RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 | RTE Admission Maharashtra

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) नुसार दरवर्षी RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार या चालू शैक्षणिक वर्षांमध्ये RTE 25% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत काढून राज्यांमध्ये 90,688 विद्यार्थ्यांची निवड यादी आरटीई पोर्टलवर जाहीर केली होती. त्यामध्ये मराठवाड्यात 15 हजार 565 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 5249 जागा रिक्त राहिल्या होत्या. राज्यातील एकूण जागा पैकी जवळपास 40% विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिले आहेत. मात्र यावर्षी पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्याचे आव्हान करण्यात येत आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रिया  100% राबवून प्रवेश करण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करण्यात आली आहे. 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान (RTE 25 टक्के प्रवेश)  शाळांची नोंदणी होणार आहे. यावर्षी अनाथ बालके व कोरोनामुळे निधन झालेल्या पालकांचे बालके या दोन वंचित घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

 पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 | RTE Admission Maharashtra

राज्यामध्ये दरवर्षी आर टी ई 25% प्रक्रिया राबवली जाते. मात्र काही शाळा, शिक्षक तसेच पालक यांच्या दिरंगाईमुळे प्रवेश प्रक्रियेसाठी विलंब होतो. परिणामी शैक्षणिक वर्षातील दोन ते तीन महिन्यानंतर ही प्रक्रिया सुरू राहत असल्याने ती थांबवली जाते. म्हणून या शैक्षणिक वर्षातील २०२३-२४ च्या RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान (RTE 25 टक्के प्रवेश)  शाळांची नोंदणी होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या RTE 25% प्रवेशासाठी RTE कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला 23 जानेवारीपासून शाळांची नोंदणी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. तर RTE 25 टक्के Admission 2023-24 साठी Maharashtra राज्याने (Last Date) दिनांक २ फेब्रुवारी पर्यंत शाळांची नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. 

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 | शाळांच्या नोंदणी प्रक्रियेतील बदल

  • सलग तीन वर्ष शाळा चालवली असेल तरच आरटीई 25% प्रवेश कोटा मिळणार आहे.
  • काही शाळेतील प्रवेशित संख्येपेक्षा आरटीई कोटा अधिक असेल, त्यांना या वर्षी कोटा मिळणार नाही तर तीन वर्षातील एकूण संख्येवर पुढील कोटा मिळेल.
  • ज्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वीच्या वर्गातील एकूण संख्येच्या 50% पेक्षा जास्त विद्यार्थी आरटीई प्रवेशित आहेत. अशा शाळेत यावर्षी आरटीई कोटा देण्यात येणार नाही. 
  • मागील शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणी करताना, लगतच्या तीन वर्षांचे आरटीई विद्यार्थ्यांचे प्रवेश वगळून ७५ टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या घेणार आहे. त्याची सरासरी करून ३ ने भागाकार करून येणारी संख्या ही या वर्षातील आरटीई कोट्यातील संख्या ठरणार आहे.
  • या वर्षातील कोटा दर्शवणाऱ्या पत्रावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. 
  • यावर्षी अनाथ बालके व कोरोनामुळे निधन झालेल्या पालकांचे बालके या दोन वंचित घटकांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती येथे वाचा

काही इंग्रजी शाळा आरटीई कोट्यातील संख्या अधिक आहे. मूळ प्रवेश संख्या वाढवून दाखवत आर टी ई कोट्यातील प्रवेश वाढवून घेण्याचा प्रकार काही शाळेत होत असल्यामुळे यावर्षी हा प्रकार थांबवण्यासाठी पडताळणी शक्तीने होण्याची मागणी शिक्षणप्रेमी मधून होत आहे.

📌 आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 जिल्हानिहाय शाळा व प्रवेश संख्या

जिल्हा शाळांची संख्या RTE प्रवेश संख्या
नांदेड 243 2290
औरंगाबाद 575 4301
जालना 291 2795
लातूर 219 1735
बीड 227 1908
परभणी 151 1067
हिंगोली 72 564
उस्मानाबाद 112 905


Admission Portal : RTE 25% Reservation

📌 आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24

📌 RTE  Portal वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

📌 कोरोना मुळे निधन झालेल्या पाल्यांना मिळणार RTE 25 टक्के प्रवेशाचा लाभ - या दोन वंचित घटकांचा समावेश

📌 महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य संख्या निवड प्रक्रिया व कार्यकाळ आणि मतदार संघ माहिती येथे वाचा

हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          


Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post