अपंग प्रमाणपत्र यूडीआईडी कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? | How to apply UDID Card online registration

दिव्यांग व्यक्तींना शासकीय सेवा-सुविधांचा लाभ मिळण्यासाठी अपंग प्रमाणपत्र (disability certificate) काढणे गरजेचे असते. केंद्र शासनाने दि.२८ डिसेंबर २०१६ रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संमत केला असून, सदर कायद्यातील तरतूदीनुसार एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाच्या प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये १. दृष्टीदोष (अंधत्व), २. कर्णबधिरता, ३. शारिरीक दिव्यांगता ४. मानसिक आजार, ५. बौध्दिक दिव्यांगता (Intellectual Disability) ६. बहूविकलांगता (Multiple Disability), ७. शारिरीक वाढ खुंटणे (डॉर्फिझम), ८. स्वमग्नता (ऑटिझम) ९. मेंदुचा पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी) १०. स्नायुंची विकृती ( मस्क्युलर डिस्ट्राफी) ११. मज्जासंस्थेचे जुने आजार (क्रॉनिक न्युरॉलॉजिकल कंडिशन), १२. विशेष अध्ययन अक्षमता (स्पेसिफीक लर्निंग डिसअॅबिलिटी), १३. मल्टीपल स्क्लेरॉसिस, १४ वाचा व भाषा दोष (स्पीच अॅन्ड लँग्वेज डिसअॅबिलिटी), १५. थॅलेसेमिया, १६. हिमोफिलिया, १७ सिकल सेल डिसीज, १८. अॅसीड अॅटॅक व्हिक्टीम, १९. पार्किनसन्स डिसीज, २०. दृष्टीक्षीणता (लो-व्हिजन), २१. कुष्ठरोग (लेप्रसी क्युअर्ड पर्सन्स) इ. २१ दिव्यांग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

➡️ दिव्यांग २१ प्रकार सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

➡️ दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना

{tocify} $title={Table of Contents}

अपंग प्रमाणपत्र यूडीआईडी कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? | How to apply UDID Card online registration

How to apply UDID Card online registration


दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ या कायद्यातील प्रकरण १० मधील कलम ५६, ५७, ५८ नुसार धोरणात्मक निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या  मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी गरजेनुसार वैद्यकिय पुनर्वसनात्मक सहाय्यभूत सेवा, विहित कालावधी मिळण्याकरिता विविध पुनर्वसनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दिव्यांग धोरण २०१८ ची अंमलबजावणी करण्याबाबतच्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. अपंग प्रमाणपत्रासाठी आता नविन प्रणाली विकसित झाली असून , अपंग प्रमाणपत्र म्हणजेच स्वावलंबन कार्ड त्यालाच यूडीआईडी कार्ड (UDID Card) म्हणून ओळखले जाते. 

अपंग प्रमाणपत्र यूडीआईडी कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप Follow करा. How to apply UDID Card online registration

स्टेप-१

 •  सर्वप्रथम  www.swavlambancard.gov.in  या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 
 • यासाठी गुगल सर्च मध्ये (swavlambancard OR disability certificate) असे सर्च करा. 
 • आणि www.swavlambancard.gov.in या वेबसाईट ला भेट द्या. 

स्टेप-२

 • swavlambancard या संकेत स्थळावर गेल्यानंतर वरच्या उजव्या बाजूस खालील ऑप्शन दिसतील.
> Apply for disability certificate & UDID card 
> Apply for disability certificate & UDID card renewal 
> Apply for Lost UDID card 
> Track your application status 
> Download your e-Disability card & e-UDID card 
> Update personal profile
 • यामधील Apply for disability certificate & UDID card या ऑप्शन ला क्लिक करा.

स्टेप-३

 • Apply for disability certificate & UDID card वर क्लिक केल्यानंतर आता एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये एकूण ४ भाग दिसतील..   
1.Personal Details 
2. Disability Details 
3. Employment Details 
4. Identity Details
 • आता या चार सेक्शन मध्ये ज्या अपंग व्यक्ती किंवा दिव्यांग विद्यार्थी यांचे अपंग प्रमाणपत्र काढावयाचे आहे. 
 • त्यांची माहिती या चार सेक्शन मध्ये वैयक्तिक माहिती, अपंगत्वाची माहिती, Employment Details व  4. Identity Details माहिती भरवायची आहे.
UDID CARD Register Official Website - https://www.swavlambancard.gov.in/

स्टेप-४ 

आता आपण ४ सेक्शन मधील माहिती भरताना काय काळजी घ्यावी ते पाहूया.
सर्वप्रथम 

1. वैयक्तिक तपशील  Personal Details


वैयक्तिक तपशील Personal Details , पत्रव्यवहारासाठी पत्ता Address for Correspondence, कायमचा पत्ता Permanent Address,  शैक्षणिक तपशील Educational Details इ. माहिती काळजी पूर्वक भरावी. शक्यतो सर्वप्रथम ऑफलाईन फॉर्म ची प्रिंट काढून माहिती भरून घ्यावी. त्यानंतर ऑनलाईन भरावी. 

>> अपंग प्रमाणपत्र (UDID card) ऑनलाईन नोंदणी (Apply for disability certificate & UDID card) ऑफलाईन PWD-form-full फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


Personal Details
udid form Personal Details


 • माहिती भरत असताना आधार कार्ड वरील नाव बघून English स्पेलीनिंग बरोबर भरावी.
 • लाल रंगातील (*) कॉलम मध्ये माहिती भरणे अनिवार्य आहे. अन्यथा माहिती Submit होणार नाही.udid

 • फोटो size 15kb to 30kb jpg,gif,jpeg,png format मध्ये आधीच तयार करून ठेवा.
 • (Only jpeg, jpg, gif and png image with size 15 KB to 30 KB allowed)
 • सही एका कागदावर करून स्कॅन करावी व त्याची Size 3kb to 30kb मध्ये असावी.
 • (Only jpeg, jpg, gif and png image with size 3 KB to 30 KB allowed)
 • Personal Details या सेक्शन मध्ये Personal Details , Address for Correspondence, Permanent Address, Educational Details संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आणि Next या बटनावर क्लिक करावे.

स्टेप-५

 2. Disability Details 

Disability details

 • ज्यांच्याकडे online काढलेले अपंग प्रमाणपत्र असेल त्यांच्यासाठी do you have disability certificate या ऑप्शन ला  Yes करून स्कॅन कॉपी अपलोड करावी. अपंग प्रमाणपत्र नसेल तर No करावे.
 • Disability Type (दिव्यांग्त्व प्रकार) अपंग प्रकार मध्ये आपणास संभाव्य जे २१ अपंग प्रकारातील असेल ते सिलेक्ट करावे. किंवा आधीचे जुने अपंग प्रमाणपत्र असेल तर त्यावर बघून जो दिव्यांग प्रकार असेल तो नमूद करावा.
 • अपंगत्व कधीपासून आहे नमूद करावे.
 • Disability Area मध्ये शरीराचा कोणता भाग Affected (अक्षम) आहे. ते निवडावे. 
 • इतर कॉलम मधील माहिती असेल तर भरावी अन्यथा पुढे जावे. लाल रंगातील (*) कॉलम मध्ये माहिती भरणे अनिवार्य आहे.

स्टेप-६

3. Employment Details

Employment Details

 • या सेक्शन मध्ये section मध्ये आपले Employment Details भरावे.
 • BPL/APL माहिती भरावी.
 • Annual Income वार्षिक उत्पन्न नमूद करावे.
 • त्यानंतर Next बटणावर क्लिक करा.

स्टेप-७ 

4. Identity Details


 • आधार कार्ड स्कॅन करून त्याची Size 10kb to 100kb मध्ये असावी.
 • आधार कार्ड किवा वर सांगितलेले कोणतेही Identity Details ची कॉपी स्कॅन करून अपलोड करावी.
 • त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून I Agreed चेक बॉक्स वर क्लिक करावे.
 • Captcha code बरोबर टाकावा व्यवस्थित दिसत नसेल तर रिफ्रेश बटनावर क्लिक करून आलेला नवीन Captcha code भरावा.
 • I have read and agree to the terms and conditions यावर क्लिक करून Proceed  वर क्लिक करा.
 • त्यानंतर  confirm application  वर क्लिक करा जर काही माहिती भरायची राहिली असेल तर Edit application  वर क्लिक करून भरू शकता अन्यथा confirm application  वर क्लिक करा.
 • त्यानंतर आपल्या स्क्रीन वर एक नोंदणी Register number येईल त्याची प्रिंट काढून घ्या. सदरची प्रिंट मेडिकल तपासणीच्या वेळेस आपल्याला दाखवावी लागेल, त्यासाठी जपून ठेवा.
 • जिल्हा रुग्णालय या नोंदणी क्रमांकानुसार प्राधन्यक्रमाने तालुका किंवा जिल्हा स्तरीय मेडिकल कॅम्प आयोजित केले जाईल त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून अपंग प्रमाणपत्र पडताळणी करून आपणस UDID card प्राप्त होईल.
 • ज्यांच्याकडे आधीच online प्रकारातील 'अपंग प्रमाणपत्र' आहे त्यांना पोस्टाद्वारे UDID card आपण दिलेल्या पत्यावर येईल.

महत्वाचे- कोव्हिड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा स्तरीय मेडिकल कॅम्प किंवा इतर वैद्यकीय तपासणी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली असून , याबाबत लवकरच निर्णय होईल मात्र अपंग प्रमाणपत्र (UDID card) ऑनलाईन नोंदणी करू शकता. यासाठी वेळोवेळी शासकीय उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय यांच्या संपर्कात राहून अधिक माहिती मिळवा.{alertInfo}


सद्यस्थितीत वर सांगितलेली प्रोसेस व कार्यवाही आहे. याबाबत काही बदल केले गेले तर यामध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे आपण तालुका / जिल्हा रुग्णालय यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती मिळवून संबंधित विभागाशी संपर्कात रहावे. 

UDID Card असे असेल

udid card

आणखी वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा.

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post