RTE 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज 20 फेब्रुवारी नंतर भरता येणार

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (शिक्षण हक्क कायदा RTE Act 2009) नुसार दरवर्षी RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या RTE 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. 

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे - ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती

RTE Admission last date

यावर्षी RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया  100% राबवून प्रवेश मिळवण्यासाठी लवकर सुरुवात करण्यात आली आहे. 23 जानेवारी पासून (RTE 25 टक्के प्रवेश) सुरु करण्यात आलेली शाळा नोंदणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.

RTE 25 टक्के योजनेअंतर्गत 1 लाखापेक्षा अधिक बालकांना मिळणार मोफत प्रवेश

राज्यातील 8 हजार 820 शाळांची नोंदणी RTE प्रवेश प्रक्रिया साठी पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये 1 लाख 1 हजार 881 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. RTE प्रवेशासाठी लवकरच पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण या वेबसाईट ला भेट देत रहा.

ज्या शाळा आरटीई नोंदणीसाठी पात्र आहेत. परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही. अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आहेत. त्यामुळे एकही पात्र शाळा नोंदणीपासून वंचित राहणार नाही. 

'जय जय महाराष्ट्र माझा' Original MP3 , Video गाणे येथे डाउनलोड करा 

RTE 25 टक्के विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन अर्ज - RTE 25 Admission Date

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी (RTE 25 Admission Date) 20 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात येणार आहे. 

RTE Admission Documents List in Marathi

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24

  

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24

आर.टी.ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रिया F.A.Q. | वारंवार विचारले प्रश्न

प्रश्न - आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्र वयोमर्यादा किती आहे?

उत्तर - आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्र वयोमर्यादा कमीत कमी 4.5 वर्ष ते जास्तीत जास्त 7.5 वर्ष आहे.

प्रश्न - 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती मुले प्रवेश घेण्यास पात्र आहेत?

उत्तर - दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.1लाखापर्यंत आहे. अशा पालकांची मुले 25% ऑनलाईन प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

प्रश्न - वंचित गटामध्ये कोणत्या मुलांचा समावेश होतो ?

उत्तर - वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क). भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), एच. आय. व्ही. बाधित/ एच. आय. व्ही. प्रभावित बालके , (एक्स-१) अनाथ बालक , (एक्स-२) कोव्हीड प्रभावित बालक ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले. यांचा समावेश आहे.

प्रश्न - दुर्बल गटामध्ये कोणत्या मुलांचा समावेश होतो?

उत्तर - दुर्बल गटा मध्ये ज्या मुलांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे, अशा मुलांचा दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

प्रश्न - कोणत्या माध्यम व बोर्ड प्रकारच्या शाळा 25 टक्के प्रवेशासाठी पात्र आहेत ? 

उत्तर - सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, CBSE, ICSE व IB सह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित प्राथमिक वर्ग 1 ली किंवा पूर्व प्राथमिकस्तरावरील (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून) इतर सर्व शाळांचा यामध्ये समावेश आहे.

प्रश्न - उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे ? 

उत्तर - उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, त्याच ठिकाणचा असावा.

प्रश्न - खुला प्रवर्ग, अल्पसंख्यांक, यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे / प्रमाणपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर - जन्माचा दाखला, रहिवासी, पुरावा, (आधारकार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र, वीज बिल / टेलिफोन बिल/पाणी पट्टी/वाहन चालविण्याचा परवाना रेशनिंग कार्ड / राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक/ भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार नाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक) व कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असल्याच उत्पन्नाचा दाखला.

कोरोना मुळे निधन झालेल्या पाल्यांना मिळणार RTE 25 टक्के प्रवेशाचा लाभ - या दोन वंचित घटकांचा समावेश

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे - ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती

आणखी वाचा

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा  

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

📌 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग - शासन निर्णय

📌 नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० येथे वाचा 


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                        


Previous Post Next Post