UDISE Plus म्हणजे काय ? देशातील व राज्यातील UDISE क्रमांक असणारी पहिली शाळा

UDISE Plus म्हणजे काय ? देशातील व राज्यातील UDISE क्रमांक असणारी पहिली शाळा 

udise plus
प्रस्तावना

Unified District Information System for Education (U-DISE Plus), जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकारमार्फत ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील इयत्ता 1ली ते 12 वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या (C,B.S.E.. I.C.S.E.. I.B., IGCSE, State Board, other इत्यादी), अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम केलेली माहिती जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, (mpsp) मुंबई कार्यालयास सादर करण्यात येते. 

विविध योजना राबविताना शासनाकडून अनुदान वाटप करण्यात येते. या योजना राबवणे अनुदान वाटप करणे. याचे नियोजन व्यवस्थित करता यावे यासाठी शाळांची सविस्तर माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी यासाठी 'यु-डायस प्लस' प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

चालू शैक्षणिक वर्षामध्ये सन 2018-19 या वर्षापासून राज्यातील सर्व शाळांची माहिती www.udiseplus.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करून अंतिम झालेली माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामार्फत प्रमाणीत करून राज्याची माहिती भारत सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. अंतिम झालेल्या यू-डायस प्लस माहितीनुसार भारत सरकारकडून PGI निर्देशांक व निती आयोगाकडून SEOI निर्देशांक निश्चित करण्यात येणार आहे.

 उद्दिष्ट

 • राज्यामधील सर्व शाळांच्या माहितीचा उपयोग शाळा तपशील, विद्यार्थी संख्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, शाळा अनुदान, भौतिक व मूलभूत सुविधा, व्यवसायिक शिक्षण इत्यादी शाळांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व समग्न शिक्षा या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता अत्यंत महत्त्वाची आहे.
 • बालकांचा मोफत व सक्तींचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम -2009 अधिनियमाची अंमलबजावणी करण्याकरीता अत्यंत महत्त्वाची आहे.

देशातील कोणत्याही शाळेचा यु-डायस मधील माहिती किंवा स्कूल रिपोर्ट कार्ड यु-डायस पोर्टल वर पाहता येतो. संपूर्ण देशात कोणत्याही शासन मान्यताप्राप्त शाळेला यु-डायस असतो. मग ती शाळा कोणत्याही प्रकारचे असो, कोणत्याही व्यवस्थापनाची, माध्यमाची असो किंवा खाजगी मान्यताप्राप्त शाळांना फॉर्म भरायचा असतो.

school udise code

 • यु-डायस हा ११ अंकी असतो.  
 • यु-डायस मधील ११ अंकाचे पाच भाग पडतात. 
 • देशातील कोणत्याही शाळेचा यु-डायस हा ११ अंकीच असतो.
 • उदा. 27,35,35,540,83 हा ११ अंकी udise code मध्ये ५ भाग पडतात.
 • पहिले २ अंक हे जिल्ह्यासाठी म्हणजे जिल्हा दर्शवतात.
 • आता यातील पहिला 27 अंक या अंकाकडे पहिले की लगेच ही शाळा महाराष्ट्र राज्याची आहे हे लक्षात येते. 01 हा नंबर जम्मू-काश्मीर या राज्याचा असून , 36 हा नंबर तेलंगणा या राज्याचा आहे. म्हणजे 01 ते 36 नंबर आपल्या देशात राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना देण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 27 हा नंबर आपल्या महाराष्ट्राचा आहे.
 • त्यानंतर येतो 36 - 36 हा अंक जिल्ह्याचा क्रमांक दर्शवतो. राज्यात 01 ते 36 क्रमांक जिल्ह्यांना देण्यात आले आहेत 1 नंबर नंदुरबार जिल्ह्याचा असून 35 नंबर सांगली जिल्ह्याचा आहेत.
 • त्यानंतरचे दोन अंक हे तालुका दर्शवतात.
 • त्यानंतरचे ३ अंक गाव ,वार्ड दर्शवतात.
 • आणि शेवटचे २ अंक शाळा दर्शवतात. एकाच गावात एक पेक्षा जास्त शाळा असू शकतात. तेव्हा ०१ ते ९९ पर्यंतचे अंक दिले जावू शकतात. 
देशातील यु-डायस क्रमांकाची पहिली शाळा

01010100101 हा यु-डायस नंबर भारत देशातील जम्मू-काश्मीर या राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील चामकोटे तालुक्यातील टीतवाल या केंद्रातील BHSS TEETVWAL या शाळेचा आहे. ही देशातील पहिली यु डायस क्रमांक असणारी शाळा आहे असे आपण म्हणू म्हणू शकतो.  

देशातील यु-डायस क्रमांकाची शेवटची शाळा

 36104602307 हा यु-डायस क्रमांक आपल्या देशातील शेवटचा यु-डायस असून, तो तेलंगणा राज्यातील खम्मम या जिल्ह्यातील येरूपेलम तालुक्यातील व केंद्रातील REMIDICHERLA या गावातील MPPS रामपूरम या शाळेचा आहे. 

महाराष्ट्र राज्यातील यु-डायस क्रमांक असणारी पहिली शाळा

27010100101 महाराष्ट्र राज्यातील हा यु-डायस क्रमांक असणारी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील धानोरा या गावातील जिल्हा प्राथमिक शाळा धानोरा या शाळेचा हा क्रमांक आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पहिला यु-डायस क्रमांक असणारी शाळा धानोरा आहे. असे म्हणू शकतो.

शाळेचा School UDISE Number शोधण्यासाठी येथे क्लिक करा. 

UDISE फॉर्म मध्ये कोणती माहिती भरायची असते?

UDISE म्हणजेच शाळा माहिती संकलन प्रपत्र यामध्ये एकूण ११ विभाग असून त्यामध्ये खालील विषयांची माहिती भरावी लागते. 

विभाग-1 शाळा तपशील ( भौगोलिक ठिकाण मुलभूत माहिती, व्यवस्थापन आणि माध्यम)

विभाग -2 शालेय इमारत/ शैक्षणिक साधने / सुविधा / फर्निचर

विभाग - 3 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती

विभाग-4 नवीन प्रवेश, विद्यार्थी आणि पुर्न: प्रवेश

विभाग-5 विद्यार्थ्यांनामोफत पुरवठा करण्यात आलेल्या बाबींचा तपशील

विभाग - 6 मागील शैक्षणिक वर्षातील प्राथमिक स्तरावरील वार्षिक परिक्षेचा निकाल

विभाग-7 मागील शैक्षणिक वर्षातील शाळेचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निकाल

विभाग-8 शाळेला मिळालेल्या अनुदानाचा तपशील (पावती व खर्च)

विभाग - 9 व्यावसायिक शिक्षण देत असलेल्या शाळांकरीता आवश्यक

विभाग - 10 Performance Grading Index (PGI) Indicators

(फक्त शासकीय व शासन अनुदानित शाळांकरिता)

विभाग - 11 School Safety (शाळा सुरक्षितेची माहिती) 

अशा पद्धतीने आपण दरवर्षी UDISE प्रपत्र मध्ये वरील विषयांची भरत असतो. 'Udise Plus'  पोर्टल वर शाळा लॉगीन करून प्रत्येक विभाग निहाय माहिती आपण अपडेट केली आहे. यु-डायस प्रपत्रामध्ये 30 सप्टेंबर पर्यंतची  माहिती संकलित करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यु-डायस प्रपत्र भरण्यास विलंब झाला आहे. भारत सरकारच्या  समग्र शिक्षा अभियानाचे वार्षिक नियोजन व अंदाज पत्रक तयार करण्याकरिता यु-डायस  प्रणाली मधील माहितीचा वापर करण्यात येतो. शाळेची संपूर्ण माहिती या UDISE PLUS प्रणाली वर अपडेट केली. जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत योजनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यास याची मदत होत असते.

यु-डायस मध्ये  अशी भरा दिव्यांग cwsn  मुलांची अचूक माहिती


Previous Post Next Post