बालदिवस सप्ताह स्पर्धेचा निकाल जाहीर I Baldivas Saptah 2020 Result

बालदिवस सप्ताह स्पर्धेचा निकाल जाहीर I Baldivas Saptah 2020 Result

Baldinsaptah result
महाराष्ट्र शासन – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा आयोजित दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘बालदिवस सप्ताह २०२०’ baldivassaptah2020 , baldivas2020 आयोजित करून त्यामध्ये वर्ग १ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. राज्यस्तर ,जिल्हास्तर व तालुकास्तरावरील स्पर्धकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.

तालुका , जिल्हा व राज्य स्तरावरील समिती कडे स्पर्धेत नंबर आलेल्या स्पर्धकांचे बँक अकाउंट अपडेट करण्याचे काम सुरू आहे. लवकरच यादी आपल्यापर्यंत येईलच आपण आपल्या तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागाशी संपर्क साधून विजेत्या स्पर्धकांची माहिती घेऊ शकता. 
यामध्ये खालील प्रमाणे रोख पारितोषिके स्पर्धकांच्या अकाउंट वर जमा होणार आहे.
Baldin saptah result

Baldivas saptah result 2020



१४ नोव्हेंबर हा दिवस बालदिवस म्हणून साजरा होतो. कारण या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. चाचा नेहरूंना मुले आणि फुले खूप आवडायची.
मुलांमध्ये मुल होऊन पंडितजी तासन् तास रमून जायचे. त्याचे कोमल मन जाणून घेण्यासाठी त्यांची
तळगळ असे. त्यांच्या मते मुल हे देशाचे उज्वल भविष्य आहे. आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.

बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर 2020 या कालावधीत शासनाच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यासाठी खलील गटात उपक्रम
घेण्यात आले होते.

राज्यातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात भाग घेताना आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून  व्हिडिओ, फोटो #baldivas2020 या हॅशटॅग चा वापर करून अपलोड केले होते.
यासोबत सदर उपक्रम विद्यार्थी Instagram, twitter यावर देखील baldivas2020 हा हॅशटॅग वापर करून अपलोड केले होते. 
यामध्ये खालील प्रमाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

दिवस क्र ०१
दिनांक :- ०८-११-२०२० 
इयत्ता :-१ ली व २ री-
उपक्रमाचे नाव :- भाषण 
उपक्रम तपशिल :" मी नेहरु बोलतोय " या विषयावर ३ मिनिटांचा वैयक्तिक व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा .

दिवस क्र ०२
दिनांक :- ०९-११-२०२० 
इयत्ता :- ३ री ते ५ वी 
उपक्रमाचे नाव :- पत्रलेखन 
उपक्रम तपशिल : चाचा नेहरुंना पत्र लिहा . ( शब्द मर्यादा ३०० ) सदरील पत्र A४ साईज कागदावर लिहून सदर निबंधाचे स्पष्ट फोटो , PDF  Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा.

दिवस क्र ०३
दिनांक :- १० -११-२०२० 
इयत्ता :-६ वी ते ८ वी 
उपक्रमाचे नाव :- स्वलिखित कविता वाचन 
उपक्रम तपशिल :नेहरुंवर स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करून कवितेचा व्हिडीओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा. 

दिवस क्र ०४
दिनांक :- ११ -११-२०२० 
इयत्ता :- ६ वी ते ८ वी 
उपक्रमाचे नाव :- नाट्यछटा / एक पात्री 
उपक्रम तपशिल :नेहरुंच्या जीवनावर आधारीत ३ मिनिटांचा व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा. 

दिवस क्र ०५
दिनांक :- १२ -११-२०२० 
इयत्ता :- ९ वी ते १० वी 
उपक्रमाचे नाव :- पोस्टर तयार करणे 
उपक्रम तपशिल : स्वातंत्र्य संग्रामातील नेहरुजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .

दिवस क्रमांक:- ०५
दिनांक:- १२/११/२०२० 
इयत्ता :-११ वी व १२ वी 
उपक्रमाचे नाव :- निबंधलेखन 
उपक्रमाचा तपशील :- १) स्वातंत्र संग्रामातील  नेहरुंचे योगदान 
२) नेहरु-औद्योगिक विकासाचा पाया रचणारे 
३) नेहरु - विज्ञान व तंत्रज्ञान 
( शब्द मर्यादा ९०० ते १००० ) या पैकी एका विषयावर A4 कागदावर निबंध लिहुन त्याचे फोटो Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .

दिवस क्र ०६
दिनांक :- १३ -११-२०२० 
इयत्ता :- ९ वी ते १० वी 
उपक्रमाचे नाव :- निबंध लेखन 
उपक्रम तपशिल : १) नेहरु - स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण- घडणीतील वाटा 
२) नेहरु - भारताचा शोध आत्मचरित्र 
( शब्द मर्यादा ७०० ते ८०० ) निबंध लिहून अपलोड त्याचे फोटो Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .

दिवस क्र ०६
दिनांक :- १३ -११-२०२० 
इयत्ता :- ११ वी व १० वी 
उपक्रमाचे नाव :- व्हिडिओ तयार करणे 
उपक्रम तपशिल : १) नेहरुंच्या जीवनावर आधारित डाक्युमेंटरी तयार करणे . 
( ५ मिनिटांचा व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे.

दिवस क्र ०७
दिनांक :- १४-११-२०२० 
इयत्ता :- १ ली ते १२ वी 
उपक्रमाचे नाव :- बाल साहित्य ई-संमेलन 
उपक्रम तपशिल : नेहरुंशी संबंधित कथा , कविता , प्रसंग सादर करणे ( स्वरचित ) वेळ ३ मिनिट

स्पर्धेसाठी बालदिवस सप्ताह मध्ये भाग घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालील सूचना देण्यात आल्या होत्या.

१) विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी संबंधित स्पर्धेच्या विषयासंबंधीचा फोटो/ व्हिडिओ पालक, शिक्षक यांच्या Facebook/ Tweeter / Instagram/ गुगल ड्राइव्ह या पैकी कोणत्याही एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह  टाकून सदर पोस्ट ची लिंक आपण Copy करून ठेवायची आहे. एका वेळी एकाच स्पर्धेचे सादरीकरण साहित्य (फोटो /व्हिडीओ) Facebook/Twitter/Instagram वर अपलोड करावेत. 
२) वरील पोस्ट टाकल्यानंतर व त्याची लिंक कॉपी करून झाल्यावर आपण scertmaha.ac.in वर स्पर्धेसाठी नावनोंदणी करावी. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचा UDISE क्रमांक (शिक्षकांकडून घ्यावा), मोबाईल क्रमांक, ईमेल आय.डी व ज्या स्पर्धेत भाग घेतला आहे त्याची वरील १ मध्ये नमूद केलेली लिंक सोबत असणे आवश्यक आहे.  हे नसल्यास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
३) क्र.१ व क्र.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यावर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध होणार आहे. ते डाऊनलोड करून घेण्यात यावे.
४) प्रत्येक स्पर्धेत एका विद्यार्थ्यास एकदाच भाग घेता येईल. 
५) दुसऱ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नव्याने पोस्ट तयार करून नव्याने नावनोंदणी करून स्पर्धेत भाग घेऊन क्र.१ ते ३ प्रमाणे कार्यवाही करावी.
६) सहभागी विद्यार्थ्यांमधून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट सादरीकरणास पारितोषिके व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे.
७) सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी Facebook/ Tweeter / Instagram/ गुगल ड्राइव्ह वर पोस्ट करणे व आवश्यक तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे/ शिक्षकांचे सहाय्य घेणे अभिप्रेत आहे.
८) प्रत्येक स्पर्धेच्या सहभाग घेण्याची मुदत संबधित दिवशी रात्री १२.०० वाजता संपेल.

वरील प्रत्येक उपक्रमासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात
येतील. असे कळविण्यात आले होते. त्यानुसार तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले आहे.
सदर विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले.  


सदर निवड करण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली होती.
या निवड समिती द्वारे स्पर्धकांचे नंबर काढण्यात आले आहे.

तालुका स्तरावरील निवड समिती

1.गट शिक्षण अधिकारी - अध्यक्ष
2. मुख्याध्यापक -३ सदस्य
3. शिक्षक -२ सदस्य
4. केंद्रप्रमुख- सदस्य सचिव

जिल्हा स्तरावरील निवड समिती

1.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) - अध्यक्ष
2.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) - सदस्य सचिव
3. मुख्याध्यापक -३ सदस्य
4. शिक्षक -२ सदस्य

राज्य स्तरावरील निवड समिती

1.संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र,पुणे - अध्यक्ष
2. प्राचार्य,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र,पुणे-  सदस्य सचिव
3.मुख्याध्यापक/प्राचार्य-३ सदस्य
4. शिक्षक-२ सदस्य

तालुका , जिल्हा व राज्य स्तरावरील समिती कडे स्पर्धेत नंबर आलेल्या स्पर्धकांचे बँक अकाउंट अपडेट करण्याचे काम सुरू आहे. लवकरच यादी आपल्यापर्यंत येईलच आपण आपल्या तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागाशी संपर्क साधून विजेत्या स्पर्धकांची माहिती घेऊ शकता. 
यामध्ये खालील प्रमाणे रोख पारितोषिके स्पर्धकांच्या अकाउंट वर जमा होणार आहे.

समावेशित शिक्षण ब्लॉग वरील नवीन पोस्ट अपडेट साठी whats app ग्रुप जॉईन करावा.
समावेशित शिक्षण




Previous Post Next Post