अभ्यासाचे स्मरण , मनन , चिंतन आणि स्वसंमोहन तंत्र Exam Preparation Tips

अभ्यासाचे स्मरण , मनन , चिंतन आणि स्वसंमोहन तंत्र Exam Preparation Tips

नमस्कार मित्रांनो तंत्र अभ्यासाचे, रहस्य यशाचे या लेखमालेतील मागील दोन भागामध्ये आपण भाग-१  परीक्षेपुर्वीची मानसिक तयारीआणि परीक्षा मुलांची आणि काळजी पालकांची. व भाग-२  तंत्र अभ्यासाचे वाचन व त्राटक तंत्र Best way to read books याविषयी माहिती घेतली. आजच्या भाग ३ मध्ये आपण स्मरण तंत्र मनन व चिंतन तंत्र आणि स्वसंमोहन तंत्र याविषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांना कोणत्याही परीक्षेमध्ये exam preparation tips मिळाव्यात जेणेकरून परीक्षेत यश संपादन करण्यास मदत होईल. सध्या एप्रिल-मे महिन्यामध्ये 10th & 12th board exam परीक्षा आहे. त्यासोबतच इतर सर्व  स्पर्धा परीक्षांचा  अभ्यास करण्यासाठी exam tips मदत करत असतात. चला तर आजचा ब्लॉग सुरु करूया.

exam study tips

भाग-३

स्मरण तंत्र 

आपल्या परीक्षा पद्धती या स्मरणावरच आधारित असल्याने सारेजण स्मरणाला महत्व देतो . ज्याचे स्मरण चांगले तोच परीक्षेत पहिला येतो असे आज समिकरण झाले आहे . त्यामुळे त्यांचे स्मरण चांगले नसते असे विद्यार्थी नाउमेद होतात. 

घरापासून शाळेपर्यंत सर्वजण त्यास ढ म्हणून  संबोधतात. मी याच संवर्गातील असलेने वर्गात माझ्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. पण पुढे मला असे समजले की , अरे स्मरणशक्ती ही काही अनुवंशिक नसते, कोणाची मक्तेदारी नाही, घराणेशाही नाही तर ती परिस्थिती साध्य आहे. आणि मग मी झपाटल्या सारखा कामाला लागलो आणि स्मरणशक्तीचा विकास करू शकलो. त्यायोगे आजही मला असंख्य गोष्टी , रंग - रूप, वस्तू , संख्या किंवा काहीही अचूक स्मरणात रहाते. 

स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी आवश्यक टिप्स खालीलप्रमाणे
  • स्मरणशक्ती ही एकाग्रतेवर  अवलंबून असते .एकाग्र चित्ताने ऐका ,वाचा ,पहा आणि अनुभवा .  १०० % स्मरणात राहिले म्हणून  समजा . त्यासाठी रोज सकाळी १० मिनिटे  त्राटक  करा . जे वाचतो , ऐकतो , पहातो किंवा अनुभवतो ते जाणीवपूर्वक करा ते मेंदूत १०० % रेकॉर्ड होते .
  • दररोज आपल्या शरीराला लागेल तेवढे पाणी घोटाघोटाने प्या. (तहान लागेल तेव्हा पाणी प्या.)
  • परीक्षेच्या आगोदर किमान पंधरा दिवस जड अन्न खावू नका . प्रोटीन व फायबर युक्त पदार्थ खा .
  • एकाग्रता करताना सुरवातीला डोके दुखल्यास कच्चा पेरू उगाळून कपाळाला लावा कायमची डोकेदुखी थांबेल .
  • एक पान वाचल्यावर डोळे बंद करून ते पान आहे तसं आठवायचं त्यासाठी थोडा वेळ  मनन आणि चिंतन  करा .
  • प्रत्येक विषयांचे मेंदूत कप्पे  तयार करा . त्यानुसार विषय त्यात मांडत जा. असे केल्याने आवश्यकते नुसार ते स्मरणात येतात .
  • पाठय पुस्तकातील कोणताही घटक आपल्या भाव भावनांशी  जोडून आकलन करून घ्या म्हणजे तो जन्मभर लक्षात राहातो .
  • संतुलित आहार घ्या. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
  • जेवताना अर्धेपोट भरपेट खा. एक पाव कप्पा पाणी प्या. आणि एक पाव कप्पा पोट रिकामे ठेवा. (सुस्ती येणार नाही)
  • हळद घालून रात्री झोपताना दूध प्या .
  • दररोज किमान ७ ते ८ तास शांत झोपा .
  • नियमितपणे किमान ३० मिनिटे व्यायाम, योगा , सूर्यनमस्कार घाला.
  • परीक्षेच्या काळात टिव्ही, मोबाईल पासून दूर रहा.
  • अभ्यास झाल्यानंतर किमान ५ ते १० मिनिटे केलेला अभ्यास आठवा. 
  • प्रश्न तयार करून त्यावर आपले मत विचार विकसित करण्याचा सराव करा.
वर सांगितलेली सर्व तंत्रे वापरून मनन, चिंतन , मंथन करायला शिकलात तर तुमची स्मरणशक्ती १०० % विकसित होईल. यात तिळमात्र शंका नाही. आणि विशेष म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढली तर जास्त अभ्यास करण्याची सुध्दा गरज भासणार  नाही. ही स्मरणशक्ती अधिक प्रभावी करण्यासाठी वाचन तंत्र शिकायला हवे. यापूर्वीच्या तंत्र अभ्यासाचे , रहस्य यशाचे या लेखमालेतील विद्यार्थ्यांसाठी 
exam preparation tips मध्ये भाग २ मध्ये तंत्र अभ्यासाचे वाचन व त्राटक तंत्र Best way to read books या ब्लॉग मध्ये आपण वाचन तंत्र ब्लॉग वाचू शकता.

 मनन व चिंतन तंत्र

खरं तर कोणतीच परीक्षा ही अवघड नसते. तर अवघड असते ती आपली मानसिकता .आपण म्हणतो परीक्षा अवघड आहे तर ती खरंच अवघड होते. बुद्धांनी शांतीचा मार्ग सांगितला होता की, मन शांत करण्यासाठी ध्यान करा , ध्यानात स्वत:च्या आत  डोकावून पहा आणि आपल्या चुका शोधा , चुका दुरूस्त करण्यासाठी मनन करा , शांतीसाठी चिंतन करा. शाळेत देखील आता आनापान शिकवले जाते. खूप वेळा आपल्याला ध्यान करा असे सांगितले जाते. कोणताही अभ्यास करताना अभ्यासाचे मनन व चिंतन करणे आवश्यक असते. मनन व चिंतन तंत्र समजून घेण्यासाठी खालील कृती आपण व्यवस्थित समजून घेऊया.
  • दररोज रात्री झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे साध्या आसनात डोळे बंद करून शांत बसावे .
  • दिर्घ श्वास १० वेळा घ्यावा व उच्छवास १० वेळा सोडावा . ही क्रिया शांतपणे करा . श्वासावर लक्ष केंद्रित करा .
  • आता तुमच्या मनातील चलबिचलता कमी होईल . तेव्हा दिवसभर  अभ्यास विषयक जे वाचले असेल , श्रवण केले असेल , चर्चा केली असेल , पाहिले असेल ते ते क्रमवार विषय निहाय डोळ्यासमोर आणा .
  •  जे जे डोळ्यासमोर येईल ते ते तुमचे  मनन असेल. आपण त्याला हवं तर स्मरणही म्हणू शकता .
  • विषय निहाय त्यातील सार बाजूला करा आणि त्यावर फोकस करा . म्हणजे सर्व प्रमुख मुद्दे फोकस होतील . ही क्रिया म्हणजे  चिंतन होय .
  •  मननातून मिळालेली सर्व माहिती एकत्रित करून चिंतनात फक्त सार ठेवायचा . चिंतन ३ मिनिटेच करायचे . पण त्या ३ मिनिटात दिवसभरातील सर्व गोष्टींचा संकलनात्मक भाग येतो .
  • चिंतनातील प्रमुख मुद्दे २ वेळा मनातल्या मनात म्हणा . याला  दृढीकरण  म्हणतात . ते आजन्म लक्षात रहाते .
  • चिंतन झालेवर दिवसभरात माझ्या कडून काय चुकलं त्याचा क्षणभरात आढावा घ्यायचा याला आत्मचिंतन  म्हणतात . यामुळे आपली त्रुटी आपण सुधारू शकतो .
  • शेवटी ती त्रुटी सुधारणेसाठी मनाला काही सूचना दिल्या तर ते आत्ममंथन  होते .
  • रोज झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनीटे हे तंत्र वापरून पहा तुमची स्मरणशक्ती विकसित तर होईलच पण तुमच्या स्वयंविकासाला झपाटयाने सुरवात होईल . मग जीवनाची कोणतीही परीक्षा सहजपणे पाहिल्या क्रमांकातच  तुम्ही पास व्हाल .

स्वसंमोहन तंत्र

स्वसंमोहन ही ध्यानाची पुढची पायरी आहे. एखाद्यास चांगल्या प्रकारे ध्यानसाधना जमली तर सर्वसाधारण माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी ती निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते. योगाभ्यास किंवा ध्यान धारणेस सुयोग्य सकारात्मक स्वयंसुचनांची जोड दिल्यास स्वसंमोहन प्रभावी ठरू शकते.

अभ्यासात एकाग्रता गरजेची असते . एकाग्रता चांगली असेल तर स्मरण चांगले होते .ही एकाग्रता टिकविण्यासाठी सकारात्मक स्वयंसूचना देवून स्वतःच्या मनाला  प्राप्त परिस्थितीत काबूत ठेवण्याचे तंत्र म्हणजे  स्वसंमोहन तंत्र  होय.

सर्वप्रथम स्वसंमोहन तंत्राचे फायदे पाहू मग हे तंत्र अवगत करण्याच्या पायऱ्या पाहू ..
 

स्वसंमोहन तंत्राचे फायदे


🦋  हे तंत्र शिकविण्यासाठी कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नसते .सरावाने आपण ते सहज अवगत करू शकतो .
🦋  चंचल मनाला स्थिर करता येते .
🦋  अत्यंत कठीण घटकाचे आकलन होण्यास मदत होते .
🦋   मनात असणारी परीक्षेची भिती किंवा न्यूनगंड नाहीसा करता येतो .
🦋  स्वतःच्या शारीरीक अथवा मानसिक व्याधीवर या तंत्राने स्वतःलाच उपचार करता येतो .
🦋   या तंत्राच्या सहाय्याने हरवलेला आत्मविश्वास परत मिळविता येतो .

स्वसंमोहन तंत्र अवगत करण्याच्या पायऱ्या

  • सकाळी सूर्योदयापूर्वी ऊठून प्रातः विधी व मुखमार्जन आटोपून शवासनात छताकडे डोळे करून शांत पडून रहा.
  • डोळे हळूवारपणे बंद करा .
  • बंद डोळ्यांनी नाकाच्या अग्रभागी लक्ष केंद्रित करा .
  •  प्रथम मनाची चंचलता थांबविण्यासाठी शरीराला शिथिल करण्यासाठी पायाच्या तळव्यांपासून डोक्याच्या केसापर्यत सर्व अवयव शिथील करण्यासाठी स्वयंसूचना द्या.
  • जसे माझ्या पायाचे तळवे शिथील शिथिल होत चालले आहेत , हलके हलके झाले आहेत . रिलॅक्स झाले आहेत अशा शरीराच्या सर्व अवयवांना स्वयंसूचना द्या.
  • हळू हळू सर्व शरीर शिथील होईल . हलके होईल . यावेळी शरीराची कोणतीच हलचाल होणार नाही . जर झाली तर त्या भागाला पून्हा सूचना द्या .
  • आता तुम्हाला तुमची एकाग्रता , स्मरणशक्ती , श्रवण शक्ती विकसित करण्यासाठी किंवा मानसिक शारीरिक विकार दूर करण्यासाठी सकारात्मक स्वयंसूचना द्या .
  •  तुम्ही दिलेल्या स्वयंसूचना मेंदू ग्रहण करतो व तशी आज्ञा पाळतो.
  • या काळात तुम्ही झोपेच्या अधिन व्हाल तर किती वेळाने मला जाग येईल ते आगोदरच स्वयंसूचना देवून ठेवा .
  •  स्वयंसूचना नेहमी सकारात्मकच द्यायची असते हे लक्षात ठेवून रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी सराव करावा .
  •  प्रथम प्रथम हे जमले नाही तर नाराज होउ नका तर प्रयत्न करत रहा .
  • स्वसंमोहनाचे हे तंत्र अवगत करून केवळ परीक्षेची भीतीच नव्हे तर जीवनातील प्रत्येक समस्या सोडविता येतील . म्हणून म्हणतो ,  अशक्य ते शक्य करेल मन , विश्वास असावा आपल्यावरी .
अशा पद्धतीने आपल्याला आयुष्यात कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्मरण तंत्र मनन व चिंतन तंत्र आणि स्वसंमोहन तंत्र मदत नक्कीच मदत करेल. यासोबतच तंत्र अभ्यासाचे, रहस्य यशाचे या लेखमालेतील तंत्र परीक्षेसाठी exam study tips म्हणून देखील मदत करेल सर्व प्रशिक्षार्थीना मनपूर्वक शुभेछ्या पुढील भागात आपण स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र, वेळेच्या नियोजनाचे तंत्र आणि  दैनिक अभ्यास  नियोजन तंत्र याविषयी माहिती घेणार आहोत. तेव्हा समावेशित शिक्षण  ब्लॉग वरील अपडेट साठी whats app ग्रुप जॉईन करावा.


आणखी वाचा

📌 परीक्षेत पहिले येण्याचे तंत्र येथे वाचा

📌फ्लॅश नोटस् (Notes) कशा काढाव्यात येथे पहा  

📌 परीक्षेच्या शेवटच्या कमी दिवसात अभ्यास कसा करावा? तंत्र अभ्यासाचे, रहस्य यशाचे - येथे पहा

📌 दैनिक अभ्यासाचे व वेळेचे नियोजन कसे करावे?

📌 स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र

📌 अभ्यासाचे स्मरण , मनन , चिंतन आणि स्वसंमोहन तंत्र



नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.



Previous Post Next Post