महत्त्वाचे ! शिक्षक पदवीधर निवडणुकीत मतदान कसे करावे? - असे करा योग्य पद्धतीने मतदान

महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेतील 5 जागांसाठी शिक्षक व पदवीधर विधान परिषदेची निवडणूक 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. ही निवडणूक बाकीच्या इतर सर्व निवडणुकीपेक्षा वेगळी असते. यामध्ये मतदान यंत्र वापरले जात नाही, तर मतपत्रिका वापरली जाते. आणि मतदारांना आपल्या पसंती क्रमाने उमेदवारांना मत द्यायचे असते. चला जाणून घेऊया, शिक्षक पदवीधर निवडणुकीत मतदान करण्याच्या कोणत्या योग्य पद्धती आहे? शिक्षक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत मतदान कसे करावे? जेणेकरून आपण दिलेल्या आपल्या अमूल्य मताचा उपयोग होईल.

{tocify} $title={ठळक मुद्दे}

📌 शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 - मतदार यादीत नाव येथे पहा

महत्त्वाचे ! शिक्षक पदवीधर निवडणुकीत मतदान कसे करावे? - असे करा योग्य पद्धतीने मतदान 

vidhan-parishad-election
Vidhan Parishad Election 2023


"सोडा सगळे काम, आणि चला करूया मतदान"{alertSuccess}


लक्षात असुद्या! आपलं प्रत्येक मत अमूल्य आहे. पण हे अमूल्य मत तेव्हाच उपयोगात येईल, जेव्हा ते योग्य प्रकारे नोंदवलं जाईल.{alertSuccess}


शिक्षक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत मतदान कसे करावे?

मतदान करण्यासाठी जेव्हा आपण मतदान कशात जाणार तेंव्हा मतदान यादीतील नावावर आपली ओळख पटवण्यासाठी आपल्याला ओळख पत्र दाखवायचे आहे. त्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड दाखवावे. शिक्षक पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडणूक 30 जानेवारी रोजी होत आहे. 

मतपत्रिकेवर मत कसे नोंदवावे? याबाबत मतदारांसाठी मार्गदर्शक सूचना


मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केच पेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन यांचा वापर करू नये.{alertSuccess}

ज्या उमेदवारास तुम्हाला पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे. त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे लिहिलेल्या रकान्यात "1" हा अंक नमूद करुन मतदान करावे. अन्य काहीही लिहायचे नाही. फक्त प्रसंती क्रम अंक लिहायचा आहे.{alertSuccess}

एका उमेदवारांना एकच पसंती क्रम देता येईल. म्हणजे आपल्या जरी दोन उमेदवारांना पसंती क्रम 1 द्यावासा वाटला तरी तो देता येत नाही. 1 हा अंक एकदाच असायला हवा. आणि हा अंक आपल्याला ज्या उमेदवाराला द्यायचा आहे. त्यांच्या नावासमोरील रकण्यातच द्यायचा आहे.{alertSuccess}

निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंती क्रम देता येईल.{alertSuccess}

उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 याप्रमाणे असेल, पसंती क्रम अंक तुमच्या पसंती क्रमानुसार पसंतीक्रम" (Order of Preference) या रकान्यात लिहायचा आहे.{alertSuccess}

कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावा समोर नमुद करू नये.{alertSuccess}

पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. १,२,३, इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये.{alertSuccess}

अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3, इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I, II, III, इत्यादी किंवा संविधानाच्या ८ व्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील.{alertSuccess}

मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करू नये, तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये.{alertSuccess}

तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर (√) किंवा (X) अशी खुण करू नये. अशी मतपत्रिका बाद ठरेल.{alertSuccess}

तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर "१" हा अंक नमूद करून तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत. (बंधनकारक नाहीत.){alertSuccess}

आणखी वाचा

📌 पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड

📌 शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 - मतदार यादीत नाव येथे पहा

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा 

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

📌 परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा



नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                        

Previous Post Next Post