स्वाध्याय उपक्रम आठवडा २० वा SCERT SWADHYAY (Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana)

स्वाध्याय उपक्रम आठवडा २० वा SCERT SWADHYAY (Student WhatsApp based Digital Home Assessment) Yojana

नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याविषयी आपण स्वाध्याय  SCERT आयोजित SWADHYAY उपक्रमाविषयी माहिती घेणार आहोत. 

SCERT SWADHYAY

SCERT SWADHYAY 2021

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षाभरापासून काही महिने शाळा बंद होत्या. नंतर इयत्ता ५ वीच्या पुढील वर्ग शाळा सुरु झाल्या. COVID 19 च्या काळात विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया होऊ शकली नाही. विद्यार्थी घरीच ONLINE STUDY , CLASS, सह्याद्री वाहिनी वरील टिलीमिली मालिका , YOUTUBE CHANNEL च्या माध्यमातून ONLINE-OFFLINE शिक्षण सुरु ठेवले. या दरम्यान शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. 

सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcement

त्यातीलच एक उपक्रम म्हणजे स्वाध्याय आज जवळपास प्रत्येक घराघरात स्मार्टफोन आलेत. त्यातही प्रत्येकजण WHATS APP वर आहे. याचा अभ्यासाच्या दृष्टीने प्रभावी वापर करण्यासाठी SCERT मार्फत Conve Genius यांच्या सहकार्याने शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 1 ली ते इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय SWADHYAY ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana). या उपक्रमाची सुरुवात  दि. 03 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या उपस्थित स्वाध्याय उपक्रमाचे सादरीकण करण्यात आले.

पुढे जाण्याआधी स्वाध्याय हा उपक्रम डिजीटल स्वरूपाचा असल्यामुळे त्यामध्ये वेळोवेळी थोडेफार बदल होऊ शकतील. त्यानुसार आपण आपल्या शाळेतील शिक्षकांशी संपर्कात राहावे. गुरुजनांनी नवीन बदल आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत.

१. स्वाध्याय SWADHYAY उपक्रमात सहभागी होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे?

  • स्वाध्याय उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १ ली ते १० वीत शिकणाऱ्या सर्व माध्यमांच्या कोणताही विद्यार्थी सहभागी होऊ शकतो.
  • यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे Android Smartphone  आणि त्यामध्ये Whats App रजिस्टर म्हणजे सुरु असणे आवश्यक आहे.
  • स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेण्यासाठी शाळेचा UDISE नंबर असणे आवश्यक आहे.
  • UDISE नंबर आपल्या शाळेतील शिक्षकांकडून तो प्राप्त करून घ्यावा.

२. स्वाध्याय SWADHYAY कसे काम करते?

  • SWADHYAY हे ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana). आहे. 
  • स्वाध्याय हे Auto Chat प्रमाणे काम करते. 
  • यासाठी 85955 24519 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये scert swadhyay या नावाने सेव्ह करायचा आहे.
  • त्यानंतर नोंदणी करता येते. त्यासाठी नमस्ते किंवा hello type करून आपण स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेवू शकतो.
  • नोंदणी केल्यानंतर प्रत्येक आठवड्याला विषयनिहाय १० किंवा ७ प्रश्न सरावासाठी असतात.
  • प्रश्नांचा सराव झाल्यनंतर ans key मिळते. 
  • आपला निकाल लगेच आपल्याला पाहता येतो.
  • ज्या विषयातील घटकांचे आपले प्रश्न चुकले असतील त्यासंबंधी दिक्षा DIKSHA APP वरील व्हिडिओ लिंक पाठवली जाते. त्याद्वारे आपण आपली संकल्पना स्पष्ट होण्यास मदत मिळते.
  • एका whats app मधून १०० विद्यार्थी नोंदणी करून सराव करू शकतील.

३. स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?

  • 85955 24519 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये scert swadhyay या नावाने सेव्ह  करा.
  • आपल्या शाळेचा UDISE नंबर जवळ ठेवा. (शाळेतून UDISE नंबर घ्या)
  • Scert Swadhyay  या नावाने सेव्ह केलेल्या नंबर ला whats app मध्ये सर्च करून नमस्ते किंवा hello असे type करून मेसेज पाठवा. ( whats app मध्ये नंबर दिसत नसेल तर contact लिस्ट रिफ्रेश करून घ्या.)
  • thank yor joining असा मेसेज येईल तो संपूर्ण वाचा आणि आपले माध्यम निवडा. ( उत्तरे देताना अंकात द्यायचे आहे. उदा. १,२,३,४... याप्रमाणे)
  • अटी शर्ती मान्य करा.
  • त्यानंतर जिल्हा निवडून  इयत्ता निवडा. आणि  विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा.
  • UDISE नंबर टाकून आपल्या शाळेचे संपूर्ण DETAILS येतील त्याची खात्री करून घ्या.
  • अशा पद्धतीने आपली नोंदणी आता यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आपण सराव सुरु करा.

४. इयत्ता , माध्यम आणि दुसरा विद्यार्थी कसा जोडावा ?

  • इयत्ता , माध्यम आणि दुसरा विद्यार्थी जोडण्यासाठी किंवा बदल्याण्यासाठी  नमस्कार TYPE करून पुन्हा मेजेस पाठवा.
  • अगोदरचे काही प्रश्न सोडवायचे राहून गेले असतील तर ते पूर्ण सोडवणे आवश्यक आहे.

दुसरा विद्यार्थी कसा जोडावा ?

  • नमस्कार किंवा HELLO TYPE केल्यावर परत स्वागत आहे 🙏 असा मेजेस येईल .
  • तुम्ही तुमचा स्वाध्याय पूर्ण केला आहे. जर तुम्ही इतर विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी केले असेल तर किंवा तुम्हाला माध्यम बदलायचे असेल तर hello किंवा नमस्कार मेसेज पाठवा. 🙏🏻
  • त्यानंतर आपल्यासमोर स्वाध्याय सुरू करण्यासाठी, कृपया एक विद्यार्थी निवडा. खाली दिलेला पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा.
  • याठिकाणी आपण ज्या क्रमांका समोर दुसरा विद्यार्थी जोडा असे लिहले असेल. तो निवडा.
  • पुन्हा दुसरया विद्यार्थ्याचे पूर्ण नाव,इयत्ता व UDISE क्रमांक टाकून नोंदणी करा. 

इयत्ता कसे बदल करावे ?

  • नमस्कार किंवा HELLO TYPE करून मेसेज पाठवा. परत स्वागत आहे 🙏 असा मेजेस येईल .
  • इयत्ता बदल करण्यासाठी आपल्याला दुसरा विद्यार्थी जोडा हा पर्याय निवडून इयत्ता निवडावी लागेल.त्यासाठी वरील स्टेप पूर्ण करा. आणि इयत्ता बदल करून घ्या.
  • आपण एका Whats app नंबर वरून १ ली ते १० वी पर्यंत कितीही इयत्ता निवडू शकता.
  • आपण ज्संया वेळी सराव सुरु कराल तेव्हा लिस्ट आपल्यासमोर दिसेल.

माध्यम कसे बदल करावे ?

टिप- इयत्ता , माध्यम , दुसरा विद्यार्थी नोंदणी किंवा पुन्हा सराव सुरु करण्यासाठी Hello किंवा नमस्कार type करूनच संबधित बदल अथवा सराव करता येईल.

  •  नमस्कार किंवा HELLO TYPE करून मेसेज पाठवा. परत स्वागत आहे 🙏 असा मेजेस येईल .

  • स्वाध्याय सुरू करण्यासाठी, कृपया एक विद्यार्थी निवडा. खाली दिलेला पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा.
  • शिक्षणाचे माध्यम बदला हा पर्याय निवडून आपण माध्यम बदल करून पुन्हा त्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता निवडून नोंदणी करू शकता.

अशा पद्धतीने आपण SCERT SWADHYAY उपक्रमात नोंदणी , इयत्ता बदल , माध्यम किंवा दुसरा विद्यार्थी नोंदणी अगदी सहजरीत्या करून जास्तीत जास्त सराव करून घेवू शकता. आता आपण आपल्या शाळा , तालुका किंवा जिल्ह्यातील किती मुलांनी सहभाग घेतला हे कसे ? कोठे? शोधायचे ते पाहूया.

SCERT SWADHYAY उपक्रमातील वर्ग , शाळा , तालुका , जिल्ह्यामध्ये किती? विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला? 

HOW TO CHECK SCERT SWADHYAY REPORT

  • SWADHYAY उपक्रमाचा आपण माध्यम , शाळा , वर्ग , तालुका किंवा जिल्हा नुसार रिपोर्ट पाहू शकता.
  • स्वाध्याय उपक्रमाचा २० वा आठवडा सुरु असून या आठवड्यात आतापर्यंत १५ लाख ७३ हजार आठशे ५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अजून ५ दिवस शिल्लिक आहे. आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून या संधीचा लाभ घेवूया.
  • त्याठिकाणी आपल्याला DISTRICT ,GRADE ,MEDIUM आणि WEEK असे बॉक्स दिसेल आपल्याला जसा रिपोर्ट पहायचा आहे. त्याप्रमाणे फिल्टर करून जिल्हा निहाय रिपोर्ट पहावा.
जिल्हा निहाय SCERT SWADHYAY रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


वर्गनिहाय , शाळा व तालुका  निहाय SCERT SWADHYAY रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 







EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.


Previous Post Next Post