समावेशित शिक्षण - दिव्यांग योजना सुविधा व सवलती (Inclusive Education)

दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी त्यांना समाजातील प्रत्येक कृतीमध्ये समान संधी व त्यांचा संपूर्ण सहभाग आणि त्यांचे  कल्याण व पुनर्वसन होण्यासाठी प्रोत्साहन देणारा कायदा केंद्र शासनाने दिनांक 28 डिसेंबर 2016 रोजी संमत केला. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ (The Rights of Persons with Disabilities  Act 2016) हा कायदा दिनांक 19 एप्रिल 2017 पासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला. यामध्ये 21 दिव्यांग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विविध तरतुदींची शिफारस करण्यात आली आहे. हा कायदा समाजात समानता आधारित समावेशास प्रोत्साहन देतो आणि विशेष गरजा असलेल्या मुलांचा (CWSN) नियमित (समावेशित शिक्षण) शाळांमध्ये समावेश करून त्यांच्या गरजाप्रमाणे त्यांना शिक्षण दिले जाते. समावेशित शिक्षण अंतर्गत इयत्ता 1 ली ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा व सवलती दिल्या जातात. याबद्दलची माहिती आजच्या आर्टिकल मध्ये दिली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

समावेशित शिक्षण - दिव्यांग योजना सुविधा व सवलती

samaveshit shikshan

मोफत शिक्षण

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (RTE Act 2009) नुसार प्रत्येक बालकांना त्यांच्या घराजवळच्या शाळामध्ये प्रवेश घेऊन, वय वर्ष 6 ते 14 व विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना वय वर्ष 6 ते 18 वर्षापर्यंत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचा हक्क या कायद्याने प्राप्त झाला असून, त्यामध्ये कोणत्याही भेदभाव विरहीत शाळेत प्रवेश व दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची हमी RTE Act 2009 नुसार मिळाली आहे. शासनाचे शैक्षणिक धोरणे व कायदे समावेशित शिक्षणाला प्रोत्साहन देणारे असून, नविन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये देखील समावेशित शिक्षणावर भर दिला आहे. यांतर्गत राज्यातील दिव्यांग विद्यार्थी आपल्या जवळच्या शाळेत शिक्षण घेत आहे.

RTE 25% प्रवेश प्रक्रिया मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा असतात. त्याअंतर्गत हे विद्यार्थी RTE 25% प्रवेश अर्ज करू शकतात.

आरोग्य तपासणी 

विद्यार्थ्यांची प्रत्येक शैक्षणिक वर्षात एक ते दोन वेळा शाळेमध्ये शालेय आरोग्य तपासणी पथकामार्फत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी संदर्भित करून गरजेनुसार दृष्टीदोष तपासणी, कर्णदोष तपासणी, मानसोपचार तपासणी, मानसशास्रीय, मूल्यमापन (Psy Test), बुद्धीगुणांक चाचणी (IQ Test), वाचादोष तपासणी, शस्रक्रिया पूर्व तपासणी, शस्रक्रिया, दिव्यांग प्रमाणपत्र,  औषधोपचार, थेरेपी सेवा मिळते. त्यामध्ये आजपर्यंत कित्येक दिव्यांग विद्यार्थ्यांचे ऑपरेशन यशस्वी झालेले आहे. 

कृत्रिम अवयव - साहित्य साधने

शाळेतील इयत्ता १ ली ते १२ वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हा स्तरीय मोजमाप शिबीर घेऊन अस्थिव्यंग/सेरेब्रल पाल्सी/बहुविकलांग विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, कॅलिपर, कुबडी, रोलेटर, मॉडीफाय चेअर, कमोड चेअर, सी.पी. चेअर, कॉर्नर सीट इ. साहित्य साधने पुरविण्यात येतात.

  • कर्णबधीर विद्यार्थ्यांची श्रवणऱ्हास चाचणी (Audiometery Test), बेरा टेस्ट करून त्यांना श्रवणयंत्र (एअर मोल्ड), श्रवण प्रशिक्षण (Auditory Training) देण्यात येते.
  • दृष्टीदोष-अंध विद्यार्थ्यांना
  • चष्मा , लार्ज प्रिंट, लोव्हिजन कीट, ब्रेल बुक, ब्रेल रेडीनेस कार्यक्रम , ब्रेल कीट, अंध काठी, सीडी प्लेअर (अभ्यासक्रमावर आधारित सीडी), Orientation & Mobility Training, ICT आवश्यकतेनुसार साहित्य देण्यात येते.
  • बौद्धिक अक्षमता (मतिमंद)/स्वमग्न  विद्यार्थ्यांना TLMs कीट, एम आर कीट (MR KIT) देण्यात येते.

शैक्षणिक सहाय्य भूत सेवा व सुविधा

दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळा विरहीत शिक्षण घेण्यासाठी शाळेमार्फत मदतनीस भत्ता, प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता, लेखनिक, वाचकनीस भत्ता दिला जातो.

मदतनीस भत्ता

समावेशित शिक्षण अंतर्गत ज्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःहून शाळेमध्ये येण्या संदर्भात अडचणी असतात. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मदतनीस आवश्यक असतो. उदा. बहु विकलांग, सेरेबल पालसी, बौद्धिक अक्षमता (मतिमंद), अंध विद्यार्थी यांना शाळेत येण्यासाठी अडचणी येतात. यासाठी त्यांना मदतनीस यांच्या सहाय्याने शाळेत येता येते. यासाठी मदतनीस भत्ता दिला जातो.

प्रवासभत्ता

घरापासून शाळा दूर अंतरावर असेल तर शाळेत ये-जा करण्यासाठी प्रवास भत्त्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामध्येही विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना घर ते शाळा हे अंतर यामध्ये शिथिलता असते. उदा. अस्थिव्यंग, बहुविकलांग, मतिमंद, कर्णबधिर, सेरेब्रल पालसी अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जातो.

प्रोत्साहन भत्ता

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्रत्येक बालकाला आपल्या घराजवळच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण घेण्याचा हक्क मिळाला आहे. या कायद्यान्वये प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. त्या अंतर्गत या दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विशेषत: मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो.

लेखनिक भत्ता

शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला लिहिण्यासंदर्भामध्ये अडचण असेल उदा. अस्थिव्यंग विद्यार्थी , अंध विद्यार्थी किंवा इतर दिव्यांग प्रकारातील विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसाठी लेखनिक ची सुविधा उपलब्ध आहे. त्या अंतर्गत लेखन काम करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी लेखनिक भत्ता दिला जातो.

वाचकनीस भत्ता

वाचकनीस भक्ता हा विशेषतः अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेचा अभ्यास करण्यामध्ये मदत करण्यासाठी हा वाचकनीस भत्ता देण्यात येतो.

अध्ययन-अध्यापन सहाय्य - शिक्षक व पालक प्रशिक्षण

प्रत्येक मुलाची अध्ययन करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. या अनुषंगाने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन पद्धती संदर्भात पालक व वर्ग शिक्षकांना गरजेनुरूप दिव्यांग मुलाच्या अध्ययन पद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैली संदर्भात वेळोवेळी विशेष शिक्षक व विशेष तज्ञामार्फत अध्ययन अध्यापन सहाय्य प्रशिक्षण, मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येते.

अध्ययन शैली व प्रकार येथे वाचा

विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे आव्हाने व उपाययोजना

समता म्हणजे काय? येथे वाचा

परीक्षा पद्धती व मूल्यमापन सुविधा व सवलती

विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग यांच्याकडील शासन निर्णय दिनांक 16 ऑक्टोबर 2018 नुसार परीक्षा देण्यासंदर्भात व मूल्यमापन करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये प्रतितास 20 मिनिटे अधिक मिळतात. म्हणजे 3 तासाच्या पेपर साठी 60 मिनिटे अधिकचा वेळ असेल, परीक्षा पद्धती प्रश्नपत्रिका सोडवण्यासंदर्भात 20 गुणांची सवलत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिव्यांग 21 प्रकारनिहाय उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा

📌 शासन निर्णय (GR) परीक्षा पद्धती व मूल्यमापन येथे डाउनलोड करा.

📌 RCI E Online Registration - आर सी आय ई ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

📌 दिव्यांग म्हणजे काय? दिव्यांग 21 प्रकार येथे वाचा 

📌 विशेष गरजा असणारी बालके (Children With Special Needs)

📌 अपंग प्रमाणपत्र यूडीआईडी कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply UDID Card online registration)

📌 स्वावलंबन (UDID CARD) कार्डचे फायदे (UDID Card benefits)

📌 अस्थिव्यंग म्हणजे काय? सुविधा व सवलती संपूर्ण माहिती (Locomotor Disability Meaning)

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post