'कोरोना संकट ' मराठी निबंध CORONA NIBANDH MARATHI

 'कोरोना संकट ' मराठी निबंध CORONA NIBANDH MARATHI

नमस्कार मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात इयत्ता 10TH & 12TH BOARD EXAM  होणार आहे. सध्या कोरोनाच्या या महामारी मध्ये आपण परीक्षा देणार आहोत. तेव्हा निच्छितच या वर्षी कोरोना संबंधित निबंध लिहण्यास येऊ शकते. यासाठी कोरोना संकट या विषयावर NIBANDH आल्यास आपण त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती लिहू शकू यासाठी आपणास अभ्यासास मदत व्हावी म्हणून आजच्या ब्लॉग मध्ये आपण कोरोना संकट या विषयावर NIBANDH लेखन करीत आहोत. 

कोरोना संकट मराठी निबंध

जगभरामध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. जगभरातील लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, लाखो लोकांचा बळी या विषाणूने घेतला आहे. कोरोना व्हायरस हा आधीपासूनच अस्तित्वात होता. 

हे ही वाचा


यापूर्वी कोरोनाव्हायरस प्रथम १९६० च्या दशकात सापडले. २००३ मध्ये सार्स-सीओव्ही हे देखील कोरोना व्हायरस चे प्रकार आहे. असे बरेच आजार आहेत, जे प्राण्यांमध्ये होते आणि आता माणसांमध्ये आले आहेत. 

याची लागण सर्वप्रथम चीनमध्ये झाली. कोरोना व्हायरस हा कंद आकाराच्या पृष्ठभागाचा अंदाजानुसार मोठा प्लीओफॉर्मिक गोलाकार कण आहेत.  २०१९ मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वूहान शहरात आढळून आला. याला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले. 

सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने रुग्ण मरण्याचे प्रमाण मोठे आहे. चीन मध्ये लोकांनी प्राण्याचे मांस खाल्यामुळे तो मानवी शरीरात दाखल झाला. कोरोना व्हायरस मुळे मृत्युचे प्रमाण देखील वाढत गेले. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी म्हणून घोषित केले. या महामारी मध्ये लाखो लोकांचे जीव गेले.

बालदिवस सप्ताह निकाल

कोव्हीड-१९ या व्हायरसने मानवामध्ये प्रथमच शिरकाव केल्यामुळे सुरुवातीच्या दिवसामध्ये मृत्यू चे प्रमाण हे खूप होते. मात्र हळूहळू यामध्ये वैद्यकीय उपचार कोणता करायला पाहिजे? संसर्ग कसा होतो? संसर्ग थांबवण्यासाठी वारंवार हात धुणे,मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे. याबाबत समाजामध्ये जनजगृती झाली. 

त्यामुळे या कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहे. जगाच्या तुलनेत भारतामध्ये रुग्ण वाढण्याचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यात यश आले. 

मात्र गेल्या काही दिवसामध्ये कोरोनाचे पुन्हा रुग्ण वाढू लागले आहे. त्यासोबत भारतामध्ये कोरोना संकटाशी सामना करत असताना को-व्हक्सिन व कोविशिल्ड या दोन लसीना आपत्कालीन परवानगी मिळालेली आहे. लसीकरण सुरु आहे.

 

कोरोना महामारी मुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. सुरुवातीच्या दिवसामध्ये संसर्ग टाळण्यासाठी , कोरोना रुग्णाची चैन तोडण्यासाठी लॉकडाऊन लावावे लागले. यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योगधंदे बंद ठेवल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले. लोकांचे रोजगार गेले. बहुतांश लोकांवर उपासमारीची वेळ आली. 


बाहेरील राज्यातील लोकांना आपापल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था नसल्यामुळे पायपीट करत आपल्या गावी पोहचावे लागले. काही स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्यात त्यांच्या मार्फत लोकांना अन्न, वाहतूक व्यवस्था , कपडे इ. सेवा पुरवून मदत केली. 

सगळ्यांना आर्थिक परिणाम भोगावे लागले. सर्व लोकं शहराकडून खेड्याकडे दाखल झाली. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला जिवंत राहणेहीच आपली प्राथमिकता आहे हे अधोरेखित करायला भाग पाडले आहे. साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. हेही जगाला दाखवून दिले. 

सर्वजण घरीच असल्याने ताण तणाव , एकलकोंडेपणा , मोबाईल , TV चा अति वापर , लठ्ठपणा इ. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सामाजिक, आर्थिक, भावनिक ,शारीरिक दुष्परीणामांना सामोरो जावे लागत आहे.

 

 कोरोना संकटाकडे सकारात्मक दृष्टीने एक संधी म्हणून पाहिल्यास निच्छितच या वर्षभरात नवनवीन संकल्पना उदयास आल्यात. या २१ व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वर्क फ्रॉम होम संकल्पना असेल किंवा ऑनलाईन शिक्षण , व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मिटींग्स , वेबिणार, कार्यक्रम, स्नेहसंमेलन , उद्घाटन इ कार्यक्रम देखील आपण घरी राहून करू शकतो. हा क्रांतिकारक बदल झाला. 


ग्रामीण भागात अजून नेटवर्क सुविधा नसल्यामुळे काही मर्यादा येतात. मात्र विकासाचे चक्र सुरु राहण्यास नक्कीच मदत झाली असे म्हणता येईल. विनाकारण केल्या जाणाऱ्या खर्चाला आळा बसला त्यासोबतच कमी पैशातच घर चालवता येत. विभक्त कुटुंब पद्धतीतून एकत्र कुटुंब पद्धतीत जीवन सर्वांसोबत राहून तणावमुक्त आनंदी राहण्याचा अनुभव घेतला.

 

संकट कोणतेही असो , बदल हा निसर्गाचा नियम आहे. वर्षभरात लसीचा शोध लागला. सरकारने ठरवून दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन आपण सर्वांनी पाळल्यास लवकरच हे कोरोनाचे संकट जावून, पूर्वी सारखे जीवन सुरळीत होईल. गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा , मास्क लावा, वारंवार हात धुवा ,सुरक्षित अंतर राखा.

अशा प्रकारे आपण आजच्या ब्लॉग मध्ये CORONA NIBANDH कोरोना संकट या विषयावर प्रकाश टाकला. आपल्याला हा ब्लॉग नक्की आवडला असेल. धन्यावद.समावेशित शिक्षण या ब्लॉग वरील नविन पोस्ट चे अपडेट मिळवण्यासाठी whats app ग्रुप जॉईन करावे. 

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post