इयत्ता १० वी व १२ वीची परीक्षा यंदा ७५% अभ्यासक्रमावरच २०२०-२१ , 12th exam & 10th class syllabus 2021

इयत्ता १० वी व १२ वीची परीक्षा यंदा ७५% अभ्यासक्रमावरच  २०२०-२१ , 12th exam & 10th class syllabus 2021 

10th class syllabus 2021

नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे बोर्डाच्या परीक्षा सन २०२०-२१ मध्ये कोरोना मुळे काही दिवस शाळा बंदच होत्या , त्यातही ५०% क्षमतेने वर्ग सुरु झाले. कोरोनाच्या दरम्यान शिक्षणातील सातत्य टिकून राहावे यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांच्या वतीने SCERT PUNE यांच्या वतीने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा , इंग्रजीचा विशेष तास अभ्यासक्रमाचे सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण , इंटरनेट उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिका  तसेच  SCERT MAHARASHTRA PUNE YOUTUBE CHANNEL वरून १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तास घेण्यात आले. त्याचबरोबर शंका समाधान , मेडीटेशन , ताण तणाव व्यवस्थापन , बालदिवस सप्ताह कार्यक्रम , SCERT SWADHYAY आदि उपक्रम घेण्यात आले.

कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या त्याचबरोबर अभ्यासातील सातत्य , लेखन सराव कमी झाल्यामुळे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांच्या वतीने २५% अभ्यासक्रम कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. New Syllabus 2021 उपलब्ध करून देण्यात आला.  सध्या सोशल मिडिया वर अफवां पसरविल्या जात आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता SCERT महाराष्ट्र पुणे शासनच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देवून कमी केलेला अभ्यासक्रम डाउनलोड करून घ्यावा. त्यानुसारच करावा. शाळेतील शिक्षकांशी वेळोवेळी संपर्कात रहावे.

विद्यार्थ्यांना कोव्हीड मुळे शाळा बंद असल्याने प्रत्यक्ष  शाळेमध्ये जाता आलं नाही. अभ्यास कमी पूर्ण क्षमतेने त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही कठीण परिस्थिती मुळे प्राप्त झाले नाही म्हणूनच 25% अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात  शासनाने निर्णय घेतला. काही घटकाकडून अभ्यासक्रम 50 टक्केपर्यंत कमी करत नाही अशी मागणी होत होती. त्याबाबत काही अफवा देखील पसरल्या  आहेत. 

याबाबत मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी स्पष्ट केले आहे की  परीक्षेची तयारी करण्यासाठी तीन ते चार महिन्याचा कालावधी आवश्यक असतो. अभ्यासक्रमात काही बदल केले तर पुढील परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी आम्हाला जवळपास तीन ते चार महिने लागतील आणि त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलावे लागते हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. 

त्यामुळे ७५% अभ्यासक्रमावर परीक्षा होतील असे Tweet मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी  @varshaEGaikwad  व्हिडिओ द्वारे कळविले आहे. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी हे  देशाचे भविष्य आहे आणि मला खात्री आहे तुम्ही या विपरीत परिस्थितीवर मात करून यशस्वी व्हाल अशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते. असे मत त्यांनी व्यक्त केले. 

शैक्षणिक वर्ष २०२-२१ साठी २५% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. पाठ्यक्रम syllabus डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

10th class syllabus 2021 

👉 इयत्ता ९ वी व  १० वी २५% कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

गणित सुधारित भाग १ व २ 

👉   इयत्ता ९ वी व  १० वी २५% कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

12th class syllabus 2021 

👉 इयत्ता ११ वी व  १२ वी २५% कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तत्वज्ञान सुधारित 

इयत्ता ११ वी व १२ वी २५%  कमी करण्यात आलेला  पाठ्यक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

👉 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्याशिक्षण, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र  २५% कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम , पंजाबी, रशियन आणि कार्याशिक्षण (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी)  , कन्नड व पंजाबी या विषयांचा २५% अभ्यासक्रम कमी , दिव्यांग पत्र व इयत्ता १ ली ते ८ वी अभ्यासक्रम  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सारांश- 

एप्रिल - मे २०२१ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेचा (12th exam & 10th class syllabus 2021) अभ्यासक्रम हा २५% च कमी झालेंला असून उर्वरित  ७५% अभ्यासक्रमावरच परीक्षा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. SCERT PUNE व महाराष्ट्र SSC व HSC BOARD अधिकृत वेबसाईट वर भेट देवून अधिक माहिती घ्यावी.

सर्व विद्यार्थ्यांना शुभेछ्या!

धन्यवाद 

Previous Post Next Post