SCERT SWADHYAY स्वाध्याय २१ वा आठवडा I शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय ?

नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण स्वाध्याय उपक्रमाचा 21 वा आठवडा आणि शालेय शिक्षण विभागाने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय या संदर्भातली माहिती आपण आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत स्वाध्याय उपक्रम 21 वा आठवड्यामध्ये कोणत्या विषयांचा ? किती प्रश्नांचा ? समावेश असणार आहे. यासाठी आपण कशा पद्धतीने स्वाध्याय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या स्वयं अध्ययन करण्यासाठी स्वयंमूल्यमापन करण्यासाठी स्वाध्याय उपक्रमाचा वापर करू शकतो. याबद्दलची माहिती आपण आता सविस्तरपणे पाहूया.

SCERT SWADHYAY स्वाध्याय २१ वा आठवडा I शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय ?


scert swadhyay

सध्यस्थिती
कोव्हीड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भभलेली परिस्थिती लक्षात घेता. शालेय शिक्षण विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग सुरू होऊ शकले नाही. मधल्या काळामध्ये इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग सुरू करण्यात आले. त्यातही काही ठिकाणी कोरोना मुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकले नाही. आणि ज्या भागात शाळा सुरू झाल्या त्या भागातील विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षातील 25% कमी केलेला अभ्यासक्रम देखील पूर्ण होऊ शकलेला नाही. 

शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार इयत्ता १ ली ते ८ वी च्या वर्गातील मुलांचे वार्षिक मूल्यमापन करणे आवश्यक असते. मात्र या चालू शैक्षणिक वर्षात सध्याची कोरोना परिस्थिती पाहता , राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण वाढत आहे. त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना रुग्णामध्ये मुलांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आज इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आज शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इयत्ता ९ वी व ११ वीच्या संदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्याबाबत 
 मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी सोशल मीडिया वर शेयर केलेल्या व्हिडीओ द्वारे स्पष्ट केले आहे.

SCERT SWADHYAY स्वाध्याय २१ व आठवडा

शालेय शिक्षण विभागाने मुलांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी वर्षभरात वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण सुरू राहण्याबाबत उपाययोजना केल्या. त्यामध्ये सह्याद्री वाहिनी वरील टिलीमिली मालिका , इयत्ता 9 वी ते 12 वी च्या मुलांसाठी अभ्यास तासिका , Scert Youtube channel च्या माध्यमातून अभ्यास वर्ग , ऑनलाईन ऑफलाईन स्वाध्याय उपक्रम , इयत्ता १ ली ते १० वी च्या मुलांसाठी SCERT SWADHYAY म्हणजेच Whatsapp स्वाध्याय उपक्रम , सध्या 21 वा आठवडा सुरू असून , 20 व्या आठवड्यामध्ये
3871012 विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. आज घेतलेल्या शालेय शिक्षण विभागाने निर्णय बाबत  इयत्ता १ ली ते ८ वीच्या मुलांनी SCERT SWADHYAY उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वयं मूल्यमापनासाठी या संधीचा लाभ घ्यावा.
या आठवड्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी च्या वर्गातील प्रत्येक विषयाचे 7 प्रश्न आणि इयत्ता सहावी ते दहावी प्रत्येक विषयाचे 10 प्रश्न असणार आहेत.
इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग सुरू झालेले नाही. त्यातल्या त्यात इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग काही दिवस सुरू होते. परंतु वाढत्या प्रादुर्भावामुळे आत्ताच शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या वर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांचे वार्षिक मूल्यमापन होणार नाही. त्यामुळे या 'स्वाध्याय' उपक्रमाचा मुलांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन प्रत्यक्ष ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा या उपक्रमातील प्रश्नांचा संच विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून काढायचा आहे. आणि स्वयंमूल्यमापन करून घेण्यासाठी याची मदत घ्यायची आहे. त्यासोबतच आपल्या घरातील आपले भावंड पालक यांची आपण मदत घेऊ शकतो.
स्वाध्याय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी कसा सहभाग घ्यायचा? स्वाध्याय उपक्रमांमध्ये इयत्ता , माध्यम किंवा दुसरा विद्यार्थी कसा जोडायचा याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच्या पोस्टमध्ये घेतलेली आहे. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी SCERT SWADHYAY येथे क्लिक करा.
स्वाध्याय सुरू करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट सध्या सुरू करू शकता.
Whatsapp SCERT SWADHYAY सुरू करा.
आपल्या शाळेचा , तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा रिपोर्ट कसा पहावा? यासाठी यापूर्वी ची पोस्ट मध्ये यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. अधिक वाचा..
स्वाध्याय उपक्रम मधील प्रश्न सोडवताना प्रश्न चुकले असतील तर शेवटी आपल्याला दीक्षा ॲप वरील व्हिडीओ ची लिंक उपलब्ध होते त्यामध्ये
विषयावरील आपली समज सुधारण्यासाठी व्हिडिओ पाहून संकल्पना स्पष्ट करू शकतो.
DIKSHA App डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करून सर्च बॉक्स मध्ये दीक्षा ॲप कसे सर्च करावे या ठिकाणाहून दीक्षा ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे.

अशा पद्धतीने आपण स्वाध्याय उपक्रमातील 21वा आठवड्यामध्ये मिळालेल्या संधीचा अधिकाधिक उपयोग करून आपल्या स्वयम् मूल्यमापनासाठी स्वयं अध्ययनासाठी आपण या उपक्रमांमध्ये सहभागी होऊया आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करूया धन्यवाद !

Previous Post Next Post