महाराष्ट्र शासनाचे महाकरियर पोर्टल विद्यार्थ्यांसाठी ठरत आहे वरदान ! - Maha Career Portal Login 2023

Maha Career Portal 2023 : करियर हा सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विशेषत: इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील करिअर योग्य पद्धतीने निवडले, तर भविष्यातील चांगल्या नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाकरियर पोर्टल सुरू केले आहे. या करियर पोर्टलचा फायदा विद्यार्थ्यांना तसेच त्यांचे शिक्षक व पालकांना होणार आहे. जेणेकरून मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी महा करियर पोर्टल ची मदत मिळणार आहे. करिअर मध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळवू शकता? त्यासाठी शैक्षणिक पात्रता, कॉलेज महाविद्यालयाची माहिती , शिष्यवृत्ती माहिती , भविष्यातील संधी , तुम्ही किती पैसे कमवू शकता. कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा विषयी , आवश्यक क्षमता , नोकरीच्या संधी अशा विविधांगी परिपूर्ण माहिती आपणास महाकरियर पोर्टल वर अगदी मोफत मिळते. विविध कोर्सेस दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे का? याबाबतची माहिती दिव्यांग प्रकार निहाय उपलब्ध आहे. जे की दिव्यांग विद्यार्थ्यांना कोर्सेस निवडण्यासाठी मदत होते. करिअर पोर्टल मध्ये  करिअरविषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या, महाविद्यालये यांची माहिती मिळणार आहे. या लेखामध्ये आपणास महाकरियर पोर्टल (Maha Career Portal) ची माहिती व ते कसे वापरावे याची माहिती देण्यात आलेली आहे.

{tocify} $title={ठळक मुद्दे}

महाकरियर पोर्टल विद्यार्थ्यांसाठी ठरत आहे वरदान ! - Maha Career Portal Login 2023

महाराष्ट्र राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT Pune) यांच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी हे महाकरिअर पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.

Maha Career Portal login Maharashtra
Maha Career Portal login Maharashtra

करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्यवेळी व्यवसाय मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मुलांच्या आवडी व क्षमता यानुसार विद्यार्थ्यांना योग्यवेळी करिअरची निवड करण्याविषयी मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या आवडीचे रुपांतर संधीत होऊन भविष्यात ते चांगल्या प्रकारे करियर करू शकतील.

महा करियर पोर्टल ची उद्दिष्टे | Maha Career Portal 

महाराष्ट्र शासनाने इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना करिअर विषयक संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या मुख्य उद्देशाने हे महा करियर पोर्टल महाराष्ट्र शासनाने विनामूल्य सुरु केलेले आहे.{alertInfo}

  1. विद्यार्थ्यांच्या करिअर विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाकरिअर पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.
  2. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर निवड, कॉलेजेस, व्यावसायिक कोर्सेस, विविध अभ्यासक्रम, कोर्स फी, प्रवेश परीक्षा, आणि स्कॉलरशिप तसेच भविष्यातील नोकरीच्या संधी आणि वार्षिक उत्पन्न किती मिळू शकते? याबद्दलची माहिती पोर्टल मध्ये देण्यात आलेली आहे.
  3. या पोर्टलचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि करिअर विषयक माहिती व पर्याय सुचवणे.
  4. सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवून सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्यामध्ये दिव्यांग मुलांसाठी देखील करियर निवडण्याचे मार्गदर्शन देण्यात आले आहे. 

महाकरियर पोर्टल ची वैशिष्ट्ये 

  • करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, शिष्यवृत्या, महाविद्यालय, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देण्यात आलेली आहे.
  • 16 देशांमधील करिअर प्रोग्रामविषयी माहिती
  • 550 हुन अधिक करिअर कोर्सेस
  • 21100 हुन अधिक कॉलेज , महाविद्यालय यांची माहिती
  • 1150 हुन अधिक प्रवेश परीक्षा माहिती
  • 1120 हुन अधिक उपलब्ध शिष्यवृत्ती संधी विषयी माहिती Maha Career Poratl मधून मिळते{alertInfo}
            आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्या विविध क्षेत्रनिहाय (Category Wise) आपणास कोर्सेस शोधता येतात. उदा. एज्युकेशन आणि टिचिंग मध्ये पुन्हा Sub Category आणि मग आपल्याला हवा तो पर्याय निवडून आपण त्याबद्दलची माहिती घेऊ शकतो. प्रत्यक्ष लॉगिन केल्यावर आपणास या सर्व गोष्टी लक्षात येतील.

            सर्व माहिती मराठी मध्ये उपलब्ध आणि इतर कोणाला इतर भाषेत बघायची असेल तरी देखील आपण इतर भाषा सिलेक्ट करून पाहू शकता.

            महा करिअर पोर्टल हे Android App मध्ये देखील Maharashtra Career app म्हणून उपलब्ध आहे. ते आपण डाउनलोड करू शकता. त्यासोबत mahacareerportal.com ही अधिकृत वेबसाईट आहे. यावर आपण लॉगीन करून माहिती मिळवू शकता. लॉगीन कसे करायचे? याबबतची माहिती पुढे दिलेली आहे.

            महाकरिअर पोर्टलची आवश्यकता का आहे?

            माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात होत असते. विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लागावा यासाठी योग्य टप्प्यावर आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार करियर निवडता यावे.

            अशा टप्प्यावर विद्यार्थ्याने पुढील कोणता अभ्यासक्रम किंवा कोर्स निवडावा याबाबत अनेकदा संभ्रमावस्था मुलांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये होत असते. याच वेळी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदशनाची खरी गरज असते. यासाठी महाकरियर पोर्टल ची आवश्यकता भासते.

            करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती महाकरिअर पोर्टल च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल.

            विद्यार्थी बऱ्याच वेळा पुढील अभ्यासक्रम निवडताना आई-वडिलांच्या, मित्रांच्या सांगण्यावरुन करिअरची निवड तर करतो. पण भविष्यामध्ये योग्य मार्गदर्शना अभावी पुढील अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याला अनेक अडचणी निर्माण होतात. हे पोर्टल सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर विषयक सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात.

            प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भविष्याची चिंता असते. त्यांना माहित नसते की त्यांचे शिक्षण योग्य दिशेने होत आहे की नाही? अशा विद्यार्थ्यांना हे पोर्टल लाभदायक ठरते.

            महाकरिअर पोर्टल पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची विद्यार्थ्याना आवश्यकता नाही.

            महा करियर पोर्टल लॉगीन कोण करू शकते? - Maha Career Portal Login


            इयत्ता 9 वी ते 12 वीत शिकणारे सर्व माध्यमाचे विद्यार्थी लॉगिन करून माहिती घेऊ शकतात.
            इयत्ता 9 वी ते 12 वीला शिकवणारे वर्गशिक्षक आणि संबंधित शाळा , कॉलेज ,महाविद्यालय मुख्याध्यापक , प्राचार्य लॉगिन करून आपल्या शाळा , महाविद्यालयाचा रिपोर्ट पाहू शकतात.

            महा करियर पोर्टल लॉगीन करण्यासाठी काय आवश्यक आहे? - Maha Career Portal Login Registration

            • विद्यार्थ्यांना - विद्यार्थ्यांचा सरल आयडी (Maha Career Portal Saral ID) जो शाळेतून , कॉलेज मधून मिळेल. आणि सर्वांसाठी पासवर्ड 123456 हा आहे.
            • प्राचार्य आणि मुख्याध्यापक - प्राचार्य /मुख्याध्यापकांसाठी शाळेचा UDISE नंबर हा युजर आयडी आणि पासवर्ड 123456 हा आहे.
            • शिक्षकांसाठी 2 आयडी उपलब्ध आहेत. - शाळा , कॉलेज , महाविद्यालय शिक्षकांसाठी शाळेचा UDISE नंबर पुढे T1 हा युजर आयडी आणि पासवर्ड 123456 हा आहे. तर शाळेचा UDISE नंबर पुढे T2 युजर आयडी आणि पासवर्ड 123456 हा आहे. (उदा. 27151645656T1, 27151645656T2) याप्रमाणे{alertSuccess}

            महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? - How to Use Maha Career Portal?

            • आपण विद्यार्थी असाल तर, आपल्या शाळा ,कॉलेज किंवा महाविद्यालयातुन आपला सरल आयडी घ्यावा. तो आपणास वर्गशिक्षक , मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्याकडून मिळेल.
            • आपण शिक्षक , मुख्याध्यापक ,प्राचार्य असाल तर आपल्याला दिलेला आयडी टाकून पुढील स्टेप Follow करा. (HM , Principal आपला आयडी हा शाळेचा Udise code कोड असेल. आणि शिक्षकांसाठी Udise code आणि T1 ,T2 यापैकी एक असा आपला आयडी असेल.)

            Maha Career Portal Login

            maha career portal login
            maha career portal login
            • महा करिअर पोर्टल वेबसाईट Google Chrome ब्राउझर मध्ये mahacareerportal.com ओपन करा. (आपण Maharashtra Career app मध्ये देखील लॉगिन करू शकता.) 
            • त्यानंतर mahacareerportal.com या वेबसाईटवर जाऊन लॉगिन आयडी मध्ये आपला आयडी प्रविष्ट करा.आणि 123456 हा पासवर्ड टाकून लॉगिन करा. 
            • आपल्या समोर करियर विषयी माहिती मिळवा , कॉलेज डिक्शनरी, परीक्षा डिक्शनरी, स्कॉलरशिप स्पर्धा आणि फेलोशिप डिक्शनरी असे वेगवेगळे पर्याय दिसतील हा होम डॅशबोर्ड अशा पध्दतीने आपणास दिसेल.
            • त्यामध्ये आता आपल्याला हवी ती माहिती शोधण्यासाठी आपण त्यावर क्लीक करावे.
            • उदा. करियर विषयी माहिती मिळवा यावर क्लीक केल्यास Professional Careers & Vocational Careers  पर्याय दिसेल त्याठिकाणी आपण प्रोफेशनल कोर्सेस आणि व्होकेशनल कोर्सेस मधील माहिती पाहू शकता.
            Mahacareerportal official website{getButton} $text={Website Link} $icon={link}

            Maha Career Portal Dashboard

            • प्रोफेशनल कोर्सेस मध्ये खालील पर्याय आपल्याला दिसेल.
            maha career portal
            • आपल्या आवडीनुसार आपण एक पर्याय सिलेक्ट करावा. उदा. एज्युकेशन अँड टीचिंग हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला सब कॅटेगिरी दिसेल.
            •  त्यामधून आपण एक पर्याय निवडावा. उदा. याठिकाणी आपण प्रोफेसर अँड लेक्चरर हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आपणास याबाबतची संपूर्ण माहिती डॅश बोर्ड वर दिसेल.
            maha career portal courses

            computer engineering

            • त्यामध्ये करियर मध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळवू शकता? आवश्यक शैक्षणिक पात्रता? भविष्य मधील संधी? याद्वारे आपण किती पैसे कमवू शकता? याबाबतची शिष्यवृत्ती मधील संधी? आवश्यक क्षमता? नोकरीच्या संधी? अशा विविध प्रकारची माहिती आपण या मधून घेऊ शकता.त्यासोबतच कॉलेज आणि यूनिवर्सिटी, प्रवेश परीक्षा ही देखील माहिती आपण येथून घेऊ शकता. 
            maha career portal courses


            सारांश

            विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअर संबंधी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवड करणे सोपे जावे यासाठी महाराष्ट्र शासनाने महा करियर पोर्टल सुरू केली आहे. या पोर्टलवर आपल्याला विविध अभ्यासक्रम, कोर्सेस, कॉलेज महाविद्यालय, शिष्यवृत्ती, भविष्यातील संधी, नोकरीच्या संधी, उत्पन्नाचे सोर्स अशी विविधांगी संपूर्ण माहिती आजच्या महाकरियर पोर्टल लेखामध्ये दिलेली आहे. 


            पुढील अपडेट साठी  'समावेशित शिक्षण' या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                                      

             
            Previous Post Next Post