वेळेचे नियोजन , दैनिक अभ्यासाचे नियोजन व स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र | Time Mangement and Study Time table for students

वेळेचे नियोजन , दैनिक अभ्यासाचे नियोजन व स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र  Time Mangement and Study Time table for students

  भाग - ३

तंत्र अभ्यासाचे , रहस्य यशाचे या लेखमाला मध्ये आज आपण वेळेचे नियोजन time mangement दैनिक अभ्यासाचे नियोजन तंत्र study routine time table आणि स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र याबाबत माहिती घेणार आहोत. 

time mangement

१. वेळेच्या नियोजनाचे तंत्र / Time Mangement 🕓

परीक्षा असो अथवा नसो पण वेळेचे सूक्ष्म नियोजन करायलाच हवे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन असणे खूप गरजेचे आहे. वेळ ही कोणासाठी थांबत नाही. असं म्हणतात time is money हे खरेच आहे. प्रत्येक क्षेत्रात वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे झाले आहे. वेळ कोणासाठी किती? कोणाला वेळच वेळ आहे. तर कोणासाठी १ सेकंद पण वेळ नाही. कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा? आपण सध्या कशासाठी वेळ देत आहोत हे उद्याचे भविष्य घडणार यात शंका वाटत नाही. 

१० वी १२ वी च्या परीक्षा असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षा साठी यशस्वी होण्यासाठी वेळेचे सूक्ष्म नियोजन करून अभ्यास केला तर अभ्यासाचे ओझे वाटत नाही. प्रत्येक गोष्टीची वेळेत करण्याची सवय लावून घेतली कि मग ती अंगवळणी पडायला हवी . म्हणजे मग आयुष्यातील कोणतीही परीक्षा असो आपण यशस्वी झालाच म्हणून समजा. त्यासाठी गरज आहे वेळेच्या नियोजनाची. कारण एकदा वेळ गेली की परत ती कधीच येत नाही. 

जीवनात यशस्वी व्हायचेच असेल तर वेळेचे नियोजन करण्याचे तंत्र अवगत करावेच लागेल ..

🕓 प्रथम दैनिक कामकाज नियोजन वेळापत्रक तयार करा .

🕔 परीक्षा किती दिवसावर आहे? आपली तयारी किती आहे ? अजून किती तयारी करावी लागेल ? याचा विचार करून अभ्यास , वाचन , लेखन , सराव, मनन , चिंतन यासाठी किती वेळ द्यायचा ? विश्रांती , जेवण, व्यायाम , प्राणायाम यास किती वेळ द्यायचा ? याचे सूक्ष्म नियोजन करा.

🕔 टीव्ही पहाणे , मोबाईलवर गेम खेळणे किंवा नको त्या कामात वेळ जात असेल तर तर तो़ जाऊ नये त्यासाठी काय करावे ? हे ठरवूनच वेळेचे नियोजन करावे .

🕕 शक्यतो आपले दैनिक कामकाज नियोजन तयार करून भिंतीवर चिकटावे .

🕖 त्यानुसार काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करावी .

🕗 अनावश्यक वेळ खर्च करू नये अशी मानसिकता तयार करा .

🕘  झोपण्यापूर्वी आज दिवसभर किती तास अभ्यास केला त्याची नोंद ठेवा .

🕙 प्रत्येक सेकंदाचा विचार करून कामाला लागा बघा परीक्षेत पाहिलेच येता का नाही ...

🕙 कठीण वाटणाऱ्या विषयांसाठी अधिक वेळ देवून सराव करा.

🕙 लेखनाचा दररोज सराव करा.

🕙  निबंध लेखनाचा , पत्र लेखन किंवा दीर्घोत्तरी प्रश्न सोडवण्याचा सराव करण्यासाठी वेळेचे योग्य           नियोजन करा.

केलेल्या नियोजनानुसार नित्यनियमाने वेळेचे पालन करून आवश्यक तेव्हा बदल करून अभ्यासात सातत्य ठेवा. यशस्वी झालाच म्हणून समजा. 

धन्यवाद ! ! !

२. दैनिक अभ्यास  नियोजन तंत्र  Study Routine Time table

प्रत्येक कृती नियोजन करून केल्यामुळे  आपण आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहचू शकतो. त्यासाठी आपल्याला दैनिक अभ्यासाचे तंत्र समजून घ्यावे लागेल. दररोज काय करायचे? कोणत्या विषयांचा अभ्यास किती करायचा? परीक्षेची तयारी किती झाली? सकाळी कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा? दुपारी किंवा सायंकाळी , रात्री कोणत्या विषयाचा अभ्यास ? लेखनाचा सराव कधी? प्रश्नपत्रिका कधी सोडवायच्या या सारख्या बारीकसारीक गोष्टींचे नियोजन केल्यास मनावरचा ताण कमी होतो. आणि मग आनंदाने आपण अभ्यास करून यशस्वी होऊ हा विश्वास निर्माण होतो. यासाठी दैनिक अभ्यासाचे नियोजन करताना खालील गोष्टींचा आधार घ्यावा.  
 
  • परीक्षेला किती दिवस शिल्लक आहेत? आणि आपण दररोज किती तास अभ्यास करू शकतो? याचे नियोजन करा.
  • एकूण शिल्लक दिवस आणि त्यामध्ये मिळणारे एकूण घड्याळी तास किती? याचा शोध घ्या.
  • त्यामध्ये विश्रांती , जेवण , मित्र मैत्रिणी गप्पा , online offline classes , कॉलेज , इतर महत्वाची कामे या सर्वांचे तास एकत्रित करून अभ्यासासाठी किती तास मिळतात. त्यानुसार नियोजन करून अभ्यासाला लागा.
  • अनावश्यक जाणारा वेळ थांबवा . आणि त्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवशी पर्यंत एक अभ्यास वेळापत्रक तयार करा .
  • अवघड वाटणाऱ्या विषयांना जास्त वेळ द्या . लेखन सराव, मनन , चिंतन याची वेळ ठरवून घ्या.
  • दैनिक कामकाजात नियोजित वेळेपेक्षा इतर कामात जास्त वेळ जात असेल तर तो कमी करा .
  • लवचिक असे अभ्यासाचे Time table तयार करा आणि त्याची अंमलबजावणी करा .
  • अभ्यास वेळापत्रक तयार करून येथून पुढे प्रत्येक क्षण महत्वाचा म्हणून अभ्यास करा . बघा तुम्ही पहिलेच येता की नाही !

३. स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र

कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना परीक्षेत उत्तरे लिहण्यासाठी केलेला अभ्यास आठवणे . तो किती प्रमाणात आठवतो. काहीना तर अभ्यास तर खूप केलेला असतो मात्र ऐन परीक्षेच्या hall मध्ये विस्मरण झाल्यासारखं वाटत. त्या अनुषंगाने इथे आपणास हे तंत्र समजावून घेणार आहोत. 

स्मरणशक्ती अथवा बुद्धिमत्ता ही काही अनुवंशिक नसते तर ती प्रयत्न साध्य आहे .त्यासाठी प्रयत्न करा. आणि आजमवा आपल्या बुद्धीची ताकद ...

🔷 प्रथम लक्षात का रहात नाही. या कारणांचा शोध घेणे . ( उदा. विषय कठीण वाटतो म्हणून, आकलन व्यवस्थित होत नाही. , सराव होत नाही. इ.)

🔷 सर्व कारणे या आपल्या त्रुटी असल्याने त्या एका कागदावर लिहिणे .

🔷 उदाहरणार्थ वर्गात निट ऐकून घेत नाही . ही त्रुटी घ्या . हे विधान कागदावर लिहा . त्या विधानाच्या पुढे उपचारात्मक विधान लिहा. उदाहरणार्थ   वर्गात निट ऐकायचे. असे लिहा. आता निट ऐकायचे म्हणजे  काय करायचे तेही लिहून ठेवा , जसे...

➡ वर्गात पुढे बसायचे .
➡ ताठ बसून सरांच्या बोलण्यावर लक्ष केंद्रीत करणे .
➡ मनात कसलाही विचार आणायचा नाही.
➡ संभ्रमात रहायचे नाही. ( शंका असेल तर लगेच निरासरन करून घ्यायचे) 
➡ भूतकाळात जायचे नाही .
➡   वर्तमान काळातील सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रीत करायचे .

आणि यावर कार्यवाही करा . जसे - प्रत्येक तासाचे सरांचे मार्गदर्शन घरी गेल्या वर  जसेच्या तसे लिहिणे , सर्व आठवणे , सांकेतिक भाषा लेखनाचा सराव करणे , अवघड घटक एखाद्या प्रसंगाशी जोडणे .. इत्यादी 
स्मरणशक्ती विकसनाचे हे साधे तंत्र आहे .केवळ वर्गातच नव्हे तर कोठेही या तंत्राचा वापर करून आपली बुद्धिमत्ता सिध्द करू शकता.

सारांश
 तंत्र अभ्यासाचे , रहस्य यशाचे  या लेख मालिकेतील भाग तीन मध्ये आज आपण वेळेचे नियोजन time mangement दैनिक अभ्यासाचे नियोजन तंत्र study routine time table आणि स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र या विषयीची माहिती घेतली . नियोजन कशाचेही असो. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळ फार महत्वाची असते. वेळेचे जर आपण सदुपयोग केला तर आयुष्यात पछाताप करण्याची वेळच येणार नाही. याउलट प्रत्येक काम आपण वेळेत करण्याची सवय लावून घेतली तर नक्कीच एक आनंदी जीवन आपल्याला जगता येईल. तर मित्रांनो चला वेळेचे योग्य नियोजन करून लागा अभ्यासाला राहिलेला अभ्यास पूर्ण करा. आपण यशस्वी 🥇 झालाच म्हणून समजा..

शुभेछ्या!

( पुढील भागात वाचा फ्लॅश नोटस्  काढण्याचे  तंत्र , परीक्षेत पहिलेच येण्याचे तंत्र , मुलांच्या अभ्यास विषयक  समस्या आणि त्याचे निवारण )

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post