RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 - कोरोना मुळे निधन झालेल्या पाल्यांना मिळणार RTE 25 टक्के प्रवेशाचा लाभ (या दोन वंचित घटकांचा समावेश)

RTE 25 % Admission 2023-24 Maharashtra : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी RTE अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये नविन प्रवेशित मुलांसाठी 25 टक्के जागा या राखीव असतात. दरवर्षी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत लॉटरी पद्धतीने 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023-24 (RTE Admission 2022-23 Maharashtra) सुरू केलेली असून, यावर्षी अनाथ बालके व कोरोनामुळे निधन झालेल्या पालकांचे बालके या दोन वंचित घटकांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती पुढे वाचा

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 संपूर्ण माहिती  (RTE Admission Maharashtra) येथे वाचा

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24 (RTE Admission Documents List) येथे वाचा 

कोरोना मुळे निधन झालेल्या पाल्यांना मिळणार RTE 25 टक्के प्रवेशाचा लाभ - या दोन वंचित घटकांचा समावेश

RTE Admission 2022-23 Maharashtra in Marathi
RTE Admission 2022-23 Maharashtra

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (वंचित व दुर्बल गटातील बालकाचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीतकमी २५ टक्के प्रवेश करण्याची पद्धत नियम, २०१३ मधील नियम २ कलम (बी) मध्ये उप-कलम (एक्स) नंतर  (एक्स-१) अनाथ बालक आणि (एक्स-२) कोव्हीड प्रभावित बालक ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले. यांचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षातील २०२३-२४ मधील प्रवेशासाठी समावेश करण्यात आला आहे. 

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेमध्ये वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क). भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), एच. आय. व्ही. बाधित/ एच. आय. व्ही. प्रभावित बालके या मुलांचा समावेश आहे. 

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेमध्ये वंचित गटामध्ये - अजून २ घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात (एक्स-१) अनाथ बालके आणि (एक्स-२) कोव्हीड प्रभावित बालक ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले. यांचा समावेश करण्यात आला आहे.{alertSuccess}



RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 संपूर्ण माहिती  (RTE Admission Maharashtra) येथे वाचा

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24 (RTE Admission Documents List) येथे वाचा 

हे सुद्धा वाचा


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post