आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24 | RTE Admission Documents List in Marathi

RTE Admission 2023-24 Maharashtra : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी RTE अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये नविन प्रवेशित मुलांसाठी 25 टक्के जागा या राखीव असतात. दरवर्षी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत लॉटरी पद्धतीने 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023-24 सुरू केली आहे. RTE प्रवेश प्रक्रिया 2023-24 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (RTE Admission Documents List in Marathi) कोणती आहेत? व बालशिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई प्रवेश 2023-24 वयोमर्यादा किती असणार आहे? या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

RTE 25 टक्के ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी का होत आहे विलंब ? 

{tocify} $title={ठळक मुद्दे}

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे 2023-24 | RTE Admission Documents List in Marathi

RTE Admission Documents List in Marathi
RTE Admission Documents List

पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे 2023-24 साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर पालकांना RTE पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.  नवीन शैक्षणिक वर्षातील RTE प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी यंदा महाराष्ट्र शासनाने लवकरच आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया (RTE Admission Maharashtra 2023-24) सुरू केली आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तत्पूर्वी ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून, पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे (RTE Admission Documents List in Marathi) आवश्यक आहे? याबद्दलची माहिती आता आपण पाहणार आहोत.

RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेकरीता लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतची ग्राह्य धरण्यात येते.  त्यानंतरची कागदपत्रे ही स्वीकारली जात नाही. त्यामुळे पालकांनी 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे आताच काढून ठेवावीत. जेणेकरून ऐनवेळेवर धावपळ होणार नाही. RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

कोरोना मुळे निधन झालेल्या पाल्यांना मिळणार RTE 25 टक्के प्रवेशाचा लाभ - या दोन वंचित घटकांचा समावेश

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे 2023-24 | RTE Admission Documents List in Marathi

आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्राची कागदपत्रे (RTE Admission Documents List)

  • रहिवाशी प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा 
  • जन्माचा दाखला (जन्म दाखला)
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न)
  • जातीचा दाखला - वंचित जात सवर्गातील असल्यास वडिलांचे व बालकाचे जात प्रमाणपत्र 
  • दिव्यांग असल्यास - जिल्हा शल्यचिकित्सक यांचे किमान 40% चे दिव्यांग प्रमाणपत्र
  • एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यांचे (single parent) कागदपत्रे
  • घटस्फोटित महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  • न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  • विधवा महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  • HIV बाधित/प्रभावित असल्यास संबंधित कागदपत्रे
  • अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे
महत्वाचे - आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे ही ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतची असावीत. त्यानंतरचे कागदपत्रे स्वीकारली जात नाही याची काळजी घ्या.{alertInfo}


 📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 येथे वाचा

आरटीई प्रवेश 20223-24 महाराष्ट्र वयोमर्यादा | RTE Admission 2023-24 age limit in marathi

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी मुलाचे प्रवेश वय (RTE Admission 2023-24 age Limit) निश्चित करण्यात आले असून, याबाबत महाराष्ट्र शासनाचे २८ फेब्रुवारी २०२२ च्या परिपत्रकानुसार प्ले ग्रुप/नर्सरी , ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेण्यासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश वयोमर्यादा किमान 4.5 वर्ष ते कमाल 7.5 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेश 20223-24 महाराष्ट्र वयोमर्यादा परिपत्रक येथे वाचा

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळांमधील 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शाळांची 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच पालकांना आर टी ई  25 टक्के प्रवेश प्रक्रिया साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल, यासाठी याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि नियम व अटी याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला समावेशित शिक्षण या वेबसाईटवर अपडेट करण्यात येईल.


आर.टी.ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रिया F.A.Q. | वारंवार विचारले प्रश्न

प्रश्न - आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्र वयोमर्यादा किती आहे?

उत्तर - आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्र वयोमर्यादा कमीत कमी 4.5 वर्ष ते जास्तीत जास्त 7.5 वर्ष आहे.

प्रश्न - 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती मुले प्रवेश घेण्यास पात्र आहेत?

उत्तर - दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.1लाखापर्यंत आहे. अशा पालकांची मुले 25% ऑनलाईन प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

प्रश्न - वंचित गटामध्ये कोणत्या मुलांचा समावेश होतो ?

उत्तर - वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क). भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), एच. आय. व्ही. बाधित/ एच. आय. व्ही. प्रभावित बालके , (एक्स-१) अनाथ बालक , (एक्स-२) कोव्हीड प्रभावित बालक ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले. यांचा समावेश आहे.

प्रश्न - दुर्बल गटामध्ये कोणत्या मुलांचा समावेश होतो?

उत्तर - दुर्बल गटा मध्ये ज्या मुलांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे, अशा मुलांचा दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

प्रश्न - कोणत्या माध्यम व बोर्ड प्रकारच्या शाळा 25 टक्के प्रवेशासाठी पात्र आहेत ? 

उत्तर - सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, CBSE, ICSE व IB सह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित प्राथमिक वर्ग 1 ली किंवा पूर्व प्राथमिकस्तरावरील (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून) इतर सर्व शाळांचा यामध्ये समावेश आहे.

प्रश्न - उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे ? 

उत्तर - उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, त्याच ठिकाणचा असावा.

प्रश्न - खुला प्रवर्ग, अल्पसंख्यांक, यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे / प्रमाणपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर - जन्माचा दाखला, रहिवासी, पुरावा, (आधारकार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र, वीज बिल / टेलिफोन बिल/पाणी पट्टी/वाहन चालविण्याचा परवाना रेशनिंग कार्ड / राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक/ भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार नाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक) व कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असल्याच उत्पन्नाचा दाखला.

कोरोना मुळे निधन झालेल्या पाल्यांना मिळणार RTE 25 टक्के प्रवेशाचा लाभ - या दोन वंचित घटकांचा समावेश
आणखी वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post