RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे - ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती

शिक्षण हक्क कायदा (RTE Act 2009) नुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या RTE 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. यंदाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. व २० फेब्रुवारी नंतर पालकांना RTE २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी RTE 25 टक्के अंतर्गत प्रवेश निवड होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते लॉटरी पद्धतीने निवड होईपर्यंत वेगवेगळे टप्पे असतात, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात दिलेली आहे. 

{tocify} $title={ठळक मुद्दे}

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे - ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती

RTE 25 टक्के योजनेअंतर्गत 1 लाखापेक्षा अधिक बालकांना मिळणार मोफत प्रवेश

राज्यातील 8 हजार 820 शाळांची नोंदणी RTE प्रवेश प्रक्रिया साठी पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये 1 लाख 1 हजार 881 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. RTE प्रवेशासाठी लवकरच पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण या वेबसाईट ला भेट देत रहा.
  1. विद्यार्थी नोंदणी RTE New Registration
  2. ऑनलाईन अर्ज - RTE Online Application 
  3. विद्यार्थी माहिती भरणे - Child Information
  4. ऑनलाईन अर्ज भरणे - RTE Online Application 
  5. आरटीई शाळा निवड - School Selection
  6. भरलेल्या अर्जाची स्थिती Summary - Application Details
  7. प्रवेशपत्र - Admit Card
rte online application

विद्यार्थी नोंदणी RTE New Registration

आरटीई २५ % प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  RTE पोर्टल वर प्रथम विद्यार्थी नोंदणी (RTE New Registration) करावी लागते. नोंदणी करतानाची माहिती अचूक भरावी कारण त्यामध्ये नंतर बदल करता येत नाही. त्यानंतर आपणास युजर आयडी व पासवर्ड आपल्या मोबाईल नंबरवर पाठविण्यात येतो. त्याचा वापर करून RTE पोर्टल मध्ये लॉगीन करून ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. (RTE पोर्टल लिंक शेवटी दिली आहे.)

ऑनलाईन अर्ज - RTE Online Application 

RTE पोर्टल वर विद्यार्थी नोंदणी (RTE New Registration) केल्यानंतर युजर आयडी व पासवर्ड चा वापर करून सर्वप्रथम एक नवीन पासवर्ड तयार करून घ्यावा कारण RTE प्रवेश प्रक्रिया संदर्भात आपल्याला शेवटपर्यंत युजर आयडी व पासवर्ड लागणार आहे. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्जाची स्थिती आणि पुढील प्रवेश प्रक्रिया आपल्या लॉगीन मध्ये पाहू शकणार आहात.

New Registration मध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर माहिती भरताना काही चुकल्यास Delete Application या बटनावर क्लिक करून अर्ज Delete करावा आणि नवीन अर्ज भरावा. (Delete Application हे ऑप्शन लॉगीन केल्यानंतर स्क्रीन वर दिसेल)

विद्यार्थी माहिती भरणे - Child Information

RTE २५ % ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लॉगीन करावे लागते. त्यांनतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती  Child Information भरावी लागते.

त्यामध्ये साधारणपणे बालकाचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव , गावाचे नाव, तालुका, जिल्हा  पत्ता, ही संपूर्ण माहिती अचूक भरावी. त्याचबरोबर गुगल Map मधून पत्ता नोंद करावा लागतो.

ऑनलाईन अर्ज भरणे - RTE Online Application 

ऑनलाईन अर्ज (RTE Application) या सेक्शन मध्ये प्रवेश घेण्याची इयत्ता, माध्यम, जात, धर्म, दिव्यांग असेल तर प्रकार, टक्केवारी आणि प्रमाणपत्र नंबर , कागदपत्र प्रुफ कोणते आहे? त्याची माहिती , मोबाईल नंबर पालकांचा इमेल आयडी, सध्याचा पत्ता इ माहिती अचूक भरावी लागते.

आरटीई शाळा निवड - School Selection

ऑनलाईन अर्ज (RTE Application) या सेक्शन मधील माहिती भरल्यानंतर पुढील सेक्शन मध्ये आरटीई शाळा निवड (School Selection) करावी लागते. त्यामध्ये १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा जास्त अंतर असणाऱ्या पात्र व अपात्र शाळांची नावे दिसतात त्यानुसार योग्य शाळांची निवड करायची असते. 

भरलेल्या अर्जाची स्थिती Summary - Application Details

विद्यार्थी माहिती , ऑनलाईन अर्जातील माहिती व शाळेची निवड ही संपूर्ण माहिती आपल्याला या सेक्शन मध्ये दिसते. माहिती तपासून अचूक असल्याची खात्री करावी लागते. 

त्यानंतर अर्जात नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे सत्य आहे. माहिती चुकीची आढळून आल्यास अर्ज प्रवेशासाठी रद्द होईल आणि मी त्यास सर्वस्वी जबाबदार राहील याची परवानगी द्यावी लागते. त्यानंतर 

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे, सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळल्यास आणि बालकांची एकापेक्षा जास्त अर्ज भरलेला आढळल्यास आरटीई अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते याची मला पूर्ण कल्पना आहे. हे प्रमाणपत्र वाचून खात्री करावी व चेक बॉक्स मध्ये क्लिक करावे लागते. नंतर Confirm & Submit बटणावर क्लिक करावे.

त्यांनतर आपल्या समोर एक पॉप अप ओपन होईल त्यावर ओके केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. 

ओके बटणावर क्लिक केल्यानंतर आता Genrate Pdf या बटणावर क्लिक करावे. व pdf ची प्रिंट काढून घ्यावी.

ही संपूर्ण माहिती भरताना त्या त्यावेळी Save करावी लागते. याची काळजी घ्या. इथे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर आता आपणास लॉटरी निवड यादीची प्रतीक्षा करावी लागेल.

प्रवेशपत्र - Admit Card

लॉटरी व्दारे निवड झाली असल्यास विध्यार्थी लॉगीन व्दारे Admit Card या पर्यायावर क्लिक करून Admit Card डाउनलोड करावा व त्याची प्रत घेउन मूळ कगदपत्र व झेरॉक्स प्रती घेउन तालुक्याची शिक्षण कमेटी (पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालय) येथे प्रवेश निश्चित करण्याकरीता दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधावा व तसा मेसेज देखील आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होतो. Admit Card वर शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असते.

आरटीई प्रवेश तक्रार - Grievance

जर पालकांना प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील, तर पालक आपल्या तक्रारी लॉगीन करून Grievance हा पर्याय निवडून ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात.

आर टी ई. २५% ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हे अवश्य वाचा

सन २०२३-२०२४ या वर्षाकरिता आर.टी.ई. २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज २० फेब्रुवारी नंतर पालकांना भरता येणार आहे.

  • एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा. एकाच बालकाचे २ किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील.
  • प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास, तो रद्द [Delete Application) करून पुन्हा भरावा. कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत.
  • प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्या वरील पत्ता अचूक भरावा.
  • पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवावी.
  • उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी..
  • यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये.

आर.टी.ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रिया F.A.Q. | वारंवार विचारले प्रश्न

प्रश्न - आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्र वयोमर्यादा किती आहे?

उत्तर - आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्र वयोमर्यादा कमीत कमी 4.5 वर्ष ते जास्तीत जास्त 7.5 वर्ष आहे.

प्रश्न - 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती मुले प्रवेश घेण्यास पात्र आहेत?

उत्तर - दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.1लाखापर्यंत आहे. अशा पालकांची मुले 25% ऑनलाईन प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

प्रश्न - वंचित गटामध्ये कोणत्या मुलांचा समावेश होतो ?

उत्तर - वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क). भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), एच. आय. व्ही. बाधित/ एच. आय. व्ही. प्रभावित बालके , (एक्स-१) अनाथ बालक , (एक्स-२) कोव्हीड प्रभावित बालक ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले. यांचा समावेश आहे.

प्रश्न - दुर्बल गटामध्ये कोणत्या मुलांचा समावेश होतो?

उत्तर - दुर्बल गटा मध्ये ज्या मुलांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे, अशा मुलांचा दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

प्रश्न - कोणत्या माध्यम व बोर्ड प्रकारच्या शाळा 25 टक्के प्रवेशासाठी पात्र आहेत ? 

उत्तर - सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, CBSE, ICSE व IB सह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित प्राथमिक वर्ग 1 ली किंवा पूर्व प्राथमिकस्तरावरील (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून) इतर सर्व शाळांचा यामध्ये समावेश आहे.

प्रश्न - उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे ? 

उत्तर - उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, त्याच ठिकाणचा असावा.

प्रश्न - खुला प्रवर्ग, अल्पसंख्यांक, यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे / प्रमाणपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर - जन्माचा दाखला, रहिवासी, पुरावा, (आधारकार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र, वीज बिल / टेलिफोन बिल/पाणी पट्टी/वाहन चालविण्याचा परवाना रेशनिंग कार्ड / राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक/ भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार नाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक) व कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असल्याच उत्पन्नाचा दाखला.

RTE पोर्टल लिंक - {getButton} $text={Website Link} $icon={link}


RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 संपूर्ण माहिती  (RTE Admission Maharashtra) येथे वाचा

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24 (RTE Admission Documents List) येथे वाचा 

हे सुद्धा वाचा


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post