महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला तर विधिमंडळ अधिवेशन 27 फेब्रुवारी पासून

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३


केंद्राचा अर्थसंकल्प 2023-24 बुधवारी सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. 27 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार आहे.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. 

  • महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ अधिवेशन (अर्थसंकल्पीय अधिवेशन ) २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. तर 
  • महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च २०२३ ला मांडला जाणार आहे.
  • पुढील आर्थिक वर्षातील २०२३-२४ साठीचा राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत सादर करणार आहेत. 
  • तत्पूर्वी ८ तारखेला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. 
  • मुख्यमंत्री राहिलेले विद्यमान वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पाची सर्वांना मोठी उत्सुकता आहे.

विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजा संदर्भात चर्चा झाली. 

पहिल्या दिवशी 'वंदे मातरम्' नंतर 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.


शिक्षण विभागाकडून तुम्हाला काय हवे? तात्काळ नोंदवा आपल्या सूचना आणि संकल्पना येथे

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावा? यावर आपण आपल्या सूचना आणि नविन काही संकल्पना शासनास सुचवू शकता. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांनी आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या सूचना आणि नाविन्यपूर्ण संकल्पना 'अर्थसंकल्प कसा असावा' या उपक्रमामध्ये नोंदवाव्यात लिंक पुढे दिली आहे.

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24

maharashtra-arthsankalp-2023 Maharashtra-Arthsankalp-2023

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून सूचना आणि नाविन्यपूर्ण संकल्पना मागवल्या आहेत.
महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. पण अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सातत्याने जनतेत राहणे आणि जनतेच्या मतांना सर्वोच्च प्राधान्य देणे, हे त्यांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे. याच भूमिकेतून या अर्थसंकल्पासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून काही अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा, हे देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता, या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या, यावर तात्काळ लिहा. लिंक खाली दिली आहे.


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post