विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती विश्लेषण

विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती विश्लेषण 


cwsn education programe



बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे त्यानुसार समावेशित शिक्षण उपक्रमातून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांचे अध्ययन स्तर निश्चिती करण्यात आली.

विशेष मूल हे वेगवेगळ्या अध्ययन शैलीने शिकत असते. बदलत्या शिक्षण धोरणानुसार किंवा शिक्षणातील बदलत्या आव्हानानूसार शाळेतील प्रत्येक मुलाला आनंद दायी शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक शिक्षक प्रयत्न करीत आहे. विशेष गरजा  असणाऱ्या मुलांच्या अध्ययन शैली उदा. दृश्य ,स्पर्श,श्राव्य,बहू अध्ययन शैलीने अध्ययन सहायय करणे आवश्यक असते.

अध्ययन शैली learning  style 

त्यानुसार मुलांच्या अध्ययन शैली नुसार मुलांचे अध्ययन स्तर निश्चिती करून कृती आराखडा तयार करण्यात आला असून मागे असणाऱ्या मुलांच्या समस्या , आव्हाने यांचा शोध घेऊन वर्गातील गटागटाने मुलांना अध्ययन अनुभव दिले जाते. अशा प्रकारचे मायक्रो विश्लेषण नक्कीच मुलांच्या शैक्षणिक नियोजनासाठी मदत करू शकते.
  

विशेष  गरजा असणाऱ्या अध्ययनार्थी चे वैद्यकीय दृष्टीकोनातून विश्लेषण अध्ययन स्तर निश्चिती इयत्ता १ ली ते ८ वी


Analysis table


  • तालुक्यातील एकुण ११ केंद्रामध्ये सर्व जि.प. शाळा , सर्व माध्यमाच्या खाजगी अनुदानित विनाअनुदानित एकुण शाळा १३५ शाळेत पैकी ८२ शाळेतील  इयत्ता १ ली ते ८ वीतील वरील तक्त्यातील प्रवर्गनिहाय विद्यार्थी दाखल असून नियमित शाळेत येऊन शिक्षण घेत आहे.
  • वैद्यकीय दृष्टीकोनातून विचार केल्यास अंशत:अंध, मतीमंद (बहुअध्यय्न शैली अध्ययानार्थी)  या प्रवर्गातील संख्या जास्त आहे. 
  • अध्ययन अक्षम,वाचादोष,अस्थिव्यंग,बहुविकलांग (बहुअध्यय्न शैली अध्ययानार्थी)  कर्णबधीर (दृश्य अध्ययन शैली)या प्रवर्गातील संख्या ही समप्रमाणाच्या आसपास दिसून येते.कुष्टरोग,सेरेब्रल पाल्सी,स्नायु विकृती व स्वमग्न (बहुअध्यय्न शैली अध्ययानार्थी)   या प्रवर्गातील संख्या कमी आहे.  


अध्ययन शैली नुसार केंद्रनिहाय व तालुक्याचे विश्लेषण अध्ययन स्तर निश्चिती इयत्ता १ ली ते ८ वी


learning style wise Analysis


  • अध्ययनार्थी पंचज्ञानेद्रीयेमार्फत अध्ययन अनुभव घेऊन शिकत असतात. cwsn अध्ययनार्थी यांच्या उर्वरित ज्ञानेद्रीयामार्फात अध्ययनाचे माध्यम द्वारे अध्ययन अनुभव देणे गरजेचे आहे. 
  • सर्व अध्ययनार्थीसाठी जसे-दृश्य,श्रवण,स्पर्श व बहुअध्यय्न शैली तालुक्याचा विचार करता ९% अध्ययनार्थी हे दृश्य अध्ययन शैलीने शिकतात. ९१% अध्ययनार्थी हे बहुअध्यय्न शैलीने शिकतात. 
  • अंध अध्ययनार्थी हे श्रवण व स्पर्श अध्ययन शैलीने शिकतात. तालुक्यात अंध प्रवर्गातील एकही अध्ययनार्थी नाही.
  • केंद्राचा विचार करता पाभरे,म्हसळा,मेंदडी या केंद्रामध्ये बहुअध्यय्न शैली अध्ययनार्थी प्रमाण जास्त आहे. पाभरे,मेंदडी व वरवठने केंद्रात दृश्य शैली अध्ययनार्थी प्रमाण इतर केंद्राच्या तुलनेत जास्त आहे.


भाषा विषयातील अध्ययन स्तर टप्यानुसार प्रवर्गनिहाय तालुक्याचे विश्लेषण अध्ययन स्तर निश्चिती इयत्ता १ ली ते ८ वी


Analysis according to the study style of the language subject




  • भाषा विषयामध्ये अंशतःअंध,वाचादोष,अस्थिव्यंग, (बहुअध्यय्न शैली) हे अध्ययनार्थी उतारा स्तरामध्ये उच्च स्तरावर आहे. मात्र याच प्रवर्गातील काही अध्ययनार्थी हे अक्षरवाचन,शब्दवाचन,वाक्यवाचन व चित्रवाचन या टप्यावर सुद्धा दिसून येतात. 
  •  मतीमंद व बहुविकलांग (बहुअध्यय्न शैली)  हे अध्ययनार्थी संभाषण ,चित्रवाचन,अक्षरवाचन,शब्दवाचन या टप्यावर दिसतात. 
  • बहुविकलांग या प्रकारातील एक अध्ययनार्थी वाक्यावाचन स्तरावर आहे.
  • अध्ययन अक्षम या प्रवर्गातील अध्ययनार्थी (बहुअध्यय्न शैली अध्ययानार्थी)   अक्षरवाचन व शब्दवाचन स्तरामध्ये प्रमाण जास्त आहे.  


भाषा विषय अध्ययन स्तर विश्लेषण


Language study level analysis


  • भाषा विषयामध्ये सर्वाधिक अध्ययनार्थी हे उतारा स्तरावर आहे. 
  • त्यानंतर प्रारंभिक,अक्षरवाचन,शब्दवाचन व वाक्यवाचन असा क्रम लागतो. याचे कारण असे की प्रत्येक अध्ययनार्थी  क्षमता, कारणे,आव्हाने वेगवेगळी आहे. इथे बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी हे उतारा स्तरावर सर्वाधिक आहे.
  • ३६% अध्ययनार्थी उतारा स्तरावर  
  • ८% अध्ययनार्थी  वाक्यवाचन स्तरावर, 
  • २०% अध्ययनार्थी अक्षरवाचन स्तरावर, 
  • १०% अध्ययनार्थी शब्दवाचन स्तरावर, 
  • ८% अध्ययनार्थी  प्रारंभिक स्तरावर आहेत.   
  • भाषा विषयाच्या अध्ययन स्तराच्या टप्याम्ध्ये उच्च स्तराकडून निम्न स्तराकडे असा उतरता क्रम लागतो.
  •  तालुक्यातील १००% पैकी फक्त २६% अध्ययनार्थी प्रारंभिक स्तरावर आहे. व ९२% अध्ययनार्थी हे अध्ययन स्तराच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. पैकी ३६% अध्ययनार्थी उच्च स्तरावर आहेत.



गणित विषय अध्ययन स्तर विश्लेषण



संख्याज्ञान

math analysis table psm inclusive education



  • गणितामध्ये संख्याज्ञान स्तरावर २७% अध्ययनार्थी चार अंकी संख्यावाचन,  
  • १३% अध्ययनार्थी तीन अंकी संख्यावाचन, 
  • १८% अध्ययनार्थी दोन अंकी संख्यावाचन, 
  • १९% अध्ययनार्थी एक अंकी संख्यावाचन स्तरावर आहेत.  
  • २३% अध्ययनार्थी हे प्रारंभिक स्तरावर आहेत.
  • गणितामध्ये १००% पैकी २३% अध्ययनार्थी प्रारंभिक स्तरावर व ७७% अध्ययनार्थी संख्याज्ञान च्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. पैकी २७% अध्ययनार्थी उच्च स्तरावर आहेत.

गणितीय क्रिया विश्लेषण



Mathematical table analysis inlusive education




  • गणितीय क्रियामध्ये २५% भागाकार स्तरावर, 
  • १२% गुणाकार स्तरावर, 
  • ८% वजाबाकी स्तरावर व १९% अध्ययनार्थी बेरीज स्तरावर आहेत. 
  • आणि ३६% अध्ययनार्थीना गणितीय क्रिया सोडविता येत नाही.असे अध्ययन स्तर निश्चिती टप्प्यावरून गणितीय क्रियांमध्ये दिसून येते.
  • बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार या टप्यावर असणाऱ्या अध्यायनार्थींचे प्रमाण हे ६४% आहे व यापैकी नाही यामध्ये ३६% प्रमाण आहे.




इयत्तानिहाय भाषा अध्ययन स्तर  विश्लेषण


class wise language subject analysis special needs




  • इयत्तानिहाय विचार करता विशेष गरजा असणाऱ्या अध्ययनार्थी हे १ली ८ वी या क्रमाने चढता क्रम लागतो. त्यामुळे उच्च प्राथमिक स्तरावरील वर्गात विद्यार्थी संख्या जास्त आहे.
  • भाषा स्तरामध्ये इ.१ ली चे सर्व अध्ययनार्थी प्रारंभिक स्तरावर आहेत.
  • इयत्ता २ री मध्ये अक्षरवाचन स्तरामध्ये जास्त तर शब्दवाचन स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत.
  • इयत्ता री मध्ये संभाषण स्तरावर जास्त तर शब्दवाचन स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत.
  • इयत्ता ४ थी मध्ये चित्रवाचन स्तरामध्ये जास्त तर अक्षरवाचन व वाक्यवाचन स्तराचे समप्रमाणात अध्ययनार्थी आहेत.
  • इयत्ता ५ वी मध्ये उतारावाचन स्तरामध्ये जास्त तर संभाषण व चित्रवाचन स्तराचे समप्रमाणात अध्ययनार्थी आहेत.
  • इयत्ता ६ वी मध्ये उतारावाचन स्तरावर जास्त तर शब्दवाचन स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत.
  • इयत्ता ७ वी मध्ये उतारावाचन स्तरावर जास्त तर वाक्यवाचन व चित्रवाचन  स्तरावर समप्रमाणात अध्ययनार्थी आहेत.
  • इयत्ता ८ वी मध्ये उतारावाचन स्तरावर जास्त तर वाक्यवाचन व शब्दवाचन स्तरावर समप्रमाणात अध्ययनार्थी आहेत.
  • एकत्रित १ ली ते ८ वी चा विचार करता निम्न स्त्राकडून उच्च स्तराकडे असा चढता क्रम लागतो. आणि उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी हे उच्च स्तरावर जास्त आहे प्राथमिक च्या तुलनेत 


इयत्तानिहाय गणित विषय अध्ययन स्तर विश्लेषण


class wise math subject analysis special needs



  • इयत्तानिहाय विचार करता विशेष गरजा असणाऱ्या अध्ययनार्थी हे १ली ८ वी या क्रमाने चढता क्रम लागतो. त्यामुळे उच्च प्राथमिक स्तरावरील वर्गात विद्यार्थी संख्या जास्त आहे.
  • गणितामध्ये इयत्ता १ ली चे सर्व अध्ययनार्थी प्रारंभिक (गणनपूर्वतयारी) स्तरावर आहेत.गणितीय क्रीयामध्ये यापैकी नाही.
  • इयत्ता २ री मध्ये एकअंकी संख्याज्ञान स्तरामध्ये जास्त तर दोन,तीन व चार अंकी संख्याज्ञान स्तरावर समप्रमाणात अध्ययनार्थी आहेत. गणितीय क्रियांमध्ये वजाबाकी , गुणाकार व भागाकार क्रिया करता येणारे समप्रमाणात अध्ययनार्थी आहेत. यापैकी नाही प्रमाण जास्त आहे.
  • इयत्ता री मध्ये प्रारंभिक स्तरावर जास्त तर तीन अंकी संख्याज्ञान स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत. वजाबाकी व गुणाकार स्तरावर सम आणि यापैकी नाही प्रमाण जास्त आहे.
  • इयत्ता ४ थी मध्ये एक अंकी संख्याज्ञान स्तरामध्ये जास्त तर चार अंकी संख्याज्ञान स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत. वजाबाकी व भागाकार सम तर यापैकी नाही जास्त
  • इयत्ता ५ वी मध्ये चार अंकी संख्याज्ञान स्तरामध्ये जास्त तर एक अंकी संख्याज्ञान स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत. भागाकार व यापैकी नाही सम तर बेरीज व गुणाकार समप्रमानात अध्ययनार्थी आहेत.
  • इयत्ता ६ वी मध्ये  चार अंकी संख्याज्ञान स्तरामध्ये जास्त तर तीन अंकी संख्याज्ञान स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत. भागाकार उच्च तर बेरीज वजाबाकी सम प्रमाण आहे.
  • इयत्ता ७ वी मध्ये चार अंकी संख्याज्ञान स्तरामध्ये जास्त तर प्रारंभिक स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत. भागाकार उच्च तर बेरीज वजाबाकी सम प्रमाण आहे.
  • इयत्ता ८ वी मध्ये चार अंकी संख्याज्ञान स्तरामध्ये जास्त तर एक अंकी संख्याज्ञान स्तरावर कमी अध्ययनार्थी आहेत. भागाकार उच्च तर गुणाकार यापैकी नाही सम प्रमाण आहे.


भाषा व गणित विषयाचा एकत्रित निष्कर्ष 


  1. भाषा अध्ययन स्तराचा विचार करता २६% अध्ययनार्थी प्रारंभिक स्तरावर आहे. व ९२% अध्ययनार्थी हे अध्ययन स्तराच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. ९२% पैकी ३६% अध्ययनार्थी उच्च स्तरावर म्हणजेच उतारा स्तरावर आहेत. 
  2. गणितामध्ये २३% अध्ययनार्थी प्रारंभिक स्तरावर व ७७% अध्ययनार्थी संख्याज्ञान च्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. ७७% पैकी २७% अध्ययनार्थी उच्च स्तरावर आहेत. म्हणजेच चार अंकी संख्याज्ञान स्तरावर आहेत. 
  3. गणितीय क्रियामध्ये बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार या टप्यावर असणाऱ्या अध्यायनार्थींचे प्रमाण हे ६४% आहे व यापैकी नाही यामध्ये ३६% प्रमाण आहे. उच्च स्तर म्हणजेच भागाकार या स्तरावर २५% विद्यार्थी आहेत.


भाषा व गणित विषयाचा एकत्रित विचार करता भाषा विषयामध्ये प्रगती चांगली दिसुन येते मात्र गणितामध्ये कमी प्रमाणात आहे.

भाषा व गणित विषयाच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून अध्ययन स्तर  निश्चिती कार्यक्रमातून संशोधनात्मक कार्यवाहीने  असे दिसून येते कि, समावेशित शिक्षण उपक्रमातून विशेष गरजा  असणारे विद्यार्थी शिक्षणाकडे  यशस्वी वाटचाल होत आहे.




Previous Post Next Post