'चला खेड्याकडे' मराठी निबंध I Chala Khedyakade Marathi Nimbandh

नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा मध्ये मराठी निबंधाचा विद्यार्थ्यांना सराव व्हावा यासाठी या ब्लॉगमधून आपण चला खेड्याकडे या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. यापूर्वीच्या ब्लॉग मध्ये 'कोरोना संकट' या विषयावर निबंध लेखन सरावासाठी उपलब्ध आहे.

chala khedyakde nimbandh

प्रस्तावना

मला आठवतं महात्मा गांधीजींनी 'खेड्याकडे चला' असा नारा त्यावेळी दिला होता. आज हा नारा हुबेहूब प्रत्येकाला लागू होत आहे covid-19 मध्ये कोरोनाच्या या महामारी मध्ये खेड्याचे महत्त्व प्रत्येकाला दिसून आलं. प्रत्येक जण खेड्याकडे धावू लागला. कोरोना पासून वाचण्यासाठी अलिप्त राहण्यासाठी एक चांगलं आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी लोकं गावाकडे येऊ लागला. हा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला. लॉक डाऊन मुळे बऱ्याच लोकांचे रोजगार गेले. जे लोंढे चे लोंढे शहरात रोजगाराच्या निमित्ताने आले होते. ते पुन्हा गावाकडे जाताना आपण पाहिले. याकाळात खेड्याचे महत्व प्रत्येकाला जाणवले आणि लक्षात आले. 

>> माझी शाळा निबंध मराठी  My School Essay in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज निबंध

संत गाडगेबाबा माहिती मराठी 

'चला खेड्याकडे' मराठी निबंध I Chala Khedyakade Marathi Nimbandh

शांत व निरामय जीवन

गावाकडच्या लोकांचं आयुष्य हे खूप मोठं असतं. हे आपण अनुभवले , खूप पूर्वीपासून भारतीय संस्कृती मध्ये गावाकडची संस्कृती ही आरोग्यदायी संस्कृती म्हणून आपण ही अनुभवली. एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा खेड्यांमध्ये तंत्रज्ञान हे झपाट्याने पोहोचू लागलेलं आहे. खेड्याकडचं जीवन म्हणजे निसर्गमय वातावरणामध्ये कष्ट करून स्वतः ला सुरक्षितता प्रदान करणारं जीवन , ज्याप्रमाणे शहरीकरणामध्ये गर्दीचे ठिकाण , गाड्यांचे प्रदूषण , मोठमोठ्या कंपन्यांचे प्रदूषण , गोंगाटाचं वातावरण हे शहरामध्ये दिसून येतं.

मात्र खेड्यामध्ये याउलट आहे तुरळक वस्ती असलेलं गाव त्या गावामध्ये शांतता असते. जेव्हा आपण शहरांमधून गावाकडे जातो तेव्हा आपल्याला याची प्रचिती निश्चितच येते. खूप दिवसांनी गावाकडे आल्यानंतर असं शांत ठिकाणी आल्यानंतर शांत निरामय आयुष्य याप्रमाणे असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. ना प्रदूषण , ना गोंगाट ना गर्दी याउलट निसर्गाच्या सानिध्यात राहून शुद्ध हवा , शांत निरामय जीवन म्हणजे खेड्याकडचे जीवन होय.

शुद्ध वातावरण

सकाळी सकाळी उगवत्या सूर्याचं दर्शन घेत , सूर्याची कोवळे किरणे अंगावर घेत पहाटेच्या गावाकडील शुद्ध वातावरण म्हणजे स्वर्गात गेल्यासारखा आनंद होतो. मन अगदी तृप्त होऊन जातं. या प्रसन्न वातावरणात गावाकडचा फेरफटका मारण्याची मज्जा औरच . शहरात कधी तरी नजरेस पडणारा उगवता सूर्य गावाकडे नित्यनियमाने दररोज नजरेस पडतो.  प्रदूषण विरहीत निरभ्र आकाश , पक्षांचा चिवचिवाट , शुद्ध हवा, पाणी , चुलीवरचे बनवलेले जेवण , शास्वत शेती म्हणजेच शुद्ध वातावरणात नैसर्गिक पद्धतीने तयार होणारे अन्न , पालेभाज्या या अशा खेड्यातील शुद्ध वातावरणात गावाकडची मंडळी निरोगी जीवन जगत आहे. 

>> संत गाडगेबाबा माहिती मराठी 

प्रेमळ व आनंदी लोकजीवन

शहरामध्ये धावपळीच्या जीवन आपल्याला अनुभवायला येते. इथे कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाही. अगदी शेजारी सुद्धा चारभिंती मध्ये बाहेर काय घडते? त्याच्याशी काहीही संबंध नाही.

मात्र खेड्यातील प्रत्येक माणूस हा माणूसपण जपणारा , एकमेकांना मदतीला धावून येणार , या गावकड्याच्या लोकांचे जीवन म्हणजे आनंदी आणि माणसे देखील तेवढीच प्रेमळ , आपुलकीने विचारपूस करणारी. एकमेकांच्या सुख , दुःखात सहभागी होणारी आंनदी , प्रेमळ माणसे म्हणजे खेड्याकडची. आजही सणानिमित्त शहरातील माणसे गावाकडे येतात. तेव्हा याची प्रचिती निश्चितच येते. आणि परत पुन्हा शहराकडे जाण्यासाठी पाय निघत नाही.

कोरोना संकट महामारी मध्ये लॉक डाऊन सुरू झाले तेव्हा याचा अनुभव नक्कीच आला. लोकं शहराकडून गावाकडे येऊ लागली तेव्हा. खेड्याकडच्या प्रेमळ माणसांनी माया दाखवत , कसलीही चिंता न करता लोकांना गावात घेतले. यापेक्षा प्रेमळ माणसे कोठे मिळणार. 'चला खेड्याकडे' हे पुन्हा कोरोनाने लोकांना दाखवून दिले.

निवांतपण

कष्टकरी शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबून काम करतो. तेव्हा सर्वांना शेतातील पिकलेलं अन्न मिळते. हा खेड्यातला शेतकरी खरा राजा आहे. दिवसभर काम करून रात्री निवांतपणे झोप घेणे हे काही शहराच्या लोकांच्या नशिबी नाही. शहरातल्या लोकांना तर म्हणे झोपण्यासाठी गोळ्या खाव्या लागतात. शांत बसायला निवांत वेळ नाही. ना कुणाशी बोलणं, ना कोणासोबत निवांत गप्पा मारणे याला शहरात मर्यादा येतात. 

याउलट गावकड्याच्या माणसांना शेतामध्ये दुपारच्या वेळेला घेतलेला विसावा. शांत ठिकाणी कुटुंबातील सदस्यांची गप्पा गोष्टी , निसर्गाच्या सानिध्यात एकांतपणे निवांत क्षण कोठे असेल तर तो गावाकडेच आज प्रत्येकजण निवांतपणा शोधत आहे. जेव्हा शहरातला माणूस सुट्टीच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांना घेऊन एका निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा त्याला काही क्षणासाठी निवांत ठिकाणी आल्याचा क्षण अनुभवता येतो. रोजच्या धावपळीच्या जीवणापेक्षा तो सुट्टीमध्ये निवांत क्षण ठिकाण शोधत असतो. मात्र गावाकडची मंडळी रोजच निवांतक्षण अनुभवत असतात. हीच तर खरी किमया आहे.गावाकडच्या लोकांच्या दिर्घआयुष्याची..

शाश्वत शेती

गावाकडून लोकं रोजगारनिमित्ताने शहरात आले. कोरोना संकट जेव्हा आले. तेव्हा पुन्हा लोकांनी आपल्या गावाकडची वाट धरली. शहरातली नोकरी काही शाश्वत नाही. नोकरी कायमस्वरूपी हमी नाही. सगळं कंत्राकीकरण झालं आहे. आणि मग एक दिवस लोकांना कोरोना संकटात गावाकडची शेती आठवू लागली. 

शेती ही शाश्वत आहे. कायमस्वरूपी धन देणारी माती, म्हणजे माझी खेड्यातली माती. कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या गावाकडची लोकं शाश्वत शेती करत आहे. शाश्वत शेती मुळे पर्यावरणीय संतुलन राखण्यात मदत होते. त्यासोबतच या शेतीत पिकलेलं अन्न म्हणजे नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले जे आरोग्यासाठी उत्तम असते. सध्याच्या वर्तमान पिढीच्या गरजा भागवून पुन्हा नव्याने हंगाम निहाय नैसर्गिक पध्दतीने पुढच्या पिढीच्या देखील गरजा भागवणारी शाश्वत शेती ही खेड्यातच आहे.

>> माझी शाळा निबंध मराठी  My School Essay in Marathi

रोजगाराच्या नविन संधी

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन शोध लागत आहे. शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. एकीकडे मोठमोठ्या पदव्या घेऊन देखील युवक बेरोजगार झाले आहे. त्यातील काहीच शाश्वत शेती मध्ये करिअर करत आहे. काहीजण वडिलांचा वारसा जपत आहे. 

शेती ही युवकांसाठी आता रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. ती पूर्वी पासून होती. मात्र रोजगाराच्या स्पर्धेमुळे , वाढत्या शहरीकरण , कंत्राकी धोरण ,नोकरीची हमी नाही. अशा अवस्थेत युवक आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. करण्याचा विचार करत आहे. 

शेती सोबत जोडधंदा व्यवसाय देखील आधुनिक शेती पद्धतीमध्ये समोर येऊन नोकरी पेक्षा अधिक उत्पन्न देणारी शेती ही एक रोजगाराची नविन संधी उपलब्ध झाली आहे.  भारत हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो. फुल शेती , कुक्कुटपालन व्यवसाय , दुग्धव्यवसाय असे अनेक पर्याय पुढे आले आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकं आता शेतीकडे वळू लागले आहे.

सारांश

महात्मा गांधीजीनी दिलेली हाक 'चला खेड्याकडे' ही आता वास्तवात उतरताना दिसून येत आहे. गावकडची प्रेमळ आनंदी लोकजीवन , निवांतपण ,शाश्वत शेती पध्दती आणि रोजगाराच्या नविन संधी या सर्वांगाने विचार करता राष्ट्र विकासासाठी 'चला खेड्याकडे' असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

📌  26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण

छत्रपती शिवाजी महाराज निबंध

'कोरोना संकट' मराठी निबंध 

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा.

Previous Post Next Post