विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांचे निम्न व उच्च स्तरावरील आव्हाने व उपाययोजना


inclusive education school maharshtra

विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांचे निम्न व उच्च स्तरावरील आव्हाने व उपाययोजना 




विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी वेळोवेळी आपण आपल्याला आलेल्या आव्हानांचा , अडचणी/समस्यांचा शोध घेत असतो. विशेष गरजा  असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर  निश्चिती करण्यात आली तेव्हा काही आव्हानांना  सामोरे जावे लागले. जसे- कर्णबधिर मुलांचा अध्ययन स्तर कसा निश्चित करावा? अंध मुलांचा स्तर  कसा निश्चित करावा? अशा दिव्यांगांतील २१ प्रकार निहाय आव्हाने वेगवेगळी होती. मात्र अशा वेळी अध्ययन शैली नुसार विशेष गरजा  असणाऱ्या CWSN  मुलांचे अध्ययन स्तर  निश्चिती (विश्लेषण) करण्यात आली. त्यावेळी उच्च व निम्न स्तरावरील आव्हानांची यादी तयार केली गेली. शोध घेण्यात आला.

विद्यार्थी अध्ययन स्तराच्या निम्न स्तरावर
असल्याचे कारणे




नियमित शाळेत न येणे.शाळेत वर्गात पूर्ण वेळ न थांबणे.

·       शिकवताना लक्ष न येणे.
·       अध्ययन शैली (दृक,श्राव्य,स्पर्श,बहुअध्ययन शैली) प्रमाणे अध्ययन अनुभवाचा अभाव
·       शिकवलेले लक्षात न राहणे, विस्मरण होणे.
·       स्वयंअध्ययनाचा अभाव
·       शिकण्याची गती कमी (आकलन क्षमता कमी) असल्याने नियमित सातत्य , सरावाचा अभाव, अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष
·        एका जागेवर स्थिर बसत नाही. (वर्तनसमस्या )
·       बहुभाषिक अध्यायनार्थी
·       आदिवासी बोलीभाषा प्रभाव
·       पालक, शिक्षकांमध्ये असुरक्षित भावना
·       घरापासुन शाळेचे अंतर लांब असल्याने नियमित  शाळेत येण्याबाबत समस्या
·       पालकांचे स्थलांतर
·       बहुवर्ग जबाबदारी , पटसंख्या जास्त असल्याने उच्च स्तर अध्ययनार्थी, पाठ्यक्रम व निम्न स्तर अध्ययनार्थी तयारी करून घेण्याबाबत आव्हान
·       माध्यमिक शाळामध्ये जास्त पटसंख्या व विषय शिक्षक असल्याने अध्ययन स्तर गाठण्याची जबाबदारी व कार्यवाही याबाबत संभ्रम अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष
·       अध्ययन अध्यापन प्रक्रियेत शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करण्याचा अभाव
·       बौद्धिक अक्षमता असणाऱ्या बालकाकडून नॉर्मल विद्यार्थ्या बरोबरीने प्रगती व्हावी असा अट्टहास धरल्याने अपेक्षित यश मिळत नाही, म्हणून अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष.
·       अध्ययनार्थी च्या गरजेनुसार बदल करण्याची आवश्यकता असल्याने त्याची पूर्तता होताना दिसून येत नाही.
·       वर्गशिक्षकांचे अवांतर कामे , बहुवर्ग जबाबदारी ,जास्त पटसंख्या बहुवर्ग  यामुळे स्ट्रेस व्यवस्थापन करण्यात गोंधळ त्याचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम
·       पालकांची उदासिनता, अभ्यासाविषयी दुर्लक्ष
·       वैद्यकीय दृष्टीकोन, भावनिक होऊन अप्रत्यक्षपणे दूर्लक्ष


विद्यार्थी अध्ययन स्तराच्या उच्च स्तरावर असल्याचे कारणे


·       नियमित शाळेत येणे.
·       शिकवतांना लक्ष देणे. अवधान उत्तम
·       वर्गकार्य,गृह्कार्य वेळेत पूर्ण करणे.
·       स्वयंअध्ययन व नियमित सातत्य ठेऊन सराव करणे.
·       अध्ययन-अध्यापन प्रक्रिया कृतियुक्त अध्ययन अनुभव व प्रत्यक्ष अनुभव
·       रात्र अभ्यासिका वर्ग
·       दृक , श्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर डिजिटल क्लासरूम, e-learning, Audio, Videos
·       सहअध्ययनाचा चांगला परिणाम
·       ज्ञानरचनावादी वर्गात सर्वांना संधी व सहभाग 
·       अंगणवाडी पासून ते प्राथ.उच्च प्राथ.वर्गात पायाभक्कम करून घेतल्याने उच्च स्तरावर
·       बहुवर्ग अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत SMC मार्फत गावातील होतकरू १२ वी , BA,Bsc,Ded पास झालेल्या विद्यार्थ्याकडून बेसिक गोष्टी शिकवण्यासाठी मदत
·       पालकांचे विशेष लक्ष 
      विद्यार्थ्यांच्या क्षमता , गरजा ओळखून त्यांच्या शिकण्याच्या गतीने रंजक व सहज पद्धतीने (मुलांची मानसिकता ओळखून) अध्ययन अनुभव


     अध्ययन स्तराच्या निम्न व उच्च स्तरावरील आव्हाने कारणांचा शोध घेऊन त्यानुसार आवश्यकतेनुसार व परिस्थितीनुसार शिक्षकांचे उपक्रम असा एकत्रित विचार करून काही उपाय योजना करता येऊ शकेल. जेणेकरून विद्यार्थी अध्ययन करण्यास मदत होईल. 


उपाययोजना


·      बहुवर्ग पटसंख्या जास्त असणाऱ्या शाळामध्ये विद्यार्थी गट निहाय अध्ययन-अध्यापन अनुभव देणे.


·      ज्ञानरचनावादी वर्ग,कृतियुक्त अध्ययन अनुभव, डिजिटल क्लासरूम, e-learning द्वारे अध्ययन अनुभव दृक,श्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करणे.


·      अध्ययन शैलीदृक,श्राव्य,स्पर्श , बहुअध्यय्न शैली बाबत वर्गशिक्षकांना अवगत करणे. केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणे.


·      शैक्षणिक सहाय्यभूत सेवा मिळाव्यात यासाठी  वैद्यकीय दृष्टीकोन व अध्यायनार्थी दृष्टीकोन याबाबत पालक, वर्गशिक्षक यांचे सक्षमीकरण करणे.


·      आदि.बोलीभाषा अध्याय्नार्थीना बोलीभाषेतून अध्ययन अनुभव देण्यासाठी अभ्यास साहित्य उपलब्धता यासाठी पालक, वर्गशिक्षकांना प्रोत्साहित करणे.


·      उपलब्ध वाचन,गणित साहित्य पेटीतील साहित्याचा प्रभावी व नियमित वापर करण्यासाठी विद्यार्थी व वर्गशिक्षकांना मार्गदर्शन

·      दृश्य अध्ययन शैलीअध्ययनार्थी,स्पर्शअध्ययन शैली व  बहुअध्ययन शैली  अध्ययनार्थी यांच्या इतर ज्ञानेद्रियांचा अध्ययनाचे माध्यम म्हणून वापर  यासाठी वर्गशिक्षकांचे सक्षमीकरण व प्रोत्साहन देणे.


·      पालक, शिक्षकांमधील HBE अध्याय्नार्थीच्या बाबतीत असुरक्षित भावना दूर करण्यासाठी शाळेत पूर्ण वेळ थांबणे, वर्गात सहभाग यासाठी सवंगडी,पालक,वर्गशिक्षक यांना समुपदेशन करणे. तसेच रिसोर्स टिचर च्या माध्यमातून आवश्यकतेनुसार एक महिना, पंधरा दिवसाचे डे केयर सेंटर सुरु करणे.


·      पालकांचे मुलांच्या गुणवत्तेविषयी उदबोधन कार्यशाळा घेऊन समुपदेशन करणे.

·      निम्न स्तरातील अध्याय्नार्थीना उच्च स्तरातील अध्ययनार्थी सोबत सहध्ययन करण्यास मार्गदर्शन करणे.

·      स्वयंअध्ययनाची सवय विकसित करण्यासाठी मनोरंजनात्मक अध्ययन अनुभव देवून मुलांची मानसिकता ओळखून सातत्य ठेवणे व नियमित सराव करून घेणे.


·      अध्ययन अनुभव दिल्यानंतर कठीण संकल्पना समजण्यास अथवा विस्मरण , लक्ष न देणे यासाठी अध्ययन अनुभव देण्याच्या पद्धतीत बदल करणे. यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे. उदा. दृश्य अध्ययन शैली विद्यार्थ्यांना श्रवण शैली वर उर्जा खर्च न करता दृश्य अध्ययन शैलीवर भर देणे.

·      शिक्षकांना प्रोत्साहित व प्रेरणादायी मार्गदर्शन सकारात्मक मानसिकता स्वयंप्रेरित होऊन काम करणे यासाठी शिक्षकांचे समुपदेशन करणे. याचा पुरावा आपणास आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या शाळेतील स्थिती उत्कृष्ट आहे. तेथील शिक्षक आणि ज्या शाळेची स्थिती चांगली आहे तेथील शिक्षक यामध्ये जर तुलना केली तर याची प्रचीती आपणास येईल. यासाठी शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणे.


·      प्रत्येकाची शिकण्याची गती ही वेगवेगळी असते. जे अध्यायनार्थी मागे राहतात त्यांच्यासाठी नियमित सातत्य ठेवुन सराव करून घेणे. याचा चांगला परिणाम दिसून येतो, यासाठी अध्ययन अनुभव देण्याच्या पद्धतीत थोडा-फार बदल करण्याची आवश्यकता असते. शक्य होईल तेवढे जिवंत स्वरूपातील अध्ययन अनुभव देणे आवश्यक आहे. हे आपण समजून घेणे खूप गरजेचे आणि महत्वाचे आहे.   


·      हावभाव , लिप रीडिंग, देहबोली , स्पर्श अनुभव ,दृश्य,श्राव्य अनुभव, लेखन स्वरुपात वर्गशिक्षक-विद्यार्थी, पालक-विद्यार्थी, विद्यार्थी-सवंगडी यांच्यातील संभाषण कौशल्य विकसित करणे . अध्यायनार्थी व वर्गशिक्षक यांच्या मधील आंतरर्क्रिया यासाठी शैली नुसार संभाषण  कौशल्य विकसित करण्याबाबत वर्गशिक्षकांना मार्गदर्शन करणे.


·        परिसर, कुटुंब, सवंगडी, नातेवाईक बाबत प्रश्न विचारल्यास सवांद साधता येणे. चौदाखडी , मुळाक्षरे अक्षर-अक्षर , चित्र-अक्षर जोड्या , अक्षरातील वेगळा, मुळाक्षराचे ध्वनी ऐकवल्यास अक्षर ओळख व लेखन करणे, अक्षर अंताक्षरी , समान अक्षर , समान चित्र जोड्या लावणे, चित्रातील व्यक्ती,वस्तू ओळखणे, चित्रातील कृती सांगून वर्णन करता येणे. गटामध्ये , वैयक्तिक रित्या गाणी बोलणे, ऐकणे कृतियुक्त सहभाग घेणे. चित्रकार्ड-शब्द, शब्द-शब्द , शब्दडोंगर, शब्दचक्र, शब्दभेंड्या , शब्द-चित्र यांचा संबंध जोडून माहिती सांगणे. परिचयातील शब्द , वर्गातील वस्तूंची , मित्रांची नावे (नाव पट्टी) , वाचन लेखन करणे. कुटुंबातील सदस्यांची नावे लेखन वाचन करणे. औपचारिक , अनौपचारिक विषयावर गप्पा मारणे. दिनचर्या , घटनाक्रम सांगता येणे . ऐकलेल्या गोष्टी , कविता , विषय , पात्र इ. विषयी गटा गटाने चर्चा करता येणे. शब्दावरून वाक्य तयार करणे , वाक्यातील शब्द सांगता येणे, कृती वाक्याचा अर्थ सांगता येणे,  वस्तू हाताळून वाक्यात वर्णन करता येणे. विविध प्रकारचा मजकूर उदा. बालसाहित्य, सूचनाफलक, वृतमान पत्र समजपूर्वक वाचन करता येणे.व्याकरण दृष्ट्या योग्य गतीने वाचन करता येणे. अशा विविध शैक्षणिक उपक्रम राबवुन अध्याय्नार्थीना वाचन पेटीतील साहित्याचा प्रभावी वापर करून अध्ययन अनुभव देवून वर्गातील १०० % विद्यार्थ्याचा उच्च स्तर गाठणे.     


·      अवकाशीय संकल्पना जसे पुढे-मागे, कमी-जास्त, लहान-मोठा, वर-खाली, जड-हलका इ. संकल्पना ओळखणे. वस्तू-साहित्य मोजणे, मनीमाळेवर १ ते १०० अंक वाचन करणे, बिंदू जोडणे, गिरवणे , रांगोळी, धुळपाटीवर रेखाटणे, गणितीय भाषेद्वारे कृती करणे ध्वनी भाषा, स्पर्श भाषा, कृती भाषा, गोष्ट भाषा, साहित्य वस्तू भाषा, चित्र भाषा, चलन भाषा, अंक भाषा द्वारे अंक ओळख , अंकवाचन, लेखन करता येणे.पेक्षा लहान-पेक्षा मोठा संबंध सांगणे. चढता क्रम,उतरता क्रम, इयत्ता निहाय संख्या वाचन व बिनहातच्याची हातच्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इ. क्रिया करता येणे. गणितीय मांडणी , दैनदिन व्यवहाराशी निगडीत गणित सोडवता येणे. मुलभूत संबोध सांगता येणे. शाब्दिक उदाहरणे सोडविता येणे. अशा विविध शैक्षणिक उपक्रम राबवुन गणितीय पेटीतील साहित्याचा प्रभावी वापर करून, वर्गातील १०० % अध्याय्नार्थीना अध्ययन अनुभव देवून उच्च स्तर गाठणे.


·      असे अध्यायनार्थी ज्यांना दैनदिन कौशल्य स्वच्छता, भावनिक व शारीरिक विकासाची गरज आहे त्यांना प्राधान्यक्रमाने कौशल्य निहाय कृती आराखडा नियोजनाप्रमाणे व अध्ययन स्तर भाषा व गणित विषय स्तर यासाठी नियमित शाळेत येणे व शाळेतील सहशालेय उपक्रमात सहभाग तसेच वर्गातील सहभाग याविषयी नियमित थेरेपी सेवा लाभ विशेष शिक्षक व समावेशीत शिक्षण तज्ञ यांच्या मार्फत वर्गशिक्षकाच्या मदतीने अध्यापन सहाय्य देणे. नियमित व कायमस्वरूपी थेरेपी सेवा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणे. थेरेपी सेवा कायमस्वरूपी मिळाल्यास वर्गात समावेशन करण्यास मदत होईल. रिसोर्स टिचर च्या माध्यमातून आवश्यकतेनुसार एक महिना, पंधरा दिवसाचे डे केयर सेंटर सुरु करणे.



आरोग्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या गरजेनुरूप सहाय्यभूत सेवा लाभ देणे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडथळे दुर होतील. (साहित्य साधन, मदतनीस , प्रवास प्रोत्साहन भत्ता, थेरेपी सेवा, शस्रक्रिया, औषोधोपचार इ.)





जुन्या गोष्टी नवीन तात्पर्य.........


 एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल , निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे विक्री कमी होऊ लागली की, एखादा फुगा तो सिलिंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होई. असे तो दिवसभर करत राही.
असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याचा लक्षात आलं कि कोणीतरी आपलं जाकीट ओढतंय. त्यानं मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता मुलानं त्याला विचारलं, "काका , काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का?" मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमानं त्यानं उत्तर दिलं, "बाळ फुगा रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंच उंच जातो."

तात्पर्य-रंग रूपावरून परीक्षण न करता मुलांच्या आत जे काही आहे ते शोधून काढणे आवश्यक आहे. व त्यानुसार त्याच्या क्षमतेनुसार त्याला अध्ययन अनुभव देणे गरजेचे आहे.




 एका घरात दोन बेडूक उड्या मारत असताना एका घुसळलेल्या  ताकात पडले , तेथून बाहेर पडण्यासाठी ते बेडूक खूप धडपड करू लागले. पण ठोस आधाराशिवाय बाहेर येणे त्यांना अशक्य होते. बुडण्यापासून वाचण्यासाठी ते बेडूक खूप पोहत होते. पण काही वेळाने ते बेडूक थकले,  त्यापैकी एक बेडूक म्हणाला मी खूप थकलो आहे. इथून सुटका होण्यासाठी काही आशा दिसत नाही म्हणून मी काही पोहणार नाही. अशा प्रकारे पहिल्या बेडकाने पोहणे थांबवल्या मुळे ते बेडूक बुडून मेला.
            पण दुसऱ्या बेडकाने आशा सोडली नाही , त्याने विचार केला जो पर्यंत शक्य आहे तोवर मी प्रयत्न करेन, आणि  तो पोहत राहिला त्याच्या या सतत च्या हालचालीमुळे ताक छान घुसळले गेले. छान घुसळल्या मुळे ताकावर छान लोणी तरंगू लागले. तरंगलेल्या लोण्याचा आधार घेवून बेडुक भांड्याच्या बाहेर आला.



तात्पर्य - जीवनात शेवटच्या क्षणापर्यंत आशा ठेवली पाहिजे, समावेशित शिक्षणात CWSN मुलांना लगेच यश मिळेल असे नाही, त्यासाठी कुटुंबाकडुन , समाजाकडून , कार्य करत असलेल्या घटका कडून सातत्याने प्रयत्न झाले पाहिजे.



दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य
अध्ययन शैली व प्रकार , अध्ययन स्तर  निश्चिती (विश्लेषण) , दिव्यांगांतील २१ प्रकार


Previous Post Next Post