संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले - 30 कोटी रुपये जमा होणार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर

संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या वर्षांमध्ये बऱ्याच महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. मात्र हे मानधनात लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आदिवासी विकास विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता ऑक्टोबर, २०२२ ते मार्च, २०२३ या कालावधीच्या खर्चासाठी रुपये ३०,००,००,००० (रुपये तीस कोटी) इतकी रक्कम वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. व लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात संजय गांधी निराधासरकारी योजनेचे अनुदान जमा करण्यात येणार आहे.

sanjay-gandhi-niradhar-yojana-payment-status

संजय गांधी निराधार योजना ही सन 1980 पासून राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2008 च्या शासन निर्णयानुसार काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे. संजय गांधी निराधार योजना आता संजय गांधी निराधार अनुदान योजना या नावाने राबविण्यात येत आहे. 

संजय गांधी निराधार योजना संपूर्ण माहिती 2023

संजय गांधी निराधार योजना पेन्शन किती मिळते?

  1. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रतीमाह प्रति लाभार्थी रुपये 600 एवढे अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये आता 400 रुपयाची वाढ करून आता एकुण प्रतिमाह रुपये 1000 इतके अनुदान लाभार्थ्यांना मिळते. 
  2. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना अनुदान रक्कम दरमहा रुपये ११०० मिळते.
  3. दोन अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळणा-या दरमहा रुपये ६००/ अर्थसहाय्यात रुपये ६००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १२००/- अशी करण्यात आली आहे.
  4. दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार व्यक्तींना अनुदान रक्कम दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात आलेली आहे. 
संजय गांधी निराधार योजना अनुदान शासन निर्णय येथे डाउनलोड करा - {getButton} $text={DOWNLOAD} $icon={link} $color={Hex Color}

संजय गांधी योजना आवश्यक पात्रता , कागदपत्रे , फॉर्म संपूर्ण माहितीसंजय गांधी निराधार योजना पात्रता , आवश्यक कागदपत्रे , अर्ज कोणाकडे व कसा करायचा? संपूर्ण माहिती येथे वाचा 

 हे सुद्धा वाचा

पुढील अपडेट साठी  'समावेशित शिक्षण' या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                        

Previous Post Next Post