स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा ? mpsc study tips in Marathi

पहिल्या प्रयत्नात एमपीएससी(MPSC) मध्ये कसे उत्तीर्ण व्हावे? mpsc study tips in Marathi

Competitive examination


प्रत्येकाचं स्वप्न असतं ,प्रत्येक विद्यार्थ्यांला वाटत असतं की पहिल्या प्रयत्नात यश मिळावं. आणि हे वाटणं स्वाभाविक आहे. परंतु स्पर्धा बघता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जागा 600 ते 1000 कमी जास्त असू शकतात. आणि यासाठी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. त्यातील 30% विद्यार्थी हे परीक्षा द्यायची म्हणून सहजरित्या देतात. 30% विद्यार्थी थोडाफार अभ्यास झालेला असतो. 20% विद्यार्थी हे नुकतेच नव्याने अभ्यासाला लागलेले असतात. आणि परीक्षा देतात. आणि राहिलेले 20% विद्यार्थी यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा असते. आणि याच प्रकारातील मुले यशस्वी होतात. म्हणजे मागील 2 ते 5 वर्षांपासून तयारी करत असतात.


पहिल्या प्रयत्नात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. यासाठी आपण आधी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा परिपूर्ण अभ्यास आणि प्रश्नपत्रिका सराव झालेला असेल तर नक्की आपण यशस्वी होऊ शकता. यासाठी आपण बेसिक पासून तयारी करून अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन करून अभ्यासात नियमितता ठेवल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता.

सर्वात महत्त्वाचे परीक्षा कोणतीही असो. त्या परीक्षेची परिपूर्ण तयारी झाली असल्यास नक्कीच यश मिळेल.

स्पर्धा परीक्षा म्हटलं की स्पर्धा आलीच नावातच स्पर्धा हा शब्द आहे. त्यामुळे आपण करत असलेल्या परीक्षेची तयारी परिपूर्ण केल्यास आपण नक्की स्पर्धेत टिकाल आणि यश प्राप्त कराल.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा? | Mpsc Study Tips in Marathi

सर्वप्रथम आपले ध्येय कोणते आहे. म्हणजे आपण कोणत्या परीक्षेची तयारी करणार आहात. स्पर्धा परीक्षेमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पदाच्या परीक्षा येतात. परंतु जवळपास स्पर्धा परीक्षेचे काही विषयांचा कॉमन अभ्यास करावा लागतो.
उदा. चालू घडामोडी , इंग्रजी ,मराठी व्याकरण इ.

प्रथम आपण वर्षभरात कोणकोणत्या परीक्षा देणार आहोत, आपले लक्ष काय आहे. हे ठरवल्यास अभ्यास सुरुवात करायला सोपे जाईल, म्हणजेच आपले लक्ष आपल्या डोळ्यासमोर असेल.

परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे. कोणते विषय आहेत. त्यातील घटक  उपघटक कोणते? याचे मायक्रो नियोजन Planning करा. 
यासाठी मागील 3 वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचा question paper अभ्यास करून विषय व विषयातील घटकांची व्याप्ती किती हे ठरवा व त्यानुसार नियोजन करा. परीक्षेचा अभ्यासक्रम सतत डोळ्यासमोर राहील अशाच ठिकाणी चिकटवा.

परिक्षा कोणतीही असो अगदी शिपाई पासून ते UPSC पर्यंत अभ्यास परिपूर्ण च करा. म्हणजे आपणास कोठेच अडथळे येणार नाही. अभ्यासक्रम माहीत झाल्यानंतर संदर्भ पुस्तके Books निवडा. यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर ठोकळ्याचा अभ्यास न करता बेसिक पाठ्यपुस्तक वापरा. त्यामध्ये NCERT , SCERT चे इ.5 वी ते 12 वी संबंधित विषय त्यानंतर त्या त्या विषयाचे संदर्भ पुस्तके निवडा.

संदर्भ पुस्तके 

संदर्भ पुस्तके निवडताना यशस्वी झालेल्या कर्मचारी/अधिकारी यांचा सल्ला घ्या. किंवा तुम्ही गुगल , youtube च्या माध्यमातून याबाबत माहिती घ्या. कारण संदर्भ पुस्तके घेण्याची घाई करू नका. बाजारात असंख्य पुस्तके आहेत. त्यामुळे गोंधळून न जाता चर्चा करूनच पुस्तके निवडा. एकदा पुस्तके खरेदी केली की ते आपले सोबती बनवा. तेच तुम्हाला तुमची योग्य मार्ग दाखवणार आहेत.

बेसिक पाठ्य पुस्तक व संदर्भ पुस्तक वाचन सुरू करण्याआधी परीक्षेला किती वेळ आहे. त्यानुसार अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विषयाचे नियोजन तयार करा. अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. कठीण/सोपा वाटणारा विषयाला समान वेटेज द्या.

दिनचर्या ठरवा. तुमचा दिवसभरात कोणत्या वेळेला अभ्यास चांगला होतो. ती वेळ स्वतः च ओळखा आणि अभ्यासाला लागा.

Notes नोट्स काढा त्या रिव्हिजन करायला कामा येतात. आणि नोट्स काढल्यानंतर विषय चांगला समजतो. वेळ कमी असेल तर पुस्तकातच अंडर line करा. पॉईंट लिहून ठेवा.

मागील प्रश्न पत्रिका सोडवा. विषयाचा अभ्यास झाल्यानंतर च प्रश्न पत्रिका सोडवायला घेतल्यास चांगले.

नियमितपणे एक ते दोन चांगल्या दर्जाचे वृत्तपत्र news paperवाचा.

अभ्यास करताना रोज सकाळी अभ्यासक्रम त्यातील घटक डोळ्यासमोर ठेवा. यामुळे आपल्याला जे आवश्यक आहे. त्यावरच लक्ष केंद्रित राहील.

अजून एक महत्त्वाचे चांगला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी नियमितपणे योगा, प्राणायाम करावे. हेल्दी आहार घ्यावा. भरपुर पाणी प्यावे . कंटाळा वाटेल तेव्हा सकारात्मक व्हिडिओ ,पुस्तके,गोष्टी वाचाव्यात यामुळे प्रेरणा मिळते. एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते.

अशा प्रकारे मायक्रो नियोजन केल्यास अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. आणि आपण योग्य दिशेने जाऊन आपले यश संपादन करू.

MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा साठी पुस्तके कोणती ?


बेसिक संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी इ. 5 वी ते 12 वी चे अभ्यासक्रमानुसार  ncert, scert संबंधित पुस्तके text books उदा.इतिहास,भूगोल,विज्ञान…… बेसिक basic concept पुस्तकांचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. याबाबत तुम्ही ऐकलच असेल ते पुस्तके तुम्हाला balbharati text books बालभारती च्या संकेतस्थळावर (1 ली ते 8वी पर्यंत चे) मिळतील परंतु माझा सल्ला असा राहील की तुम्ही 5 वी ते 8 वी चे पुस्तके प्रत्यक्ष तुमच्या जवळच्या शाळेत जाऊन मिळवा.किंवा कुटुंबामध्ये कोणी शिक्षक असेल त्यांच्याकडून घ्या. आणि 9 वी ते 12 वीची पुस्तके तुम्हाला कोणत्याही स्टोर मध्ये मिळतील.

त्यानंतर संदर्भ पुस्तके घेण्याआधी जे यशस्वी झालेत त्यांच्याशी चर्चा करा. कारण प्रत्येक विषय निहाय वेगवेगळ्या पब्लिशर चे संदर्भ वापरावे लागतात. यासाठी मागील दोन वर्षांच्या mpsc परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचा अभ्यास करा. विश्लेषण करा. पुस्तकातील भाषा बघा आणि मगच संदर्भ पुस्तक निवडा. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि मागील प्रश्न पत्रिका यांचा एकत्रित अभ्यास करूनच पुस्तके निवडा. याबाबत youtube वर खूप व्हिडिओ आहेत. गुगल सर्च करा.

आपणास शुभेच्छा !

Previous Post Next Post