शिक्षक भरती 2023 ! ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात - TAIT परीक्षा संपूर्ण माहिती

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022 : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयात रिक्त असलेली शिक्षकांची 35 हजार पदे भरण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकार ने केली आहे. शिक्षक भरती करण्यासाठी तत्पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' पोर्टल या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करण्याकरिता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022) या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

{tocify} $title={ठळक मुद्दे}

शिक्षक भरती 2023 ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात  - TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 

maharashtra-shikshak-bharti-2023
शिक्षक भरती 2023

पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक अभियोग्यता परीक्षा होत आहे. TAIT परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी हा दिनांक 31 जानेवारी ते दिनांक 8 फेब्रुवारी 2023 आहे. त्यांनतर लगेचच म्हणजे 15 फेब्रुवारी पासून ऑनलाईन प्रवेशपत्र (TAIT Exam Hall Ticket) उपलब्ध होणार आहे. TAIT ऑनलाईन परीक्षा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. शिक्षक भरती TAIT परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे.

शिक्षक भरती 2023 - रिक्त पदांची माहिती

राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावली नुसार 'पवित्र' (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे प्रसिध्द करण्यात येणार आहे.

शिक्षक भरती परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम

शिक्षक भरती परीक्षेचे माध्यम

TAIT परीक्षा माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असणार आहे. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असेल. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी- मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.

शिक्षक भरती 2023 परीक्षेचे अभ्यासक्रम

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022 सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.

  • अभियोग्यता चाचणी या विषयावर एकूण 120 प्रश्न , 120 गुणांसाठी असेल.
  • बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर 80 प्रश्न, 80 गुण असेल.
  • असे दोन्ही विषयावर एकूण 200 प्रश्न, 200 गुणांसाठी असणार आहे.
  • यासाठी 120 मिनिटे म्हणजेच दोन तासाचा वेळ असणार आहे.{alertInfo}


अभियोग्यता - या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल / आवड, समायोजन/ व्यक्तीमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

बुध्दिमत्ता - या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. कूट प्रश्न, सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्टस्तर मर्यादा असणार नाही.

शिक्षक भरती 2023 निवड प्रक्रिया

परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील (प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय / रात्र शाळा) पद भरतीसाठी ग्राहय धरण्यात येतील. 

शिक्षक भरती महत्वाचे शासन निर्णय

शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभागाचे शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 व 10 नोव्हेंबर 2022 च्या GR नुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राहील.

शिक्षक भरती 2023 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि निवड प्रक्रिया - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय 

शिक्षक भरती TAIT परीक्षा संपूर्ण अधिकृत माहिती PDF डाउनलोड करा.

शिक्षक भरती TAIT परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट 

{getButton} $text={Website Link} $icon={link}


आणखी वाचा

MPSC लिपिक टंकलेखक (क्लार्क) अभ्यासक्रम पाहण्यासाठी PDF डाउनलोड करा.

पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

 
Previous Post Next Post