येण्यासाठी जे अपेक्षित आहे. ते समोर ठेऊन IEP प्लान बनवावा लागेल. काही नमुना चेकलिस्ट प्रश्न👇🏻
उदा.
विद्यार्थी आवाजाला प्रतिसाद देतो का? संगीत लावल्यास प्रतिक्रिया कशी देतो? कुटुंबातील व्यक्ती व अनोळखी व्यक्ती याबाबत प्रतिक्रिया कशी असते.? बसण्याचा प्रयत्न करतो का? उभे राहण्याचा प्रयत्न करतो का? बोलतो का? बोलण्याचा प्रयत्न करतो का? हात पाय हलवतो का? मान फिरवतो का? मोबाईल दाखवल्यास हातात पकडतो का? जेवण कसे करतो की भरवावे लागते? शी-सु कंट्रोलिंग आहे का? मराठी/इंग्रजी बाराखडी, अंकज्ञान,चित्र यांच्या बाबतीत प्रतिक्रिया कशी आहे.

असे विविध आवश्यकतेनुसार चेकलिस्ट चा आधार घेऊन IEP प्लान तयार करून तशी कार्यवाही करणे आवश्यक आहे. व त्यानंतर IEP वर आधारित प्रश्नसंच विकसित करून प्रगती नोंद करणे गरजेचे आहे.


🔶 परीक्षा पद्धती व ऑनलाइन मार्क्स नोंदणी
वरील IEP प्लान नुसार प्रश्नपत्रिका तयार करून तसे गुणदान करता येईल. १६ ऑक्टोंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार प्रश्नपत्रिका अनुकूलन विषयी सवलत देण्यात आलेली आहे. हे आपणास ज्ञातच आहे.

इ 1 ली ते 8 साठी PSM अंतर्गत पायाभूत चाचणी (शैक्षणिक प्रगती चाचणी), संकलित 1 व 2 चाचणी दरम्यान बेडरेस्ट मुलांची त्यांच्या IEP प्लान नुसार लेखनिक च्या मदतीने (विद्यार्थ्यांने निरीक्षणातून दिलेली प्रतिक्रिया) नुसार चाचणी घेण्यात यावी.

ऑनलाइन मार्क्स भरणे

याठिकाणी बेडरेस्ट विद्यार्थी सोडून (बेडरेस्ट मुलांच्या बाबतीत अजूनही ठोस असे मार्गदर्शन वरीष्ठ स्तरावरून उपलब्ध नाही.) मात्र 22 जून 2015 च्या PSM GR नुसार वर्गशिक्षकांना काहीच अडचणी निर्माण होणार नाही.
मात्र
 IMP 
 इतर सर्व cwsn मुलांच्या प्रश्नपत्रिकेत आवश्यकतेनुसार अनुकूलन करून मिळालेले मार्क्स ऑनलाइन भरणे अपेक्षित आहे.

वरील आव्हानाचा सारासार विचार करता आपल्या तालुक्यातील बेडरेस्ट मुलांचा विचार करता इतर cwsn मुलांच्या तुलनेत हे विद्यार्थी शून्य पॉईंट च्या किंवा फार फार तर 1% च्या तुलनेत आहे. म्हणजे  इतर cwsn विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त आपण १६ ऑक्टोंबर २०१८ च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन प्रश्नपत्रीकेतील अनुकूलन करून शैक्षणिक प्रगती चाचणी घेऊन ऑनलाइन मार्क्स भरण्या विषयी वर्गशिक्षकांनी अध्ययन शैली (दृश्य,स्पर्श, श्राव्य,बहू अध्ययन शैली) निहाय हा १६ ऑक्टोंबर २०१८ च्या GR नुसार प्रश्नपत्रिका अनुकूल विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार अनुकूलन करण्यात यावे.

वरील आव्हानाबाबतीत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी देखील काही समस्या, सभ्रम असेल तर 


ऑनलाइन मार्क्स नोंदीबाबतविशेष गरजा HBE मुलांची नोंद पटावर तर राहणारच आणि सरल पोर्टलवर on line मध्ये वर्ग व विषय निहाय ऑगस्ट मध्ये विदयार्थी नावे नोंदणी केली जाते. मग त्यात विदयार्थी नाव अगोदरच add केलेले असते, त्यानंतर पायाभुत व संकलित 1 व 2 चाचणी मध्ये विषय गणित व भाषा मध्ये लेखी व तोंडी असे उल्लेख असतो. विदयार्थी नावासमोर काहीच add किंवा Edit करता येत नाही, कारण ती यादी लॉक असते. फक्त लेखी व तोंडी मध्ये विदयार्थी मार्क add करायचे असतात.

तर मग विदयार्थी हा HBE चा आहे तो सध्या प्रारंभिक स्तरावर आहे *तोंडी मध्ये हावभाव व वस्तूकडे हात दाखवून प्रयत्न करतो.* असे करून तोंडी मार्क देणे.

*लेखी मध्ये* खालच्या वर्गातील लेखनिक द्वारे शाररीक मदत,प्रोत्साहन व प्रत्यक्ष कृती द्वारे प्रयत्न करतो म्हणून *विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया प्रतिसाद लक्षात घेऊन* जे अपेक्षित आहे ते मार्क देणे.

*आता या ठिकाणी प्रगत व अप्रगतचा प्रश्नच येत नाही* (22जून2015 च्या psm GR नुसार वगळण्याची सवलत दिलेली आहे.)

*सरल मध्ये students portal वर गेल्यावर बाजूला students update या ठिकाणी जाणे. त्या ठिकाणी 21 प्रवर्ग दिले आहेत व प्रमाणपत्र आहे किंवा नाही असे नमूद आहे. त्या ठिकाणी cwsn विदयार्थी संपूर्ण माहिती भरल्यावर त्या वर्गातील तीव्र  cwsn वगळून इतर विदयार्थी पटानुसार त्या विषयाची टक्केवारी येते. आणि cwsn मुलाची स्वतंत्र माहिती दिसते.* म्हणून प्रगत-अप्रगत च त्या वर्गावर काही परिणाम होत नाही.
पुढे त्या विद्यार्थ्यांला *विशेष तज्ञ व विशेष शिक्षक* मार्फत वर्ग शिक्षक व पालक यांना वेळोवेळी समुपदेशन द्वारे शाळेत नोंदी घेणे. आणि दररोज 2 ते 3 तास विद्यार्थ्यांची वर्गात थांबण्याची मानसिकता लक्षात घेऊन उपस्थित राहून अध्ययन अनुभव देणे.शाळेतील परिपाठ इतर सह शालेय उपक्रमात सहभागी करून घ्यावे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल व सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
Previous Post Next Post