पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड

Indian Post Bharti Maharashtra 2023 : पोस्ट ऑफिस (टपाल) विभागांमध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती जाहिरात निघाली आहे. यामध्ये 40,889 एवढी पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 27 जानेवारी 2023 ते 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. या भरतीमध्ये डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर आणि सहाय्यक पोस्ट मास्तर या पदासाठी भरती होणार आहे. 


{tocify} $title={सर्व माहिती}

पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड

post office bharati maharashtra
Post Office Bharti Maharashtra


पोस्ट ऑफिस भरती 2023 - महत्त्वाच्या तारखा 

Indian Post Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची तारीख 27 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. 
पोस्ट ऑफिस विभागातील भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत दुरुस्ती करता येईल.

आवश्यक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
10 वी मध्ये गणित आणि इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण असावेत.
यासोबतच स्थानिक भाषेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. उदा. महाराष्ट्र राज्यासाठी मराठी भाषा आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी फी

सर्वसाधारण आणि ओबीसी संवर्गासाठी रु 100 आहे. तर एस.सी, एस.टी आणि सर्व प्रवर्गातील महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.

पोस्ट ऑफिस भरती निवड कशी होईल ? अंतिम निकाल 

या रिक्त पदासाठी निवड गुणवत्तेनुसार होईल. उमेदवारांची गुणवत्ता 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल आणि त्यानंतर निवड केली जाईल.  या पदांसाठी निवडलेली अंतिम यादी 30 जून 2023 पर्यंत Indian Post Official Website -  indiapostgdsonline.gov.in वर प्रसिद्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा पोस्ट ऑफिस सर्कल नुसार जागांची संख्या

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 : मध्ये कोणत्या जिल्ह्यात ? किती जागा ? Maharashtra Circle सर्कल नुसार जागा येथे पहा. खालील पोस्ट ऑफिस वेबसाईटला भेट देऊन जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर Select Division या ऑप्शन वर क्लिक करून View Post करा. आपल्याला सर्कल Wise जागांची माहिती मिळेल.
महाराष्ट्र जिल्हा पोस्ट ऑफिस सर्कल नुसार जागांची संख्या येथे पहा - {getButton} $text={Website Link} $icon={link}


पोस्ट ऑफिस भरती अर्ज कोठे व कसा करावा?

Stage 1- Registration

ऑनलाइन अर्ज हे तीन टप्प्यांमध्ये करायचे आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन करून बेसिक संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.

Stage 2 - Apply Online

दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यामध्ये Registration Number आणि Circle निवडून  (Application Form) अर्ज भरावयाचा आहे. त्यांनतर सर्कल-पदाचा प्राधान्य क्रम निवडायचा आहे. (Choose Preferences) आणि नंतर भरलेला संपूर्ण फॉर्म प्रिंट काढून घ्यायचा आहे. (Print Application)

Stage 3 - Fee Payment

जर आपण सर्वसाधारण (Open) आणि ओबीसी संवर्गातून अर्ज केला असल्यास रु 100 फी भरावी. आणि एस.सी, एस.टी आणि सर्व प्रवर्गातील महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.
इच्छुक आणि पात्र उमेदवार indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

आणखी वाचा
नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                        


Previous Post Next Post