सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती मराठी | Savitribai Phule Information

Savitribai Phule Information Marathi : एकेकाळी भारतासारख्या रूढी-परंपरा असणाऱ्या देशांमध्ये स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल' एवढेच स्थान होते. स्त्रियांना समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा दिला जात नव्हता. अशा वेळी स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून, एक नवी दिशा , नव संजवनी देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यामध्ये त्याकाळी शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८४८ मध्ये मुलींसाठी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू केली. या शाळेमध्ये काम करण्यासाठी त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना साक्षर करून, त्यांची महिला शिक्षिका म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य विषयी (Savitribai Phule Information) माहिती आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

{tocify} $title={ठळक मुद्दे}

सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती मराठी

भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका व समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखवून, महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या , स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी अशी ओळख असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास

savitribai-phule-information-in-marathi

सावित्रीबाई फुले यांचा जन्म

सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. ज्योतीबा त्यावेळी तेरा वर्षाचे होते. लग्नानंतरचे सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई जोतीराव फुले होते. तर ज्ञानज्योती, क्रांतिज्योती या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते. 

दिनांक ३ जानेवारी हा दिवस म्हणजे ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस या दिवशी सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्मताने भारतामध्ये हा दिवस महिलांच्या सन्मानार्थ महिला मुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण

सावित्रीबाई फुले यांचे ज्यावेळी लग्न झाले त्यावेळी त्या निरक्षर होत्या. खरं म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे, स्रियांना शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जायचे परंतु ज्योतिरावांनी या चालीरीती मोडीत काढत सावित्रीबाईंना लिहायला-वाचायला शिकवले. 

एका प्रसंगी ज्योतिबांनी सावित्रीबाईना विचारले तुम्ही शिकता का अक्षर ओळख सावित्रीबाई क्षणभर गप्प झाल्या नंतर त्यांनी विचारले, "पण ते कसं शक्य आहे? कोण शिकवणार मला?" त्यावेळी मुलींसाठी शिक्षणाची दारं बंदं होती. काही ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्त्रीशिक्षणाचा प्रयत्न केला होता. परंतु पुण्याच्या धर्ममार्तंडांनी तो हाणून पाडला होता. 

स्त्री शिकली तर ती बिघडेल. ती ज्ञानी झाली तर आपल्या आधिपत्याखाली राहणार नाही. आपली सेवा करून मुलाबाळांसाठी पै- पाहुण्यासाठी राब राब राबणार नाही. हे आपल्या उपभोगाचं साधन, तिला शिक्षणाने स्वतंत्र अस्तित्व मिळेल. मग आपले वर्चस्व झुगारण्यास ती मागेपुढे पाहणार नाही. त्यापेक्षा डांबा तिला अज्ञानाच्या तळघरात आणि वरून लावा भले मोठ्ठे धर्मशास्त्राचे कुलूप ! असेच इथल्या तथाकथित विद्वानांचे मत होते. 

पण जोतिराव असे सरपटणारे विद्वान नक्कीच नव्हते. ते महामानव होते. दीनदुबळे, दलित, शोषित, शूद्र आणि स्त्रियांचा आत्मा जपणारे ते "महात्मा" होते. या महात्म्याने त्याच क्षणी पत्नीला ठासून सांगितले, “सावित्री, तुम्ही नक्की शिका, मी शिकवितो तुम्हांला !" पण बोलण्याएवढे कृतीत आणणे साधे नव्हते. कारण त्या काळी दिवसा पत्नीशी बोलायची सुद्धा चोरी होती. तिथे पाटी-पुस्तक घेऊन बायकोला शिकवत बसणे शक्यच नव्हते. पण बोलून मागे हटणारे जोतिबा नव्हते.

भल्या पहाटे मळ्यात जाऊन काळ्या आईची सेवा करता करताच मातीवर रेघोट्या पाडून जोतिबा सावित्रीला “अ, आ, ई" शिकवत बसे, झाडाची पाने मोजून गणित शिकवित असे, मुळाक्षरे, बाराखडी सावित्री गिरवू लागली. साधारणतः १८४४ चा तो काळ होता. काळ्या आईची पाटी करून युगस्त्रीने लेखणी हाती धरली होती. ते तिचे सर्वात महत्त्वाचे हत्यार होते.

ज्योतीबानीच त्यांचे एका सामान्य शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांनी त्यांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव भवाळकर यांच्याकडे दिली. त्यांनी सावित्रीबाई फुले यांना अहमदनगर मधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेत पुढील शिक्षण दिले.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य

सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये 1 मे 1847 रोजी मागासांच्या वस्तीत पहिली  शाळा सुरु केली. त्या शाळेमध्ये सगुणाऊ ला बोलवण्यात आले. आणि सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या होत्या मात्र पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. पुढे

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरु केली. या शाळेची पहिल्या भारतीय शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या.

ज्योतीबांनी जेव्हा अस्पृश्यांच्या मुलींसाठी पुण्यामध्ये शाळा सुरू केली. सावित्रीबाईची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. याचा संताप पुण्यातील उच्चवर्णीयांना व सनातन्यांना झाला. सावित्रीबाई यांच्या शाळेमध्ये सुरुवातीला पाच ते सहाच मुली होत्या. मात्र पुढे ही संख्या वाढून   45 पर्यंत जाऊन पोहोचली. हे पाहता सनातनी व उच्चवर्णीयांनी सावित्रीबाईंना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली. सावित्रीबाई शाळेत जात-येत होत्या. तेव्हा काही लोक त्यांच्या अंगावर चिखल-शेन फेकले. दगड-धोंडे मारले. अशाही परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी आपल्या पती प्रमाणे स्वतःचे काम निष्ठेने चालू ठेवले.

ज्योतीबांच्या वडिलांना ही आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम करावे हे मानवले नाही. त्यांनी ज्योतिबा व सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले. परंतु अशाही परिस्थितीमध्ये सावित्रीबाई मुळीच डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले.

या शाळेमध्ये सावित्रीबाई यांनी मुख्याध्यापिका म्हणून काम केले. भारतीय पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले याच आहेत. त्या काळामध्ये पुण्यातील इतर भागात देखील २ ते ३ शाळा काढून मुलीना शिक्षण दिले. त्याचबरोबर मुंबईतल्या गिरगाव मध्ये देखील स्टुडन्ट लिटररी अँड सायंटिफिक या सोसायटी तर्फे कमळाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठी ची शाळा सुरू केली.

संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दिन दलितांसाठी शाळा सुरू केली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान आतापर्यंत कोणालाही मिळाला नाही. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. अध्यापनाचे काम करत असताना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक छळ देखील झाला नातेवाईकांनी समाजाने सनातन्यांनी त्यांना त्रास दिला मात्र त्या डगमगल्या नाहीत तर त्यांनी आपला शैक्षणिक लढा सुरूच ठेवला. 

समाजाच्या विरोधाला नाही कधी डगमगलीस,

स्वप्न होते स्त्री शिक्षणाचे मनात जे पूर्ण करण्या

तुझी वाट तू चालत राहिलीस, धन्य ती क्रांतीज्योती

धन्य ती माऊली.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील काम करणे गरजेचे आहे महिलांचा आत्मविश्वास वाढवणे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते. 

वाट चुकलेल्या व फसलेल्या विधवा व निराधार महिलांना आत्महत्या व भ्रूणहत्या त्याकाळी याशिवाय काही पर्याय नसे. त्यांना गुप्तपणे व सुरक्षित रित्या अपत्यास जन्म देता यावा म्हणून जोतीरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह चालवले होते. या गृहातील अनाथ मुलांची काळजी घेण्याचे काम देखील सावित्रीबाई फुले या करीत असत. अशा प्रकारे सावित्रीबाईंनी समाजाकडून होणारी निंदा व अवहेलना सहन करून ज्योतीबांच्या समाज सुधारणेच्या कार्यात देखील सक्रिय सहभाग घेतला होता.

बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ मुलांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्म घेतलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत असे ठेवले होते.

सत्यशोधक समाजाच्या सावित्रीबाई कोण होत्या?

सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये देखील सावित्रीबाईंनी मोठा सहभाग घेतला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यू नंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा हाती घेतली होती. या काळात 1893 मध्ये सत्यशोधक समाजाची एक परिषद सासवड येथे भरली होती. या परिषदेचे अध्यक्ष पद सावित्रीबाई फुले यांनी भूषविले होते. 

सावित्रीबाई फुले यांच्या कवितासंग्रहाचे नाव काय?

सावित्रीबाईंच्या कवितासंग्रहाचे नाव काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिले.

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला?

1896-97  मध्ये पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे प्राण घेऊ लागला होता. हा रोग संसर्गजन्य आहे. हे कळल्यानंतर इंग्रज सरकारने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित खबरदारीचा उपाय म्हणून योजना आखली होती. या उद्भवणार यांचे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांच्या रुग्णासाठी पुण्याजवळ असलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला होता. आणि तिथे रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कुटुंबीयांना आधार दिला.

एका प्लेग झालेल्या दलित मुलाला खांद्यावरून आपला मुलगा डॉक्टर यशवंत यांच्या दवाखान्यांमध्ये नेण्याचे कार्य करीत असतानाच सावित्रीबाईना प्लेगचा संसर्ग झाला त्यातच त्यांचा 10 मार्च 1897 रोजी पुणे येथे मृत्यू झाला. मानवतेच्या या सेविकेचा अंतही मानवतेची सेवा करतानाच रणमैदानावरील एखाद्या रणमर्दानीस साजेसाच झाला, असेच म्हणावे लागेल.

सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून सवरून मोठ्या

होऊ, जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो

इतिहास घडवून जाऊ.

तूच आमची क्रांतीज्योति तूच आमची ज्ञानाई,

सांग कसे होऊ तुझ्या ऋणातून उतराई,

तुझ्यामुळेच तर नशिबी आली पाहण्या निळी

शाई.

मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी 

आभाळाला कवेत घेण्या मारु पंखभरारी 

क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करु साकार 

सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार 


हे सुद्धा वाचा 

महत्वाच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post