26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Speech in Marathi

आपल्या भारत देशावर ब्रिटिशांनी १५० वर्षं राज्य केलं,  १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली. देशाचा कारभार चालवण्यासाठी संविधान तयार करण्यात आले. यासाठी घटना समिती तयार करण्यात आली. त्यामध्ये महत्वाचे योगदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. या घटना समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून इतर देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून भारत देशाला स्वतंत्र आणि मजबूत संविधान दिले. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले. त्यादिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. तर त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी पासून करण्यात आली. हा दिवस देशभरात प्रजासत्ताक दिन (राष्ट्रीय सण) म्हणून साजरा केला जातो.  प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण  करून वंदना दिली जाते. तसेच भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील राष्ट्रीय दिन/सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते. आज आपण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे भाषण बघणार आहोत. २६ जानेवारी २०२३ रोजी देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. येथे तुम्हाला २६ जानेवारी निमित्त भाषण  करण्यासाठी भाषण दिले आहे. याचा उपयोग आपल्याला भाषण, निबंध लेखन व प्रजासत्ताक दिनाची माहिती मिळवण्यासाठी देखील होणार आहे.

📌 भारताचे संविधान (राज्यघटना) म्हणजे काय?

📌 परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा


{tocify} $title={Table of Contents}

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Speech in Marathi

26 January Speech in Marathi
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषणाची पूर्व तयारी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे भाषण करताना तीन भागात त्याची विभागणी केली आहे. त्यामध्ये भाषणाची सुरुवात, भाषणाचा मध्य भाग आणि भाषणाचा शेवट या तीन भागामध्ये आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे भाषण करणार आहोत. आणि या पद्धतीने तुम्ही जर भाषणाची तयारी केली तर तुमचे म्हणणे तुम्ही समोरच्या पर्यंत व्यवस्थित मांडू शकाल. याठिकाणी आपण आपल्या इय्यतेनुसार, कॉलेज मधील भाषण किंवा सार्वजनिक कार्यक्रम किंवा प्रशासकीय कार्यक्रम त्यानुसार आपण भाषण कोणासमोर करणार आहोत. त्यानुसार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मध्ये दिलेल्या भाषणातील आपले भाषण लिहून काढावे व त्यानुसार खालील पद्धतीने आपल्या भाषणाची तीन भागामध्ये विभागणी करून भाषणाची तयारी करावी.  

  1. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन - भाषणाची सुरुवात/प्रारंभ
  2. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन - भाषणाचा मध्य
  3. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन - भाषणाचा शेवट

1.)  26 जानेवारी प्रजासत्ताक दिन - भाषणाची सुरुवात/प्रारंभ

सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना, सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा!

आज आपल्या भारत देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन, संपूर्ण देशभरात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला खास आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावरील (विचारपिठावरील) आदरणीय सर्व मान्यवर, माझे प्रिय गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो! आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आपणाला जे दोन शब्द सांगणार आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावेत. ही नम्र विनंती.

प्रजासत्ताक या शब्दा मध्येच अर्थ दडलेला आहे. की, प्रजा म्हणजे आपण सर्व लोक आणि सत्ता म्हणजे त्यावर आपले वर्चस्व म्हणजेच काय तर लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले लोकशाही राज्य अशी आपल्या देशाची ओळख आहे. देशाचा कारभार एका लोकशाही व समानतेच्या न्यायाने चालण्यासाठी तयार केलेला पायाभूत कायदा त्याला भारताचे संविधान, भारताची राज्यघटना या नावाने आपण ओळखतो. 

भारतीय संविधानाचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला गेला. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा करतो. तर अंमलबजावणी मात्र खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन हा २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. कारण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.

2) 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन - भाषणाचा मध्य

आपल्या भारत देशावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. या ब्रिटिश राजवटीपासून आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी थोर महापुरुष, राष्ट्रभक्त, राष्ट्रपुरुष, तसेच क्रांतिकारक या सर्वांनी देशासाठी बलिदान दिले. 

स्वातंत्र्य भारतातील लोकांच्या कल्याणासाठी, देशाची राज्यव्यवस्था कशी असेल? आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्या नियमानुसार कायद्याच्या चौकटीमध्ये देशाचा कारभार राहील? यासाठी एक नियम बनवणे आवश्यक होते. आणि यासाठीच घटना समिती स्थापन करण्यात आली. 

स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली  मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या मसुदा समितीने वेळोवेळी भारतीय संविधानाचा मसुदा सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहांमध्ये ठेवला. यादरम्यान यावर बराच विचार विमर्श आणि सुधारणा सुचवण्यात आल्या. 

मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि त्यांचे भारताचे संविधान (राज्यघटना) तयार करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान लाभले. यामुळेच त्यांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. तसेच भारताचे संविधान तयार करण्यामध्ये  ए.एल. सिन्हा, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, एच.सी. मुखर्जी, जे.बी. कृपलानी यांचे विशेष योगदान लाभले. या घटना समितीमध्ये एकूण 318 सदस्य होते. या मसुदा समितीतील सदस्यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस भारतीय संविधान तयार करण्यासाठी इतर देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून, भारतातील प्रत्येक नागरिकांचा विचार करून, भारताचे अंतिम संविधान सभागृहापुढे मांडले आणि त्याचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेले. आणि त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी पासून सुरु झाली. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच हा दिवस गणराज्य दिन म्हणून देखील ओळखला जातो.

भारतीय संविधानामध्ये (राज्यघटनेत) एकूण २५ भाग आणि १२ अनुसूची आहेत. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. त्यामध्ये लोकांच्या कल्याणासाठी देशाचा कार्यभार कशा पद्धतीने असेल आणि देशातील नागरिकांचे हक्क, कर्तव्य , प्रशासन, न्यायव्यवस्था अशी संपूर्ण नियमावली त्यामध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार तसेच सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे त्याचबरोबर नागरिकांची हक्क व कर्तव्ये निर्धारित करते. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे.

3) 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन - भाषणाचा शेवट 

भारतीय संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. यासाठी आजच्या प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या संविधानाची अधिकाधिक माहिती करून घ्यायला हवी. व त्याची जाणीव प्रत्येक नागरिकामध्ये रुजवण्यासाठी योगदान द्यायला हवे. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, देशातील नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. 

२६ जानेवारी १९५० या दिवशी संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखीत राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत.

आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्यामुळेच आज आपण आनंदात देशभरात स्वातंत्र्याने जीवन जगत आहोत. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. या जवानांना आणि देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे 
हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून 
स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.


हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post