छत्रपती शिवाजी महाराज जयंती इतिहास आणि तारखेतील वाद

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजेच 'शिवजयंती' हा दिवस महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध सण/उत्सव आहे. सरकारने निश्चित केल्याप्रमाणे  19 फेब्रुवारी हा दिवस  'शिवजयंती' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी सार्वजनिक शासकीय सुट्टी असते. महाराष्ट्रा बाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस या दिवशी Shiv Jayanti साजरी केली जाते. या दिवशी सर्व शिवभक्त मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती (Shiv jayantiसण/उत्सव साजरा करतात. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ पासून 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आले आहे.

{tocify} $title={ठळक मुद्दे}

शिवजयंती उत्सव | Shivaji Maharaj Jayanti in Marathi

Shivaji Maharaj Jayanti in Marathi

Shivaji Maharaj Jayanti

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।
जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा.सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#शिवजयंती

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर, जिजाऊ माँ साहेबांनी केलेल्या शिवाई देवीच्या नवसाने जिजाऊ माँ साहेबांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा जन्म वार- शुक्रवार १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. शिवनेरीच्या शिवाई देवीचा प्रसाद म्हणून बाळाचे नाव 'शिवाजी' (SHIVAJI)  ठेवण्यात आले. 

महाराजांच्या जन्म तारखेबद्दल पूर्वी खूप मत मतांतरे होती. आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीया (६ एप्रिल १६२७) आणि मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया (१९ फेब्रुवारी १६३०) हे दोन दिवस शिवरायांचे जन्मदिवस म्हणून मानले जातात.

सन २००१ मध्ये महाराष्ट्र सरकारने या वादावर निर्णय घेत फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख स्वीकारली. शिवजयंती तारीख (Shiv Jayanti Date) १९ फेब्रुवारी ठरविण्यात आली. आणि तेव्हापासून १९ फेब्रुवारी रोजी Shiv Jayanti मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.  

शिवजयंती इतिहास | shiv jayanti history in marathi

महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, महाराजांच्या जीवनावर प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य/विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी महात्मा फुले यांनी इ.स. 1870 साली शिवजयंती सुरू केली. 

पुणे येथे शिवजयंती चा पहिला कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1895 साली शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी शिवाजी फंड कमिटीची स्थापना केली. 'शिवजयंती' उत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचे काम टिळकांनी केले. 

शिवजयंती तारीख वाद

शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून मत मतांतरे होती. 2001 साली महाराष्ट्र सरकारने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 , वार-शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवाजी महाराजांची जन्मतारीख स्वीकारण्यात आली. (संभाव्य तारखेत 6 एप्रिल 1627 वैशाख शुद्ध तृतीया ही एक जन्मतारीख मानली जात होती.) 

महाराष्ट्र राज्यातील काहीजण मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळला  जातो. तेव्हा पासून शासनामार्फत निश्चित केलेली शिवजयंती तारीख 19 फेब्रुवारी या तारखेला शिवजयंती (SHIV JAYANTI) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

शिवजयंती उद्देश

शिवजयंती साजरी करण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येक घटकाला , सर्व स्थरावरील लोकांना शिवरायांचे विचार , कार्य प्रत्येकापर्यंत पोहचावेत हा शिवजयंती साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

शिवजयंती कशी साजरी केली जाते?

सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्यावर शोधून काढली. तेव्हापासूनच शिवरायांचे कार्य घराघरात पोहचवण्यासाठी फुलेंनी इ.स.1870 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक शिवजयंती चा कार्यक्रम पुणे येथे केला. पुढील काळात लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव साजरा करित लोकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. 20 व्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंतीच्या कार्यामध्ये मोलाचे सहकार्य केले. 

19 फेब्रुवारी 'शिवजयंती' या दिवशी महाराष्ट्रामध्ये सण/उत्सवा प्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते. यादिवशी प्रत्येक आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतात. काहीजण त्यांच्या प्रतिमेस पूजा करतात. तर काहीजण सार्वजनिक मिरवणूका काढतात. 

कलापथक त्यांच्या कलेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपट उलगडून सांगतात. शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणे, मोटारसायकल रॅली,शिवज्योत दौड, शिवजन्मोत्सव सोहळा , सोशल मीडिया वर शिवरायांना अभिवादन करून एकमेकांना शुभेच्छा देणे, काही शिवभक्त या दिवसाचे औचित्य साधून गडकिल्यावर भेट देतात. ढोल-ताशेच्या गजरात मिरवणूक काढली जाते. अशा प्रकारे प्रत्येक जण घराघरात तसेच सार्वजनिक पध्दतीने मोठ्या उत्साहात Chhatrapati shivaji maharaj jayanti 'शिवजयंती' (SHIV JAYANTI)  साजरी करतात.

प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज
योगीराज
महाराज
श्रीमंत
श्री श्री श्री
छत्रपती 
शिवाजी महराज कि जय
🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩


हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                        

Previous Post Next Post